ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
जून २५, २००७ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, मे ७, ते जून २५, २००७ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]
भाषणाचे गुण
१. बोलताना तणाव कमी करण्याद्वारे आपला आवाज सुधारण्याकरता आपण काय करू शकतो? [be पृ. १८५ परि. १-३]
२. सेवाकार्यात आपण “सर्वांना सर्व काही” कशाप्रकारे होऊ शकतो? (१ करिंथ. ९:२०-२३) [be पृ. १८६ परि. २-४]
३. इतरांचे ऐकून घेण्याच्या बाबतीत आपण यहोवाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतो? (उत्प. १८:२३-३३; १ राजे २२:१९-२२) [be पृ. १८७ परि. १-२, ५]
४. कोणत्या व्यावहारिक मार्गांनी आपण इतरांना आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करू शकतो? [be पृ. १८७ परि. ६-पृ. १८८ परि. ३]
५. आपण इतरांना आदर दाखवण्याविषयी जागरूक का असावे? [be पृ. १९० परि. ३, चौकोन]
नेमणूक क्र. १
६. आपण ज्यांना शिकवतो त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोचण्याचा आपण का प्रयत्न केला पाहिजे? [be पृ. ५९ परि. १]
७. आपण ज्यांना शिकवतो त्यांच्यावर आपल्या वागणुकीचा कितपत परिणाम होतो? [be पृ. ६१ परि. १]
८. आपण घरात आपले संभाषण कौशल्य कसे विकसित करू शकतो? [be पृ. ६२ परि. ३]
९. पौलाने इफिसकर १:९, १० यात उल्लेख केलेल्या ‘व्यवस्थेचा’ काय उद्देश आहे? [wt पृ. १८६ परि. ६]
१०. कोणत्या गोष्टी ख्रिस्ती एकतेला हातभार लावतात? [wt पृ. ९ परि. १०]
साप्ताहिक बायबल वाचन
११. यिर्मया ३७:२१ यात वर्णन केल्याप्रमाणे यिर्मयाला जो अनुभव आला त्यावरून आपल्याला कोणते आश्वासन मिळते?
१२. यहोवाने “माझ्या क्लेशात दुःखाची भर घातली आहे” आणि त्यामुळे “मी कण्हून कण्हून थकलो” असे बारूखने का म्हटले असावे आणि या समस्येप्रती बारूखची सुरुवातीला कशी प्रतिक्रिया होती? (यिर्म. ४५:१-५)
१३. बॅबिलोन केव्हा निर्जन आणि “अगदी ओसाड” झाले? (यिर्म. ५०:१३)
१४. विलापगीत ३:८, ९, ४२-४५ यात प्रार्थनेच्या संदर्भात कोणते तत्त्व स्पष्ट केले आहे?
१५. यहेज्केल अध्याय १ यात वर्णन केलेला रथ कशास सूचित करतो?