वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०७ पृ. ९
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००७
आमची राज्य सेवा—२००७
km ३/०७ पृ. ९

घोषणा

▪ साहित्य सादरता मार्च: बायबल काय शिकवते हे पुस्तक सादर करावे आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करावा. बायबल काय शिकवते पुस्तकासोबत तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका द्यावी. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिकांच्या प्रती. आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तींची, किंवा स्मारकविधी व इतर विशेष सभांना उपस्थित राहणाऱ्‍या पण मंडळीसोबत सक्रिय नसणाऱ्‍या व्यक्‍तींची पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते हे पुस्तक देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. जून: सृष्टिकर्ता (इंग्रजी) किंवा कौटुंबिक सौख्यानंद हे पुस्तक सादर करावे.

▪ मंडळ्यांना टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या नव्या प्रती मिळताच त्या लवकरात लवकर प्रचारकांना द्याव्यात. यामुळे क्षेत्र सेवेत ती मासिके सादर करण्याआधी त्यांना त्यातील माहितीशी परिचित होण्याची संधी मिळू शकेल.

▪ कोणताही प्रचारक परदेशात जाऊन स्थाईक होतो तेव्हा मंडळीच्या सेवा समितीने लवकरात लवकर शाखा दफ्तराला याची सूचना द्यावी. त्यांनी प्रचारकाचा नवा पत्ता, त्याच्याशी संपर्क साधण्याकरता सर्व आवश्‍यक माहिती आणि शक्य असल्यास तो ज्या मंडळीचा सदस्य बनणार आहे त्या मंडळीचे नाव देखील पाठवावे. या माहितीसह त्या व्यक्‍तीचे प्रचारक कार्ड आणि तिची ओळख करून देणारे पत्र शाखा दफ्तराला पाठवण्यात यावे, जेणेकरून ही माहिती त्या क्षेत्राच्या कार्याची देखरेख करणाऱ्‍या शाखा दप्तराला पाठवली जाऊ शकेल. प्रचारक नव्या ठिकाणी जाताच ही माहिती मंडळीने शाखा दफ्तराला पाठवावी. प्रचारकाच्या नव्या मंडळीने विनंती करीपर्यंत त्यांनी थांबू नये. (आमची राज्य सेवा फेब्रुवारी १९९१ अंकातील प्रश्‍नपेटी पाहावी.) ओळख करून देणाऱ्‍या पत्रांच्या संदर्भात अधिक माहितीकरता जुलै १, २००६ तारखेचे सर्व वडील वर्गांना पाठवलेले इंग्रजीतील पत्र पाहावे.

▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने डिसेंबर, जानेवारी, व फेब्रुवारी महिन्याचा मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. हिशेब तपासणी पूर्ण झाल्यानंतर, मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.—इंस्ट्रक्शन्स फॉर काँग्रिगेशन अकाउंटिंग (S-27) यातील माहिती पडताळून पाहावी.

▪ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:

यहोवाचे गुणगान गा—फक्‍त गीतांचे बोल —मल्याळम

समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? —तामीळ, मल्याळम, हिंदी

जागृत राहा! —आसामी, इंग्रजी, कन्‍नड, गुजराती, तामीळ, तेलगू, बंगाली, मराठी, मल्याळम, हिंदी

देवाचे मार्गदर्शन—नंदनवनाकडे नेणारा मार्ग —उर्दू

देव आपल्याकडून काय अपेक्षितो? —उर्दू

सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार! (पत्रिका क्र. २७) —उर्दू

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा