नोव्हेंबर महिन्यात सावध राहा! मासिकाच्या खास अंकाची मोहीम!
१ बऱ्याच लोकांच्या मनात बायबलविषयी काही प्रांजळ प्रश्न आहेत. जर माणसांनी हे लिहिले तर मग याला देवाचे वचन कसे म्हणता येईल? जीवनातले निर्णय घेण्याकरता बायबलमधील मार्गदर्शनावर भरवसा का ठेवला जाऊ शकतो? बायबलचे वाचन व अभ्यास करण्याकरता वेळ व शक्ती खर्च करणाऱ्या व्यक्तीला कोणते फायदे मिळू शकतात? बायबलचे कोणते भाषांतर वाचावे? या व इतर प्रश्नांची उत्तरे सावध राहा! मासिकाच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंकात दिली जातील. या अंकाचे शीर्षक असेल, “तुम्ही बायबलवर भरवसा ठेवू शकता का?” हा अंक इंग्रजी, मल्याळम व तामीळ भाषांतून उपलब्ध केला जाईल. जर तुम्ही इतर भाषांतील सावध राहा! मासिक सादर करणार असाल, तर तुम्ही “चांगले पालक बनण्याचे सात कानमंत्र” असे शीर्षक असलेला ऑक्टोबर-डिसेंबर अंक सादर करण्याचा विशेष प्रयत्न करू शकता.
२ सावध राहाचा! खास अंक, किंवा ऑक्टोबर ते डिसेंबर अंक आपल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वितरीत करण्याचा आपण खास प्रयत्न करू. शक्य असल्यास नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक शनिवारी मंडळीसोबत घरोघरच्या क्षेत्र सेवाकार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करावा. सावध राहाचा! हा अंक आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, सहकर्मचाऱ्यांना, शिक्षकांना, शाळा सोबत्यांना व ज्यांची पुनर्भेट घेता अशांना आवर्जून दाखवावा. खरेदीला जाताना व प्रवास करताना या अंकाच्या प्रती सोबत न्याव्यात. मंडळीजवळ या मासिकांचा पुरेसा साठा राहावा म्हणून वडिलांनी आधीच जादा प्रती मागवल्या आहेत.
३ बायबल अभ्यास सुरु करा: मासिक देतानाच, संभाषण संपवण्याआधी तुम्ही बायबल अभ्यासाकरता पार्श्वभूमी तयार करू शकता. उदाहरणार्थ, नोव्हेंबरचा खास अंक देताना तुम्ही असे म्हणू शकता, “पुढच्या वेळी, मी तुम्हाला ‘देवाचा या पृथ्वीकरता काय उद्देश आहे?’” या प्रश्नाचे उत्तर बायबलमधून दाखवीन. मग पुनर्भेट देताना बायबल काय शिकवते हे पुस्तक सोबत न्यावे आणि घरमालकाला पृष्ठे ४-५ दाखवावे किंवा ३ ऱ्या अध्यायातील १-३ या परिच्छेदांवर चर्चा करावी. किंवा तुम्ही घरमालकाला केवळ इतके सांगू शकता: “बरेच लोक बायबल वाचतात पण त्यांना ते समजायला कठीण वाटते. बायबलमधील माहिती कशाप्रकारे अधिक स्पष्टपणे समजून घेता येईल याविषयी पुढच्या वेळी मी आपल्याला सांगेन.” पुनर्भेट देताना बायबल काय शिकवते हे पुस्तक दाखवावे आणि अभ्यास कसा घेतला जातो याचे प्रात्यक्षिक दाखवावे. ऑक्टोबर ते डिसेंबर अंक देताना तुम्ही असे म्हणू शकता: “पुढच्या वेळी आपण कौटुंबिक जीवन आनंदी बनवण्यास हातभार लावणाऱ्या बायबलमधील काही तत्त्वांविषयी चर्चा करू.” पुनर्भेटीत बायबल काय शिकवते या पुस्तकातील १४ व्या अध्यायातील परिच्छेद १ व २ वर घरमालकासोबत चर्चा करावी.
४ बायबल हे “तारणासाठी ज्ञानी” करण्यास समर्थ असणारे ‘पवित्र शास्त्र’ आहे. (२ तीम. ३:१५) म्हणूनच आपण सर्वजण, बायबलवर लोकांचा भरवसा वाढवण्याकरता सावध राहाच्या! या अंकांचे जास्तीतजास्त वितरण करण्यात आवेशाने सहभाग घेऊ या!