वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०७ पृ. ७
  • बहुभाषिक पत्रिकांचा संच

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बहुभाषिक पत्रिकांचा संच
  • आमची राज्य सेवा—२००७
आमची राज्य सेवा—२००७
km ६/०७ पृ. ७

बहुभाषिक पत्रिकांचा संच

१ भारतातल्या २८ राज्यांच्या १६०० पेक्षा जास्त भाषा बोलणाऱ्‍या लोकांना सुवार्ता सांगण्याचे आव्हानात्मक कार्य आपल्यासमोर आहे. (मत्त. २४:१४; प्रकटी. ७:९) बरेच प्रचारक ही जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडतात. ते स्थानिक भाषा बोलणाऱ्‍या लोकांनाच नव्हे तर आपल्या क्षेत्रात राहणाऱ्‍या ‘निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍या’ लोकांना देखील परिणामकारक रितीने साक्ष देतात. कदाचित तुम्हालाही अनेक भाषा बोलता येत असतील किंवा हिंदी व इंग्रजी यांसारख्या बहुतेक लोकांना समजणाऱ्‍या भाषांतून तुम्ही लोकांशी संवाद साधत असाल. नाहीतर, आवश्‍यकतेनुसार तुम्ही सर्व राष्ट्रांतील लोकांकरता सुवार्ता या पुस्तिकेचा वापर करत असाल व असे केल्याने तुम्हाला चांगले परिणामही दिसून आले असतील.

२ भारतात २६ भाषांतून बायबलचे साहित्य पुरवण्याद्वारे दृश्‍य संघटना जे साहाय्य आपल्याला पुरवते त्याची आपण कदर करतो. तरीपण, सुवार्तेबद्दल आस्था दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीच्या भाषेत कोणतेही प्रकाशन आपल्याजवळ नसते, किंवा मंडळीच्या साठ्यातही नसते तेव्हा आपण वैफल्यग्रस्त होतो. जो कोणी आस्था व्यक्‍त करतो त्याला नीट वाचता येईल अशा भाषेत बायबलचे एखादे प्रकाशन देता आले तर आपल्याला किती समाधान वाटेल, नाही का?

३ हे साध्य करता यावे म्हणून, मंडळ्या आता वॉचटावर पब्लिकेशन्स लिस्टवर सूचिबद्ध असलेल्या सर्व भाषांतून थोड्या प्रमाणात पत्रिका मागवू शकतात. तसेच चिनी, पर्शियन व फ्रेंच यांसारख्या इतर विदेशी भाषांपेक्षा जास्त सामान्य असणाऱ्‍या भाषांतूनही पत्रिका मागवू शकतात. प्रत्येक प्रचारक मग नेहमीच्या भाषांसोबतच, आपल्या क्षेत्रात ज्या ज्या भाषांचे लोक भेटण्याची शक्यता आहे त्या त्या भाषांतील पत्रिकांचा संच तयार करू शकतात. अशारितीने ते एकूण १०, १५ किंवा २० वेगवेगळ्या भाषांतील पत्रिकांचा संच सेवाकार्यात जवळ बाळगू शकतात. मंडळीची सेवा समिती वॉचटावर पब्लिकेशन्स लिस्ट पडताळून आपल्या क्षेत्राच्या गरजेनुसार या ‘संचात’ कोणकोणत्या अतिरिक्‍त भाषांचा आणि कोणत्या विशिष्ट पत्रिकेचा समावेश करता येईल हे ठरवू शकते.

४ प्रचारकांनी आपल्या वैयक्‍तिक संचातून एखाद्या भाषेतील पत्रिका दिल्यास, मंडळीजवळ असलेल्या मर्यादित साठ्यातून ती विशिष्ट प्रत घेऊन ते आपल्या संचात परत ठेवू शकतात. अशारितीने त्यांच्याजवळ क्षेत्र सेवेत वापरण्याकरता सर्व भाषेतील पूर्ण संच नेहमी राहील. शिवाय, आपले कार्य किती विस्तारित व निःपक्ष स्वरूपाचे आहे तसेच, सर्व भाषा व वंशांच्या लोकांना सुवार्ता सांगण्याची जबाबदारी आपण किती गांभीर्याने पार पाडतो हे दाखवण्याकरता आपण निरनिराळ्या भाषांतील पत्रिकांचा तो संपूर्ण संच घरमालकाला दाखवू शकतो.

५ या संचातील काही पत्रिका फार क्वचित उपयोगात आणाव्या लागतील त्यामुळे त्या क्षेत्रसेवेच्या बॅगेत विशेष काळजीपूर्वक ठेवल्या पाहिजेत. ही काळजी घेतल्यास, त्या बऱ्‍याच काळपर्यंत नीटनेटक्या राहतील आणि आपण जो संदेश सांगतो त्याला ‘शोभा आणतील.’ (तीत २:१०) काही पत्रिका जुनाट दिसत असल्यास किंवा फाटल्यास त्या प्रती टाकून द्याव्यात व त्यांऐवजी नवीन प्रती संचात ठेवाव्यात.

६ दर वर्षी भारतातील शाखा दप्तर २६ वेगवेगळ्या भाषांतून ४६,००,००० पेक्षा जास्त पत्रिका मुद्रित करते. सर्व भाषा बोलणाऱ्‍या अधिकाधिक लोकांना आपल्यासोबत यहोवाचे उपासक होण्याकरता मदत करण्यासाठी आपण या पत्रिकांचा पुरेपूर वापर करू या.—यश. २:२, ३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा