ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
ऑगस्ट २७, २००७ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, जुलै २, ते ऑगस्ट २७, २००७ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील.
भाषणाचे गुण
१. सेवेमध्ये व मंडळीमध्ये आपण इतरांना आदर कसा दाखवू शकतो? [be पृ. १९२ परि. २-४]
२. आपण जे काही बोलत आहोत त्यावर आपला विश्वास आहे, हे जर आपल्याला दाखवायचे असेल तर काय महत्त्वाचे आहे? [be पृ. १९६ परि. १-३]
३. इतरांना साक्ष देताना व्यवहारचातुर्याचा उपयोग करण्यास आपल्याला मदत करणाऱ्या काही सूचना कोणत्या आहेत? [be पृ. १९८ परि. १-५]
४. व्यवहारकुशलतेचा उपयोग करून इतरांना साक्ष देण्यात, आपले म्हणणे बोलून दाखवण्याकरता योग्य संधी शोधणे कसे समाविष्ट आहे? (नीति. २५:११) [be पृ. १९९ परि. १-३]
५. आपण आपल्या भाषणाचा सूर सकारात्मक कसा ठेवू शकतो? [be पृ. २०३ परि. ३-पृ. २०४ परि. १]
नेमणूक क्र. १
६. यहोवाने आपल्या सर्वांसाठी आपल्या पुत्राला खंडणी म्हणून दिले आहे, या वस्तुस्थितीचा आपल्यावर कोणता प्रभाव पडला पाहिजे? [wt पृ. १८ परि. ९]
७. मत्तय ६:३१-३३ मधील येशूच्या शब्दांवरून आपण काय शिकतो? [w०५-MR ४/१ पृष्ठे ४-७]
८. पुनरुत्थानाविषयी येशूला जे सदुकी प्रश्न विचारत होते त्यांना येशूने ज्याप्रकारे उत्तर दिले त्यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? (लूक २०:३७, ३८) [be पृ. ६६ परि. ४]
९. एका विशिष्ट परिस्थितीत आपण काय करावे, असे जेव्हा एखादा बायबल विद्यार्थी अथवा एक सहउपासक तुम्हाला विचारतो तेव्हा तुम्ही त्याला कशाप्रकारे उत्तर देऊ शकता? [be पृ. ६९ परि. ४-५]
१०. “आपल्या मनोवृत्तीत नवे केले” जाण्यामध्ये काय काय गोवलेले आहे? (इफिस. ४:२३) [be पृ. ७४ परि. ४]
साप्ताहिक बायबल वाचन
११. यहेज्केल ९:२-४ मध्ये तागाचे वस्त्र ल्यालेला मनुष्य कोणास चित्रित करतो आणि “कपाळावर चिन्ह” कशास सूचित करते? [w८८-MR ११/१ पृ. १४, परि. १८]
१२. ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक पुढारी, यहेज्केल १३:३ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे “आपल्याच मनातील संदेश” देणाऱ्या ‘मूर्ख संदेष्ट्यांप्रमाणे’ कसे आहेत? [w९९-MR १०/१ पृ. १३]
१३. यहेज्केल १८:२ मध्ये लिहून ठेवण्यात आलेली “म्हण” उच्चारताना, इस्राएली लोक काय करायचा प्रयत्न करत होते आणि जाब देण्याविषयी कोणत्या महत्त्वाच्या धड्यावर जोर देण्यात आला आहे? [w८८-MR ११/१ पृ. १८, परि. १०]
१४. जेरुसलेमला वेढा पडून तिचा नाश झाला तेव्हा कोणत्या अर्थाने यहेज्केल “मुका” किंवा “स्तब्ध” झाला? (यहे. २४:२७; ३३:२२) [w०३-MR १२/१ २९]
१५. “मागोग देशातील गोग” कोण आहे आणि तो यहोवाच्या लोकांचा नाश करण्याकरता केव्हा पुढे येतो? (यहे. ३८:२, १६) [w९७-MR ३/१ पृ. १४, परि. १-पृ. १५ परि. ३]