मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज एप्रि. १
“अलीकडील वर्षांत बऱ्याच लोकांनी देवदूतांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे. तुम्ही कधी देवदूतांविषयी किंवा त्यांचा आपल्या जीवनावर कितपत प्रभाव आहे याविषयी विचार केला आहे का? [उत्तर ऐकून घ्या. मग स्तोत्र ३४:७ वाचा.] या मासिकात भूतकाळात, वर्तमानकाळात व भविष्यकाळात देवदूतांच्या कार्याविषयी बायबलमध्ये काय सांगितले आहे याविषयी चर्चा केली आहे.” पृष्ठ १२ वरील लेख दाखवावा.
सावध राहा! एप्रि.-जून
“रोगराई दूर करण्याकरता वैद्यकीय शास्त्राने बरीच प्रगती केली आहे, पण जगातून रोगराई पूर्णपणे नाहीशी झालेली आपण कधी पाहू शकू असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] या मासिकात स्पष्ट केले आहे की कशाप्रकारे एक दिवस असा येईल की जेव्हा प्रत्येकाला या भविष्यवाणीनुसार परिपूर्ण आरोग्य लाभेल.” यशया ३३:२४ वाचा.
टेहळणी बुरूज मे १
“क्रूर कृत्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहेत असे दिसते. [एखादे स्थानिक उदाहरण किंवा मासिकातले एखादे उदाहरण सांगा.] लोक इतके क्रूर कसे असू शकतात असा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का? [उत्तर ऐकून घ्या.] बायबलमध्ये भाकीत करण्यात आल होते की शेवटल्या काळी लोक क्रूर होतील. [२ तीमथ्य ३:१-५ वाचा.] या मासिकात, ‘क्रूरतेचा कधी अंत होईल का?’ या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.”
सावध राहा! एप्रि.-जून
“बऱ्याच लोकांना असे वाटते की नम्रपणा हे दुबळेपणाचे चिन्ह आहे. तुम्हाला काय वाटते हे खरे आहे का? [उत्तर ऐकून घ्या. मग नीतिसूत्रे २२:४ वाचा.] या मासिकात, बायबल या गुणाविषयी काय सांगते याविषयी चर्चा केली आहे.” पृष्ठ २० वर सुरू होणारा लेख दाखवा.