वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०७ पृ. ११
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००७
आमची राज्य सेवा—२००७
km १०/०७ पृ. ११

घोषणा

▪ साहित्य सादरता ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिके. घरमालकाने आस्था दाखवल्यास, तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने चर्चा करावी. नोव्हेंबर: बायबल कथांचं माझं पुस्तक. आपल्याला मुले नाहीत, असे जर लोक म्हणाले तर जागृत राहा! माहितीपत्रक द्यावे. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. याऐवजी तुम्ही यहोवाच्या जवळ या (इंग्रजी) किंवा कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य ही पुस्तकेही सादर करू शकता. जानेवारी: पिवळ्या पडणाऱ्‍या कागदावर छापलेले अथवा १९९१ सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक सादर करावे. जर मंडळीत यांपैकी कोणत्याही पुस्तकांचा साठा नसल्यास, ज्ञान पुस्तक किंवा जागृत राहा! माहितीपत्रक सादर करावे.

▪ डिसेंबर महिन्यात पाच शनिवार-रविवार येत असल्यामुळे हा महिना सहायक पायनियर सेवा करण्याकरता उत्तम ठरेल.

▪ रक्‍तविरहित औषधोपचार—रुग्णांच्या गरजा व हक्क या व्हिडिओपटावर जानेवारीतील एका सेवा सभेत चर्चा केली जाईल. गरज असल्यास मंडळीकडून या व्हिडिओच्या प्रती मागवल्या जाऊ शकतात.

▪ आमची राज्य सेवा याच्या या अंकातील पुरवणीत “सन २००८ साठी ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा” असल्यामुळे, २००८ वर्षाच्या दरम्यान संदर्भासाठी तो जपून ठेवावा.

▪ सूचना: सेवा सभेतील शेवटला भाग सादर करणाऱ्‍या बांधवाने शेवटले गीत घोषित करावे. त्यानंतर त्याने किंवा आधीच नेमलेल्या दुसऱ्‍या एखाद्या योग्य बांधवाने समाप्तीची प्रार्थना करावी.

▪ नव्या सेवा वर्षादरम्यान वापरण्याकरता, वार्षिक सेवा फॉर्म्सचा पुरेसा साठा प्रत्येक मंडळीला पाठवला जात आहे. हा साठा पुढच्या सेवा वर्षाच्या शेवटापर्यंत पुरेसा आहे किंवा नाही हे सचिवांनी ठरवावे. जादा फॉर्म्सची गरज असल्यास ते लगेच मागवावेत.

▪ उपलब्ध झालेली नवी प्रकाशने:

बायबल नेमके काय शिकवते? —उर्दू

देव आपल्याकडून काय अपेक्षितो? —अरेबिक

देवाचे मार्गदर्शन—परादीसकडे जाणारा मार्ग —अरेबिक

शांतिदायक नवीन जगातील जीवन (पत्रिका क्र. १५) —अरेबिक

नैराश्‍य आलेल्यांना सांत्वन (पत्रिका क्र. २०) —अरेबिक

सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार! (पत्रिका क्र. २७) —अरेबिक

▪ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:

“पहा! मी सर्व काही नवे करितो!” —हिंदी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा