घोषणा
▪ साहित्य सादरता ऑगस्ट: खालीलपैकी कोणतेही ३२-पानी माहितीपत्रक द्यावे. देव खरोखरी आपली काळजी करतो का?, जागृत राहा!, तुम्ही त्रैक्य मानावे का?, नंदनवन आणविणारे सरकार, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? आणि तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी). सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करावा. घरमालकांजवळ आधीपासूनच हे पुस्तक असल्यास, थोडक्यात बायबल अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवून या पुस्तकाचा चांगला उपयोग कसा करता येईल हे त्यांना दाखवावे. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिके. घरमालकाने आस्था दाखवल्यास, तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने चर्चा करावी. नोव्हेंबर: थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी). आपल्याला मुले नाहीत, असे जर लोक म्हणाले तर जागृत राहा! माहितीपत्रक द्यावे.
▪ सप्टेंबर महिन्यात पाच शनिवार-रविवार येत असल्यामुळे हा महिना सहायक पायनियर सेवा करण्याकरता उत्तम ठरू शकेल.
▪ बहिष्कृत केलेल्यांना किंवा ज्यांनी मंडळीशी आपला संबंध तोडला आहे पण कदाचित पुन्हा मंडळीत घेतले जावे असा कल असणाऱ्यांना भेटण्याच्या संबंधाने, टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, १९९२, पृष्ठे १७-१९ वरील सूचना पाळण्याची सर्व वडिलांना आठवण करून दिली जाते.
▪ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
वॉच टावर पब्लिकेशन इंडेक्स १९९२-२००५ —अमेरिकन संकेत भाषा (अमेरिकन संकेत भाषेकरता छापलेल्या प्रकाशनांची विषय सूची असलेली ही पुस्तिका आहे.)
शिष्य करा —नेपाळी
▪ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:
थोर शिक्षकापासून शिका —इंग्रजी
यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता सुसंघटित —इंग्रजी, कन्नड, तामीळ, तेलगू, मल्याळम, हिंदी