वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०७ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००७
  • उपशिर्षक
  • ऑगस्ट १३ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २० ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २७ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर ३ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००७
km ८/०७ पृ. २

सेवा सभा आराखडा

ऑगस्ट १३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ८ (५३)

१५ मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ १० वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज, ऑगस्ट १ आणि सावध राहा! जुलै-सप्टेंबर अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एका प्रात्यक्षिकात, प्रचारक आमची राज्य सेवा याच्या या अंकाच्या पृष्ठ ५ वरील ३ ऱ्‍या परिच्छेदातील सूचनांचा उपयोग करून, घरमालकाला एक प्रश्‍न विचारतो आणि त्या प्रश्‍नाचे उत्तर तो पुढच्या आठवडी देईल असे सांगतो, असे दाखवा. “नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम” या लेखाची चर्चा करा. पुढील विभागीय संमेलनाची तारीख उपलब्ध असल्यास तिची घोषणा करा.

१५ मि: “देवाने केलेल्या मस्तकपदाच्या व्यवस्थेला अधीनता दाखवणे का फायदेकारक आहे?” आमची राज्य सेवा याच्या या अंकाच्या पृष्ठ ३ आणि ४ वरील लेखावर आधारित भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा.

१५ मि: “कुटुंब मिळून यहोवाची उपासना करणे.”a कुटुंब या नात्याने सेवेमध्ये एकत्र गेल्याने कोणते फायदे मिळाले यावर टिपणी करण्यास श्रोत्यांना आमंत्रण द्या. एक अथवा दोन टिपणींची आधीच व्यवस्था केली जाऊ शकते.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट २० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि: स्थानीय घोषणा. “नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम,” या लेखाची चर्चा करा आणि पुढील खास संमेलनाची तारीख उपलब्ध असल्यास तिची घोषणा करा.

१५ मि: सप्टेंबर महिन्यादरम्यान, पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सुरू करा. श्रोत्यांबरोबर चर्चा. सप्टेंबर महिन्यात आपण बायबल काय शिकवते पुस्तक देणार आहोत व पहिल्याच भेटीत घरमालकाबरोबर त्यातील काही परिच्छेदांची चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जानेवारी २००६ च्या आमची राज्य सेवा यातील काही सूचनांची उजळणी करा आणि पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल त्याचे एक अथवा दोन प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि: “मंडळीच्या पुस्तक अभ्यास व्यवस्थेचा आपल्याला फायदा कसा होतो?”b परिच्छेद ५ वर चर्चा करताना, सेवा पर्यवेक्षक दर आठवड्याला वेगवेगळ्या गटाला भेट देतात, या व्यवस्थेविषयी सांगा. सेवा पर्यवेक्षक शनिवार-रविवारी गटाबरोबर क्षेत्र सेवेत जातील आणि प्रचारकांना पुनर्भेटींच्या व बायबल अभ्यासाच्या संबंधाने मदत करतील, हे प्रचारकांना सांगा.

गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट २७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ११ (८५)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ १० वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज, सप्टेंबर १ आणि सावध राहा! जुलै-सप्टेंबर अंक कसे सादर करावेत त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

१० मि: ‘अनीतीकारक धनाने मित्र जोडा.’ टेहळणी बुरूज, डिसेंबर १, १९९४ अंकातील, पृष्ठे १३-१८ यातील माहितीवर आधारित वडिलांचे भाषण.

२५ मि: “नवीन सेवा वर्षाचे प्रशंसनीय ध्येय.”c अलीकडेच सहायक पायनियर म्हणून सेवा केलेल्या एक अथवा दोन बंधूभगिनींची मुलाखत घ्या. त्यांना आपल्या रोजच्या आराखड्यात कोणते बदल करावे लागले? याचा त्यांना कोणता फायदा झाला? ज्यांची मुलाखत घेण्यात आली आहे, त्यांपैकी एखादा बंधू अथवा भगिनी अशी असेल ज्यांना त्यांच्या घरच्या इतर सदस्यांच्या मदतीमुळे व पाठिंब्यामुळे सहायक पायनियरींग करणे शक्य झाले असावे. परिच्छेद ९ वर चर्चा करताना, विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीची तारीख माहीत असल्यास ती मंडळीला कळवावी.

गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर ३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ७ (५१)

१० मि: स्थानीय घोषणा आणि आमची राज्य सेवा यातून काही निवडक घोषणा. प्रचारकांना ऑगस्ट महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी.

१५ मि: “आपल्याला मिळालेल्या बहुमानांची आपण खूप कदर करतो.”d वेळ असेल तर श्रोत्यांना लेखातील वचनांवर टिपणी देण्याचे आमंत्रण द्या.

२० मि: “ज्यांना नियतकालिके दिली जातात त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास कसा सुरू करावा?”e परिच्छेद २ मधील सूचनांचा उपयोग करून एखादे संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवावे. आपण बायबल अभ्यास कसा करतो हे घरमालकाला दाखवल्यानंतर दोन वेळा तो संचालित केल्यास आणि हा अभ्यास चालू राहील अशी शक्यता वाटत असल्यास, त्याचा अहवाल घालता येतो, अशी प्रचारकांना आठवण करून द्या.

गीत क्र. २ (१५) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा