सन २००८ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा
सूचना
सन २००८ मध्ये ईश्वरशासित सेवा प्रशाला पुढील व्यवस्थेनुसार चालवली जाईल.
मूळ साहित्य: द होली बायबल मराठी—आर. व्ही. [bsi], ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा फायदा घ्या [be], एकमात्र खऱ्या देवाची उपासना [wt], आणि चर्चेसाठी बायबल विषय [td-MR].
प्रशालेची सुरुवात, गीत, प्रार्थना आणि स्वागतपर शब्दांनी वेळेवर झाली पाहिजे व ती पुढीलप्रमाणे व्हावी. प्रत्येक भागानंतर प्रशाला पर्यवेक्षक पुढील भागाचा परिचय करून देतील.
भाषणाचा गुण: ५ मिनिटे. प्रशाला पर्यवेक्षक, साहाय्यक सल्लागार किंवा दुसरे एखादे योग्यताप्राप्त वडील, सेवा प्रशाला पाठ्यपुस्तकावर आधारित असलेल्या एखाद्या भाषणाच्या गुणाची चर्चा करतील. (कमी वडील असलेल्या मंडळ्यांत, योग्यताप्राप्त सेवा सेवकांना हा भाग दिला जाऊ शकतो.)
नेमणूक क्र. १: १० मिनिटे. योग्यताप्राप्त वडील किंवा सेवा सेवकाने ही नेमणूक हाताळावी आणि ती ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा फायदा घ्या (इंग्रजी) किंवा “एकमात्र खऱ्या देवाची उपासना” (इंग्रजी) यावर आधारलेली असेल. हा भाग दहा मिनिटांच्या बोधप्रद भाषणाच्या रूपात सादर केला जावा. दिलेले साहित्य सादर करणे केवळ हाच भाषण देण्यामागील हेतू नसावा तर त्या माहितीच्या व्यावहारिक मूल्यावर लक्ष केंद्रित करून मंडळीस अत्यंत सहायक ठरणारे मुद्दे ठळकपणे मांडणे हा असावा. आराखड्यात दिलेले शीर्षक वापरावे. या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवांनी आपले भाषण मर्यादित वेळेमध्ये संपवण्याची दक्षता घ्यावी. आवश्यक असल्यास खासगी सल्ला दिला जाऊ शकतो.
बायबल वाचनातील ठळक मुद्दे: १० मिनिटे. एखाद्या योग्यताप्राप्त वडिलांनी अथवा सेवा सेवकांनी, सुरुवातीची पाच मिनिटे दिलेले साहित्य मंडळीला फायदा होईल असे प्रभावीपणे लागू केले पाहिजे. आठवड्यासाठी नेमलेल्या बायबल वाचनाच्या कोणत्याही भागावर ते टिपणी करू शकतात. पण त्यांनी नेमण्यात आलेल्या वाचनाचा केवळ सारांश देऊ नये. या भागाचा प्रमुख हेतू, ही माहिती आपल्याकरता का व कशाप्रकारे महत्त्वाची आहे, हे जाणण्यास श्रोत्यांना साहाय्य करणे हा आहे. वक्त्याने सुरुवातीच्या भागासाठी देण्यात आलेल्या पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेऊ नये. त्यानंतर, श्रोत्यांबरोबरील चर्चेसाठी पाच मिनिटे असल्याची खातरी त्यांनी करावी. श्रोत्यांना बायबल वाचन करताना आवडलेल्या मुद्यांवर आणि त्यांच्या लाभांवर संक्षिप्त (३० सेकंदात किंवा त्याहूनही कमी वेळेत) टिपणी देण्यासाठी आमंत्रण द्यावे. यानंतर मग प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना नेमलेल्या वर्गात जाण्यास सांगतील.
नेमणूक क्रमांक २: ४ मिनिटे किंवा कमी. वाचनाची ही नेमणूक बांधवाला दिली जावी. नेमलेला भाग, प्रस्तावना किंवा समारोप न देताच विद्यार्थ्याने वाचावा. प्रशाला पर्यवेक्षक खासकरून पुढील रीतीने विद्यार्थ्यांना मदत करतील; जसे की वाचताना नेमलेल्या भागाचा अर्थ समजून घेणे, अस्खलितपणे वाचणे, उचित ठिकाणी जोर देऊन वाचणे, आवाजात योग्य चढउतार करून वाचणे, वाचताना उचित ठिकाणी थांबणे आणि सहजपणे वाचणे.
नेमणूक क्रमांक ३: ५ मिनिटे. ही नेमणूक भगिनीला नेमून देण्यात येईल. ही नेमणूक मिळालेल्या भगिनींसाठी, प्रशाला पर्यवेक्षक स्वतः एखादे दृश्य निवडतील अथवा सेवा प्रशाला पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ ८२ वरील यादीतील एखादे दृश्य त्यांना नेमले जाईल. विद्यार्थीनीने, नेमलेला विषय वापरावा आणि तो विषय, स्थानीय क्षेत्रात वास्तविक आणि व्यावहारिक ठरेल अशा क्षेत्र सेवेतील एखाद्या पैलूला लागू करावा. मूळ-पाठ सूचित करणारा संदर्भ नसतो तेव्हा विद्यार्थीनीला तिच्या भाषणासाठी आपल्या प्रकाशनांतून संशोधन करून माहिती गोळा करावी लागेल. नवीन विद्यार्थीनींना, ज्या भाषणांचे संदर्भ दिलेले आहेत अशी भाषणे नेमावीत. प्रशाला पर्यवेक्षक खासकरून, विद्यार्थीनी साहित्य कशाप्रकारे मांडते आणि घरमालकाला शास्त्रवचनांवर तर्क करायला तसेच सादरतेतील मुख्य मुद्दे समजायला कशाप्रकारे मदत करते ते पाहतील. प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थिनीला एक साहाय्यकही नेमतील.
नेमणूक क्रमांक ४: ५ मिनिटे. दिलेल्या विषयावर विद्यार्थ्याने भाषण तयार करावे. मूळ-पाठ सूचित करणारा संदर्भ नसतो तेव्हा विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला आपल्या भाषणासाठी आपल्या प्रकाशनांतून संशोधन करून माहिती गोळा करावी लागेल. हा भाग एखाद्या बांधवाला नेमला जातो तेव्हा तो, राज्य सभागृहातील श्रोत्यांना उद्देशून भाषणाच्या रूपात सादर करता येईल. एखाद्या भगिनीला हा भाग नेमल्यास तिने तो नेमणूक क्रमांक ३ च्या पद्धतीनेच सादर करावा. उचित असते तेव्हा प्रशाला पर्यवेक्षक नेमणूक क्रमांक ४ हा भाग एखाद्या बांधवाला नेमू शकतात. कृपया चौफुली चिन्ह असलेले विषय, केवळ बांधवांना नेमले जावेत व ते भाषण-रूपात सादर केले जावेत याची नोंद घ्या. समजा तुमच्या मंडळीत ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभेचे विविध भाग हाताळण्याकरता अनेक वडील आणि सेवा सेवक असतील तर शक्य असते तेव्हा चौफुली चिन्ह असलेले विषय एखाद्या वडिलाला अथवा सेवा सेवकाला नेमणे उचित ठरेल.
सल्ला: १ मिनिट. प्रशाला पर्यवेक्षकाने विद्यार्थी ज्या भाषण गुणावर काम करत आहे त्याविषयी आगाऊ सांगू नये. नेमणूक क्र. २, क्र. ३ आणि क्र. ४ हाताळल्यानंतर, प्रशाला पर्यवेक्षक एखाद्या प्रशंसनीय मुद्द्यावर सकारात्मक अभिप्राय देतील. प्रशाला पर्यवेक्षकांचा हेतू “भाषण खूप चांगले होते,” फक्त असे म्हणण्याचा नसून विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणातील तो पैलू प्रभावी असण्यामागच्या विशिष्ट कारणांकडे लक्ष आकर्षित करणे हा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार, सभा संपल्यावर किंवा इतर वेळी खासगीत अतिरिक्त सकारात्मक सल्ला दिला जाऊ शकतो.
वेळ: कोणतेही भाषण किंवा सल्लागाराचे शेरे ओव्हरटाईम जाऊ नयेत. नेमणूक क्रमांक २ ते ४, वेळ पूर्ण होते तेव्हा विचारशीलपणे थांबवले पाहिजेत. भाषण गुणावर सुरुवातीचे भाषण देणारे बांधव, नेमणूक क्रमांक १ हाताळणारे किंवा बायबल वाचनातील ठळक मुद्दे सादर करणारे बांधव जादा वेळ घेत असतील तर त्यांना खासगीत सल्ला द्यावा. प्रशालेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाने आपापल्या वेळेकडे विशेष लक्ष द्यावे. कार्यक्रमाची एकूण वेळ: गीत व प्रार्थना सोडून ४५ मिनिटे आहे.
काऊंसल फॉर्म: पाठ्यपुस्तकात देण्यात आला आहे.
साहाय्यक सल्लागार: प्रशाला पर्यवेक्षकांच्या व्यतिरिक्त आणखी एखादे योग्यताप्राप्त वडील उपलब्ध असल्यास, वडील वर्ग त्यांना साहाय्यक सल्लागार म्हणून नेमू शकतात. मंडळीत अधिक वडील असल्यास दर वर्षी वेगवेगळे योग्यताप्राप्त वडील ही जबाबदारी सांभाळू शकतील. साहाय्यक सल्लागाराची जबाबदारी, आवश्यक असल्यास नेमणूक क्रमांक १ आणि बायबल वाचनातील ठळक मुद्दे सादर करणाऱ्या बांधवांना खासगी सल्ला देणे ही असेल. परंतु सहवडिलांच्या किंवा सेवा सेवकांच्या प्रत्येक भाषणानंतर त्यांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही.
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी: ३० मिनिटे. दर दोन महिन्यांनी प्रशाला पर्यवेक्षक उजळणी घेतील. ही उजळणी, वर सांगितल्याप्रमाणे, भाषणाचा गुण आणि बायबल वाचनातील ठळक मुद्दे यांवर चर्चा केल्यानंतर असेल. उजळणी, गेल्या दोन महिन्यांच्या आणि चालू आठवड्याच्या प्रशालेत चर्चिलेल्या विषयांवर आधारित असेल. समजा ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणीच्या आठवड्यात तुमच्या मंडळीचे विभागीय संमेलन असल्यास, उजळणी (आणि बाकीचा साप्ताहिक आराखडा) एक आठवडा पुढे ढकलून त्या आठवड्याचा आराखडा सादर करावा. आणि समजा उजळणीच्या आठवड्यातच तुमच्या मंडळीत विभागीय पर्यवेक्षकांची भेट असली, तर गीत, भाषणाचा गुण आणि बायबल वाचनातील ठळक मुद्दे हे भाग नेमण्यात आल्याप्रमाणे सादर करावेत. बोधपर भाषण (भाषणाच्या गुणानंतर दिले जाणारे) पुढील आठवड्याच्या आराखड्यातून घेतले जावे. पुढील आठवड्याच्या ईश्वरशासित सेवा प्रशालेत आराखड्यानुसार भाषणाचा गुण आणि बायबल वाचनातील ठळक मुद्दे यानंतर उजळणी असेल.
आराखडा
जाने. ७ बायबल वाचन: मत्तय १-६ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: आवश्यक स्पष्टीकरण देणे (be पृ. २२८ परि. २-३)
क्र. १: विजयी होण्यास सुसज्ज (wt पृष्ठे ७६-७८ परि. १३-१५)
क्र. २: मत्तय ५:१-२०
क्र. ३: td-MR ३६क ‘जगाचा शेवट’ म्हणजे काय?
क्र. ४: पवित्र आत्मा आपल्याला कोणत्या मार्गांनी मदत करतो?
जाने. १४ बायबल वाचन: मत्तय ७-११ गीत २८ (२२४)
भाषणाचा गुण: हृदय कसे समाविष्ट आहे (be पृ. २२८ परि. ४–पृ. २२९ परि. १)
क्र. १: देवाचे वचन प्रिय माना (be पृ. ९ परि. १-५)
क्र. २: मत्तय १०:१-२३
क्र. ३: प्रामाणिक असणे फायद्याचे का आहे
क्र. ४: td-MR ३६ख शेवटल्या दिवसांच्या चिन्हांबद्दल जागृत राहण्याची गरज आहे
जाने. २१ बायबल वाचन: मत्तय १२-१५ गीत ३ (३२)
भाषणाचा गुण: तुमच्या श्रोत्यांसाठी बोधपर माहिती (be पृ. २३० परि. १-६)
क्र. १: दररोज बायबल वाचा (be पृ. १० परि. १–पृ. १२ परि. ४)
क्र. २: मत्तय १४:१-२२
क्र. ३: td-MR ३७क इतर धर्मांवर विश्वास ठेवण्याला देवाची मान्यता का नाही?
क्र. ४: ख्रिस्तविरोधक कोण किंवा काय आहे?
जाने. २८ बायबल वाचन: मत्तय १६-२१ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: संशोधन करून एखादे भाषण बोधपर बनवणे (be पृ. २३१ परि. १-३)
क्र. १: “तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी संभाळा” (be पृ. १३ परि. १–पृ. १४ परि. ५)
क्र. २: मत्तय १७:१-२०
क्र. ३: td-MR ३७ख “सर्व धर्मात चांगले आहे,” हे खरे का नाही?
क्र. ४: ख्रिश्चन पवित्र मानत असलेल्या गोष्टी
फेब्रु. ४ बायबल वाचन: मत्तय २२-२५ गीत १८ (१६२)
भाषणाचा गुण: शास्त्रवचनांचे स्पष्टीकरण देणे (be पृ. २३१ परि. ४-५)
क्र. १: सभा व संमेलनांमध्ये ऐकणे (be पृ. १५ परि. १–पृ. १६ परि. ५)
क्र. २: मत्तय २३:१-२४
क्र. ३: अनंतकाळचे जीवन कंटाळवाणे नसणार
क्र. ४: a td-MR ३८क सर्व ख्रिश्चनांनी साक्ष दिली पाहिजे, सुवार्ता सांगितली पाहिजे
फेब्रु. ११ बायबल वाचन: मत्तय २६-२८ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: शब्दप्रयोगांचे स्पष्टीकरण देणे (be पृ. २३२ परि. १)
क्र. १: पुनरुत्थानाच्या आशेचे सामर्थ्य (wt पृष्ठे ७९-८३ परि. १-८)
क्र. २: मत्तय २७:१-२२
क्र. ३: विश्वास असणे म्हणजे केवळ देवाचे अस्तित्व मानणे एवढेच का नाही
क्र. ४: b td-MR ३८ख वारंवार भेटी देण्याची आणि साक्ष देत राहण्याची गरज का आहे?
फेब्रु. १८ बायबल वाचन: मार्क १-४ गीत २६ (२१२)
भाषणाचा गुण: शास्त्रवचनांवर तर्क करणे (be पृ. २३२ परि. २-४)
क्र. १: ‘अधोलोकाची किल्ली’ (wt पृष्ठे ८३-९ परि. ९-१८)
क्र. २: मार्क २:१-१७
क्र. ३: प्रीतीमुळे धैर्य बळकट कसे बनते
क्र. ४: c td-MR ३८ग रक्तदोषापासून मुक्त होण्यासाठी साक्ष का दिली पाहिजे?
फेब्रु. २५ बायबल वाचन: मार्क ५-८ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: श्रोत्यांना फायदा होईल अशी माहिती निवडणे (be पृ. २३३ परि. १-५)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
मार्च ३ बायबल वाचन: मार्क ९-१२ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: नेमलेल्या साहित्याचा उपयोग (be पृ. २३४ परि. १–पृ. २३५ परि. ३)
क्र. १: तुम्ही तुमची स्मरणशक्ती सुधारू शकता (be पृ. १७ परि. १–पृ. १९ परि. १)
क्र. २: मार्क ११:१-१८
क्र. ३: देव खोटे का बोलू शकत नाही
क्र. ४: td-MR ३९क वाढदिवस, नाताळ, आरंभीच्या ख्रिश्चनांनी साजरा का केला नाही
मार्च १० बायबल वाचन: मार्क १३-१६ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: प्रश्नांचा प्रभावकारी उपयोग (be पृ. २३६ परि. १-५)
क्र. १: “सर्वकाळ” टिकणारे देवाचे राज्य (wt पृष्ठे ९०-६ परि. १-१०)
क्र. २: मार्क १४:१-२१
क्र. ३: “माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य” का घडत नाही (याको. १:२०)
क्र. ४: d td-MR ४०क सर्व ख्रिश्चनांनी सेवक का असले पाहिजे?
मार्च १७ बायबल वाचन: लूक १-३ गीत १ (१३)
भाषणाचा गुण: महत्वाचे मुद्दे सांगण्याआधी प्रश्न विचारणे (be पृ. २३७ परि. १-२)
क्र. १: देवाच्या राज्याचा उद्देश कसा पूर्ण होईल? (wt पृ. ९६-१०० परि. ११-१७)
क्र. २: लूक १:१-२३
क्र. ३: “क्रियांवाचून विश्वास निरर्थक” का आहे? (याको. २:२०)
क्र. ४: e td-MR ४०ख सेवेच्या पात्रता कोणकोणत्या आहेत?
मार्च २४ बायबल वाचन: लूक ४-६ गीत २८ (२२४)
भाषणाचा गुण: एखाद्या विषयावर तर्क करण्यासाठी प्रश्न (be पृ. २३७ परि. ३–पृ. २३८ परि. २)
क्र. १: शिकलेल्या गोष्टी स्मरण करून देण्यात देवाच्या आत्म्याची भूमिका (be पृ. १९ परि. २–पृ. २० परि. ३)
क्र. २: लूक ४:१-२१
क्र. ३: td-MR ४१क सृष्टी सिद्ध झालेल्या विज्ञानाशी सुसंगत कशी आहे व ती उत्क्रांतीवादाचे खंडण कशी करते?
क्र. ४: देवाचे भय, पाप करण्यापासून आपल्याला रोखू शकते
मार्च ३१ बायबल वाचन: लूक ७-९ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: आंतरिक भावना काढून घेण्यासाठी प्रश्न विचारणे (be पृ. २३८ परि. ३-५)
क्र. १: वाचनाकडे लक्ष का दिले पाहिजे? (be पृ. २१ परि. १–पृ. २३ परि. ३)
क्र. २: लूक ७:१-१७
क्र. ३: देव आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्याला आनंदी पाहू इच्छितो याचा पुरावा
क्र. ४: td-MR ४१ख उत्पत्तीचे दिवस हे २४ तासाचे का नाहीत?
एप्रि. ७ बायबल वाचन: लूक १०-१२ गीत ९ (३७)
भाषणाचा गुण: जोर देण्यासाठी प्रश्न (be पृ. २३९ परि. १-२)
क्र. १: वाचनाकडे लक्ष कसे ठेवावे (be पृ. २३ परि. ४–पृ. २६ परि. ५)
क्र. २: लूक ११:३७-५४
क्र. ३: td-MR ४२क प्रभूचा संध्याभोजन विधी कशाप्रकारे पाळला जातो?
क्र. ४: प्रकटीकरण १७:१७ चा अर्थ काय होतो?
एप्रि. १४ बायबल वाचन: लूक १३-१७ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: चुकीचे विचार उघडकीस आणण्यासाठी प्रश्न (be पृ. २३९ परि. ३-५)
क्र. १: अभ्यास कसा करायचा (be पृ. २७ परि. १–पृ. ३१ परि. २)
क्र. २: लूक १६:१-१५
क्र. ३: सरवा वेचण्याच्या देवाच्या नियमापासून आपण काय शिकतो (लेवी. १९:९, १०)
क्र. ४: td-MR ४२ख मिसा शास्त्रवचनानुसार का नाही?
एप्रि. २१ बायबल वाचन: लूक १८-२१ गीत २४ (१८५)
भाषणाचा गुण: शिकवताना उपमा आणि रूपकांचा उपयोग (be पृ. २४० परि. १–पृ. २४१ परि. १)
क्र. १: ‘पहिल्याने त्याचे राज्य मिळविण्यास झटा’ (wt पृ. १०१-६ परि. १-९)
क्र. २: लूक १८:१-१७
क्र. ३: td-MR ४३क केवळ १,४४,००० स्वर्गात जातात
क्र. ४: ‘कुरकुर करू नका’ म्हणजे काय (फिलिप्पै. २:१४)
एप्रि. २८ बायबल वाचन: लूक २२-२४ गीत २९ (२२२)
भाषणाचा गुण: उदाहरणांचा उपयोग (be पृ. २४१ परि. २-४)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
मे ५ बायबल वाचन: योहान १-४ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: शास्त्रवचनातील उदाहरणे (be पृ. २४२ परि. १-२)
क्र. १: आपल्या जीवनात राज्याला पहिले स्थान द्या (wt पृ. १०६-९ परि. १०-१५)
क्र. २: योहान ३:१-२१
क्र. ३: शौल राजाला ठार मारण्यास दावीद नकार देतो, त्यावरून आपण काय शिकतो
क्र. ४: td-MR ४४क हर्मगिदोन, दुष्टाईचा अंत करण्यासाठी देवाचे युद्ध
मे १२ बायबल वाचन: योहान ५-७ गीत २० (९३)
भाषणाचा गुण: ते लोकांना समजेल का? (be पृ. २४२ परि. ३–पृ. २४३ परि. १)
क्र. १: अभ्यास करणे प्रतिफलदायी आहे (be पृ. ३१ परि. ३–पृ. ३२ परि. ४)
क्र. २: योहान ६:१-२१
क्र. ३: हनन्या व सप्पीराच्या अहवालातून आपण काय शिकतो
क्र. ४: td-MR ४४ख हर्मगिदोन, देवाच्या प्रेमळपणाच्या विरोधात का नाही?
मे १९ बायबल वाचन: योहान ८-११ गीत २४ (१८५)
भाषणाचा गुण: परिचित असलेल्या परिस्थितीवरील दृष्टांत (be पृ. २४४ परि. १-२)
क्र. १: बायबलचा उपयोग करून संशोधन कसे करावे (be पृ. ३३ परि. १–पृ. ३५ परि. २)
क्र. २: योहान ११:३८-५७
क्र. ३: td-MR १क पवित्र आत्मा काय आहे?
क्र. ४: दहाव्या आज्ञेला सक्तीने लागू करणे शक्य नव्हते, मग ही आज्ञा का देण्यात आली?
मे २६ बायबल वाचन: योहान १२-१६ गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: तुमच्या श्रोत्यांसाठी उचित दृष्टांत (be पृ. २४४ परि. ३–पृ. २४५ परि. ४)
क्र. १: संशोधन करण्यासाठी असलेल्या इतर साधनांचा उपयोग करण्यास शिकणे (be पृ. ३५ परि. ३–पृ. ३८ परि. ४)
क्र. २: योहान १२:१-१९
क्र. ३: td-MR १ख जीवनी शक्तीला आत्मा म्हटले का आहे?
क्र. ४: आपण यहोवावर कशाप्रकारे आपला भार टाकतो (स्तो. ५५:२२)
जून २ बायबल वाचन: योहान १७-२१ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: दृश्य गोष्टींचा प्रभावकारी उपयोग (be पृ. २४७ परि. १-२)
क्र. १: तुमच्या बाप्तिस्म्याचा अर्थ (wt पृष्ठे ११०-१५ परि. १-१०)
क्र. २: योहान २१:१-१४
क्र. ३: आपण ज्या देवाला पाहू शकत नाही, त्यावर विश्वास का ठेवावा?
क्र. ४: td-MR १ग भूतविद्या का टाळली पाहिजे?
जून ९ बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये १-४ गीत १८ (१६२)
भाषणाचा गुण: येशूने दृश्य गोष्टींचा वापर कसा केला (be पृ. २४७ परि. ३)
क्र. १: आपल्या बाप्तिस्म्याच्या वचनानुसार जगणे (wt पृष्ठे ११५-९ परि. ११-१६)
क्र. २: प्रेषितांची कृत्ये १:१-१४
क्र. ३: td-MR २क १९१४ (सा.यु.) मध्ये विदेश्यांच्या काळाची समाप्ती होते
क्र. ४: धैर्याने बोलण्यात काय समाविष्ट आहे?
जून १६ बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये ५-७ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: दृश्य साधनांचा वापर करण्याचे मार्ग (be पृ. २४८ परि. १-३)
क्र. १: रुपरेषा तयार करणे (be पृष्ठे ३९-४२)
क्र. २: प्रेषितांची कृत्ये ५:१-१६
क्र. ३: td-MR ३क येशूला वधस्तंभावर अपमानास्पद रीतीने टांगण्यात आले
क्र. ४: यहोवाचे भय ज्ञानाचा आरंभ होय, असे का म्हणता येईल? (स्तो. १११:१०)
जून २३ बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये ८-१० गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: नकाशे, संमेलन कार्यक्रम आणि व्हिडीओंचा उपयोग (be पृ. २४८ परि. ४–पृ. २४९ परि. २)
क्र. १: प्रशालेसाठी विद्यार्थी नेमणुका तयार करणे (be पृ. ४३ परि. १–पृ. ४४ परि. ३)
क्र. २: प्रेषितांची कृत्ये ८:१-१७
क्र. ३: येशू “दरिद्री” लोकांना कशाप्रकारे सोडवील (स्तो. ७२:१२)
क्र. ४: td-MR ३ख क्रूसाची उपासना का करू नये?
जून ३० बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये ११-१४ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: मोठ्या समुहासाठी दृश्य साधनांचा उपयोग करणे (be पृ. २४९ परि. ३–पृ. २५० परि. १)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
जुलै ७ बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये १५-१७ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: तर्क करणे का महत्त्वपूर्ण आहे (be पृ. २५१ परि. १-३)
क्र. १: जेव्हा तुमच्या भाषणाचा एक विषय असतो आणि सेटिंग असते (be पृ. ४४ परि. ४–पृ. ४६ परि. २)
क्र. २: प्रेषितांची कृत्ये १६:१-१५
क्र. ३: निर्भयतेने यहोवाची सेवा करण्याची कारणे
क्र. ४: td-MR ४क येशूचे मानवी जीवन हे “सर्वांसाठी खंडणी” कसे होते?
जुलै १४ बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये १८-२१ गीत ३ (३२)
भाषणाचा गुण: सुरुवात कोठून करावी (be पृ. २५१ परि. ४–पृ. २५२ परि. ३)
क्र. १: मंडळीसाठी भाषणे तयार करणे (be पृ. ४७ परि. १–पृ. ४९ परि. १)
क्र. २: प्रेषितांची कृत्ये २०:१-१६
क्र. ३: td-MR ४ख खंडणी ही समतुल्य किंमत कशी होती?
क्र. ४: निर्गम २३:१९ख मध्ये दिलेल्या मनाईवरून आपण काय शिकू शकतो?
जुलै २१ बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये २२-२५ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: नमते कधी घ्यावे (be पृ. २५२ परि. ४–पृ. २५३ परि. २)
क्र. १: सेवा सभेतील भागांची आणि इतर भाषणांची तयारी करणे (be पृ. ४९ परि. २–पृ. ५१ परि. २)
क्र. २: प्रेषितांची कृत्ये २२:१-१६
क्र. ३: यहोवाचे साक्षीदार कोणत्या मार्गांनी, योहान १३:३४, ३५ पूर्ण करतात?
क्र. ४: td-MR ५क येशूचे परतणे मानवी डोळ्यांना अदृश्य
जुलै २८ बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये २६-२८ गीत १८ (१६२)
भाषणाचा गुण: प्रश्न विचारणे आणि कारणे देणे (be पृ. २५३ परि. ३–पृ. २५४ परि. २)
क्र. १: यहोवाच्या सिंहासनासमोर एक मोठा लोकसमुदाय (wt पृष्ठे १२०-७ परि. १-१७)
क्र. २: प्रेषितांची कृत्ये २६:१-१८
क्र. ३: td-MR ५ख जागतिक घडामोडींवरून येशूचे परतणे कसे ओळखता येते?
क्र. ४: यहोवा धीर का धरतो
ऑग. ४ बायबल वाचन: रोमकर १-४ गीत २१ (१९१)
भाषणाचा गुण: देवाच्या वचनावर आधारित ठोस पुरावे (be पृ. २५५ परि. १–पृ. २५६ परि. २)
क्र. १: यहोवा आपली संघटना कशाप्रकारे चालवतो—भाग १ (wt पृष्ठे १२८-३१ परि. १-७)
क्र. २: रोमकर ३:१-२०
क्र. ३: देवदूत कशाप्रकारे देवाच्या सेवकांचे संरक्षण करतात व त्यांना सामर्थ्य देतात
क्र. ४: td-MR ६क खोट्या संदेष्ट्यांविषयी काय भाकीत करण्यात आले होते?
ऑग. ११ बायबल वाचन: रोमकर ५-८ गीत १ (१३)
भाषणाचा गुण: बाहेरील पुरावे देऊन तुमचे मुद्दे शाबीत करा (be पृ. २५६ परि. ३-५)
क्र. १: जनतेसाठी भाषणे तयार करणे (be पृ. ५२ परि. १–पृ. ५४ परि. १)
क्र. २: रोमकर ६:१-२०
क्र. ३: td-MR ७क ख्रिश्चन चर्च म्हणजे काय?
क्र. ४: नीतिमत्त्व कशाप्रकारे आपले संरक्षण करू शकते
ऑग. १८ बायबल वाचन: रोमकर ९-१२ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: पुरेसा पुरावा सादर करणे (be पृ. २५६ परि. ६–पृ. २५७ परि. ३)
क्र. १: यहोवा आपली संघटना कशाप्रकारे चालवतो—भाग २ (wt पृष्ठे १३१-५ परि. ८-१५)
क्र. २: रोमकर ९:१-१८
क्र. ३: गप्पा मारण्याचे आणि अफवा पसरवण्याचे धोके कोणते?
क्र. ४: td-MR ७ख पेत्र “खडक” आहे का?
ऑग. २५ बायबल वाचन: रोमकर १३-१६ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: हृदयाचा ठाव घ्या (be पृ. २५८ परि. १-५)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
सप्टें. १ बायबल वाचन: १ करिंथकर १-९ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: लोकांच्या हृदयातील विचार काढून घेणे (be पृ. २५९ परि. १-३)
क्र. १: सल्ला ऐकून घ्या (wt पृ. १३६-९ परि. १-९)
क्र. २: १ करिंथकर ४:१-१७
क्र. ३: td-MR ८क आज्ञाधारक मानवजातीला सार्वकालिक जीवनाची हमी कशी देण्यात आली आहे?
क्र. ४: पुष्कळ धनसंपत्ती असणे देवाचा आशीर्वाद असल्याचा पुरावा आहे का?
सप्टें. ८ बायबल वाचन: १ करिंथकर १०-१६ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: लाभदायक भावना जागृत करणे (be पृ. २५९ परि. ४–पृ. २६० परि. १)
क्र. १: अनुशासन स्वीकार करा (wt पृष्ठे १३९-४३ परि. १०-१६)
क्र. २: १ करिंथकर १३:१–१४:६
क्र. ३: वचनाप्रमाणे आचरण करणारे धन्य का आहेत
क्र. ४: td-MR ८ख स्वर्गीय जीवन केवळ ख्रिस्ताचे शरीर यात समाविष्ट असलेल्यांनाच मिळते
सप्टें. १५ बायबल वाचन: २ करिंथकर १-७ गीत २६ (२१२)
भाषणाचा गुण: ईश्वरी भय विकसित करण्यासाठी इतरांना मदत करणे (be पृ. २६० परि. २-३)
क्र. १: “एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीति करा” (wt पृ. १४४-५० परि. १-१४)
क्र. २: २ करिंथकर १:१-१४
क्र. ३: td-MR ८ग पृथ्वीवरील जीवनाचे अभिवचन असीमित जणांस अर्थात ‘दुसऱ्या मेंढरांस’ कसे देण्यात आले?
क्र. ४: छळ होत असला तरी खरे ख्रिस्ती आनंदी का असतात
सप्टें. २२ बायबल वाचन: २ करिंथकर ८-१३ गीत ९ (३७)
भाषणाचा गुण: आपले वर्तन देवासाठी महत्त्वाचे आहे (be पृ. २६० परि. ४–पृ. २६१ परि. १)
क्र. १: आपल्या घरच्यांबरोबर सुभक्तीनुसार वागा (wt पृष्ठे १५१-८ परि. १-१३)
क्र. २: २ करिंथकर ९:१-१५
क्र. ३: खरे ख्रिस्ती या जगाचा भाग का नाहीत
क्र. ४: td-MR ९क जीव काय आहे?
सप्टें. २९ बायबल वाचन: गलतीकर १-६ गीत १९ (१६४)
भाषणाचा गुण: स्वतःचे परीक्षण करण्यासाठी इतरांना मदत करणे (be पृ. २६१ परि. २-४)
क्र. १: ‘ते जगाचा भाग नाहीत’ (wt पृष्ठे १५९-६६ परि. १-१५)
क्र. २: गलतीकर १:१-१७
क्र. ३: td-MR १०क तारण येशूच्या खंडणी बलिदानाद्वारे कसे मिळते?
क्र. ४: प्रीती मनुष्याच्या भीतीवर कशाप्रकारे मात करू शकते
ऑक्टो. ६ बायबल वाचन: इफिसकर १-६ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: मनापासून आज्ञाधारकपणा दाखवण्यास प्रवृत्त करणे (be पृ. २६२ परि. १-४)
क्र. १: देवाचे वचन निधडकपणे सांगत राहा (wt पृ. १६७-७४)
क्र. २: इफिसकर ३:१-१९
क्र. ३: क्षमा मागणे कमजोरीचे चिन्ह नव्हे
क्र. ४: td-MR १०ख “एकदा तारण झाले की कायमचे झाले” हे बायबलनुसार नाही, हे कसे?
ऑक्टो. १३ बायबल वाचन: फिलिप्पैकर १–कलस्सैकर ४ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: लोकांच्या हृदयाप्रत पोहचण्यासाठी यहोवाला सहयोग देणे (be पृ. २६२ परि. ५)
क्र. १: यहोवाचा दिवस सतत ध्यानात ठेवा (wt पृ. १७५-८३)
क्र. २: फिलिप्पैकर ३:१-१६
क्र. ३: td-MR १०ग “संपूर्ण जगाचे तारण होईल” हे बायबलनुसार का नाही?
क्र. ४: f इस्राएलाने विशेष कृपेचे स्थान गमावले (wt पृ. १८५ परि. ४, ५)
ऑक्टो. २० बायबल वाचन: १ थेस्सलनीकाकर १–२ थेस्सलनीकाकर ३ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: भाषण वेळेवर संपवणे (be पृ. २६३ परि. १–पृ. २६४ परि. ४)
क्र. १: यहोवाचा उद्देश गौरवपूर्ण रीतीने पूर्ण होतो (wt पृ. १८६-९१)
क्र. २: १ थेस्सलनीकाकर १:१–२:८
क्र. ३: td-MR ११क कशाप्रकारे देव, विश्वात सर्वश्रेष्ठ आहे?
क्र. ४: g आज उपासना करण्यासाठी एकत्र येण्याचा काय अर्थ आहे? (wt पृ. ५-९ परि. १-९)
ऑक्टो. २७ बायबल वाचन: १ तीमथ्य १–२ तीमथ्य ४ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: प्रभावकारी पद्धतीने उपदेश देणे (be पृ. २६५ परि. १-३)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
नोव्हें. ३ बायबल वाचन: तीत १–फिलेमोन गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: प्रेमाने उपदेश देणे (be पृ. २६६ परि. १-४)
क्र. १: एकतेने उपासना करण्यासाठी कोणत्या गोष्टी मदत करतात (wt पृ. ९-१३ परि. १०-१४)
क्र. २: तीत १:१-१६
क्र. ३: td-MR ११ख पृथ्वीवर येण्याआधी आणि नंतरही पुत्र पित्यापेक्षा कनिष्ठ
क्र. ४: h देव प्रीती आहे (wt पृष्ठे १६-१८ परि. ४-९)
नोव्हें. १० बायबल वाचन: इब्री लोकांस १-८ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: शास्त्रवचनांवर आधारित उपदेश (be पृ. २६७ परि. १-२)
क्र. १: यहोवाचे गौरव करा कारण तोच एकमात्र खरा देव आहे (wt पृष्ठे १९-२२ परि. १०-१६)
क्र. २: इब्री लोकांस ३:१-१९
क्र. ३: td-MR ११ग देव आणि ख्रिस्त कोणत्या अर्थाने एक आहेत?
क्र. ४: खऱ्या व बनावटी नम्रतेतील फरक
नोव्हें. १७ बायबल वाचन: इब्री लोकांस ९-१३ गीत २० (९३)
भाषणाचा गुण: धैर्याने बोला (be पृ. २६७ परि. ३-४)
क्र. १: देवाच्या वचनावरील पकड मजबूत करा (wt पृष्ठे २३-२७ परि. १-१०)
क्र. २: इब्री लोकांस १०:१-१७
क्र. ३: td-MR ११घ देवाचा पवित्र आत्मा त्याची कार्यकारी शक्ती आहे
क्र. ४: क्षमा केल्याने ऐक्य कसे टिकून राहते
नोव्हें. २४ बायबल वाचन: याकोब १-५ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: उत्तेजन देणारे असणे का महत्त्वाचे आहे (be पृ. २६८ परि. १-३)
क्र. १: आपला उद्देश आहे, देवाच्या वचनावरील पकड मजबूत करणे (wt पृष्ठे २८-३१ परि. ११-१३)
क्र. २: याकोब १:१-२१
क्र. ३: td-MR १२क दियाबल आत्मिक व्यक्ती आहे का?
क्र. ४: कशाप्रकारे “दया न्यायावर विजय मिळविते” (याको. २:१३)
डिसें. १ बायबल वाचन: १ पेत्र १–२ पेत्र ३ गीत १५ (१२७)
भाषणाचा गुण: यहोवाने केलेल्या गोष्टी स्मरणे (be पृ. २६८ परि. ४–पृ. २६९ परि. २)
क्र. १: ज्याची सर्व संदेष्ट्यांनी साक्ष दिली (wt पृष्ठे ३२-३७ परि. १-९)
क्र. २: १ पेत्र २:१-१७
क्र. ३: td-MR १२ख दियाबल या जगाचा अदृश्य अधिपती आहे
क्र. ४: i ख्रिस्तावर विश्वास दाखवा (wt पृष्ठे ३७-४० परि. १०-१५)
डिसें. ८ बायबल वाचन: १ योहान १–यहूदा गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: यहोवाने आपल्या लोकांना कशी मदत केली ते दाखवणे (be पृ. २६९ परि. ३-५)
क्र. १: यहोवाचे उपासक स्वातंत्र्याचा आनंद घेतात (wt पृष्ठे ४१-४५ परि. १-९)
क्र. २: १ योहान ४:१-१६
क्र. ३: td-MR १२ग दुरात्मे बंडखोर देवदूत आहेत
क्र. ४: j जग ज्याला स्वातंत्र्य समजते त्याचे दुःखकर परिणाम (wt पृष्ठे ४५-४९ परि. १०-१४)
डिसें. १५ बायबल वाचन: प्रकटीकरण १-६ गीत २९ (२२२)
भाषणाचा गुण: देव आज करत असलेल्या गोष्टींत आनंद करणे (be पृ. २७० परि. १–पृ. २७१ परि. २)
क्र. १: आपल्या सर्वांना तोंड द्यावा लागेल असा वादविषय—भाग १ (wt पृष्ठे ५०-५३ परि. १-८)
क्र. २: प्रकटीकरण ३:१-१३
क्र. ३: td-MR १३क जगातील समस्यांना कोण जबाबदार आहे?
क्र. ४: धीर आणि दयाळुपणा यांना सीमा का आहेत
डिसें. २२ बायबल वाचन: प्रकटीकरण ७-१४ गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: ईश्वरशासित सेवा प्रशालेत स्वागत (be पृ. ५ परि. १–पृ. ८ परि. १)
क्र. १: आपल्या सर्वांना तोंड द्यावा लागेल असा वादविषय—भाग २ (wt पृष्ठे ५४-५९ परि. ९-१८)
क्र. २: प्रकटीकरण ८:१-१३
क्र. ३: td-MR १३ख दुष्टाईला अनुमती का देण्यात आली आहे?
क्र. ४: “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे,” या वाक्यांशाचा अर्थ काय होतो? (१ योहान ३:२०)
डिसें. २९ बायबल वाचन: प्रकटीकरण १५-२२ गीत १७ (१८७)
भाषणाचा गुण: अस्खलित वाचन (be पृ. ८३ परि. १-५)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
[तळटीपा]
a हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा, शक्यतो वडील किंवा सेवा सेवकांना.
b हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा, शक्यतो वडील किंवा सेवा सेवकांना.
c हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा, शक्यतो वडील किंवा सेवा सेवकांना.
d हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा, शक्यतो वडील किंवा सेवा सेवकांना.
e हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा, शक्यतो वडील किंवा सेवा सेवकांना.
f हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा, शक्यतो वडील किंवा सेवा सेवकांना.
g हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा, शक्यतो वडील किंवा सेवा सेवकांना.
h हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा, शक्यतो वडील किंवा सेवा सेवकांना.
i हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा, शक्यतो वडील किंवा सेवा सेवकांना.
j हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा, शक्यतो वडील किंवा सेवा सेवकांना.