घोषणा
▪ साहित्य सादरता जून: कौटुंबिक सौख्यानंद हे पुस्तक सादर करावे. जुलै व ऑगस्ट: खालीलपैकी कोणतेही ३२-पानी माहितीपत्रक द्यावे. देव खरोखरी आपली काळजी करतो का?, जागृत राहा!, तुम्ही त्रैक्य मानावे का?, नंदनवन आणविणारे सरकार, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? आणि तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी). सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करावा. घरमालकांजवळ आधीपासूनच हे पुस्तक असल्यास, थोडक्यात बायबल अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवून या पुस्तकाचा चांगला उपयोग कसा करता येईल हे त्यांना दाखवावे.
▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने मार्च, एप्रिल व मे महिन्याचा मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. हिशेब तपासणी पूर्ण झाल्यानंतर, मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.—इंस्ट्रक्शन्स फॉर काँग्रिगेशन अकाउंटिंग (S-27) यातील माहिती पडताळून पाहावी.
▪ स्पेशल रिक्वेस्ट फॉर्म फॉर ॲन्युअल आयटम्स हा फॉर्म सर्व मंडळ्यांना पाठवण्यात येत आहे. ज्या मंडळ्यांनी अद्यापही २००८ सालाकरता वार्षिक पुस्तक व शास्त्रवचनांचे परीक्षण करणे यांसारखे साहित्य मागवलेले नसेल त्यांनी आपली मागणी ताबडतोब पाठवावी. किंग्डम हॉल लिटरेचर इन्व्हेंटरी अरेंजमेंट या व्यवस्थेखाली येणाऱ्या मंडळ्यांनी “कोऑर्डिनेटिंग काँग्रिगेशन”ची भूमिका निभावणाऱ्या मंडळीतर्फेच मागण्या पाठवाव्यात. या मंडळीच्या सचिवांनी आपापल्या साहित्य गटातील प्रत्येक मंडळीला लागणारे साहित्य मागवण्यात आले आहे याची खात्री करावी.
▪ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:
सर्व लोकांकरता एक पुस्तक —कन्नड, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, मल्याळम, हिंदी