वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०७ पृ. १
  • “तो थकलेल्याला शक्‍ती देतो”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तो थकलेल्याला शक्‍ती देतो”
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा थकलेल्यांना बळ देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवा थकलेल्यांस सामर्थ्य देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • शक्‍ती संपादीत करणे, गळून न जाणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • “तो थकलेल्याला शक्‍ती देतो”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km ५/०७ पृ. १

“तो थकलेल्याला शक्‍ती देतो”

१ आपण सर्व, अधूनमधून खूप थकतो. कामामुळे अथवा इतर शारीरिक कार्यांमुळेच नव्हे तर ‘शेवटल्या काळच्या कठीण दिवसांमुळे’ आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्‍या समस्यांमुळे देखील कदाचित आपण थकू. (२ तीम. ३:१) यहोवाचे सेवक या नात्याने सेवेमध्ये मंद पडू नये म्हणून आपण आध्यात्मिक शक्‍ती कशी प्राप्त करतो? जो “प्रबळ” आहे त्याच्यावर अर्थात यहोवावर आपण विसंबून राहतो. (यश. ४०:२६) त्याला आपल्या गरजांची जाणीव आहे आणि आपल्याला मदत करण्याची त्याची मनापासून इच्छा आहे.—१ पेत्र ५:७.

२ यहोवाच्या तरतूदी: यहोवाने विश्‍वाची उत्पत्ती करण्याकरता ज्या महाशक्‍तीचा उपयोग केला होता त्याच पवित्र आत्म्याच्या शक्‍तीद्वारे तो आपल्याला बळ देतो. आपण थकतो तेव्हा देवाचा आत्मा आपल्याला “नवीन शक्‍ति संपादन” करण्यास मदत करतो. (यश. ४०:३१) स्वतःला विचारा: ‘माझी ख्रिस्ती जबाबदारी पूर्ण करण्यास मला शक्‍ती मिळावी म्हणून मी विशिष्टपणे पवित्र आत्म्यासाठी शेवटी केव्हा बरे प्रार्थना केली होती?’—लूक ११:११-१३.

३ देवाच्या प्रेरित वचनाचे दररोज वाचन करून व त्यावर मनन करून तसेच आपल्या ख्रिस्ती प्रकाशनांचा नियमित अभ्यास करण्याद्वारे आध्यात्मिक पोषण प्राप्त करून आपण त्या हिरव्याकंच झाडाप्रमाणे होऊ जे “पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत.”—स्तो. १:२, ३.

४ आपल्याला शक्‍ती देण्याकरता यहोवा बंधूभगिनींचा देखील उपयोग करतो जे आपल्याला “आधार” देतात. (कलस्सै. ४, १०, ११, ईजी टू रीड व्हर्शन.) मंडळीच्या सभांमध्ये, आपल्याबरोबर उभारणीकारक गोष्टी बोलण्याद्वारे, उत्तरे व भाषणे देण्याद्वारे हे बंधूभगिनी आपल्याला आधार किंवा बळ देतात. (प्रे. कृत्ये १५:३२) ख्रिस्ती वडील खासकरून आपल्याला आध्यात्मिक साहाय्य देतात आणि तजेलदायक उत्तेजन देतात.—यश. ३२:१, २.

५ ख्रिस्ती सेवा: तुम्ही प्रचार करून करून खूप थकला आहात, असे जर तुम्हाला वाटत असेल तर प्रचारकार्य थांबवू नका! इतर अनेक कार्यांप्रमाणेच, प्रचारकार्यात नियमित भाग घेतल्याने खरे तर तुम्हाला तजेला मिळेल. (मत्त. ११:२८-३०) आपण इतरांना सुवार्ता सांगतो तेव्हा, आपल्याला देवाच्या राज्यावर आपले लक्ष केंद्रित करण्यास व आपल्यापुढे असलेल्या सार्वकालिक जीवनाची व त्याबरोबर मिळणाऱ्‍या आशीर्वादांची आशा बाळगण्यास मदत होते.

६ या दुष्ट व्यवस्थिकरणाचा नाश होण्याआधी पुष्कळ काही करणे बाकी आहे. आपल्या सेवेत स्थिर राहण्याकरता व ‘देवाने दिलेल्या शक्‍तीवर अवलंबून’ राहण्याकरता आपल्याजवळ अनेक कारणे आहेत. (१ पेत्र ४:११) यहोवाच्या मदतीने आपण आपले कार्य अवश्‍य पूर्ण करू कारण “तो थकलेल्याला शक्‍ती देतो.”—यश. ४०:२९, पं.र.भा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा