सेवा सभा आराखडा
मार्च १२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ १० वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असणाऱ्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज मार्च १ आणि सावध राहा! जानेवारी ते मार्च अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.
१५ मि: आपली एखादी प्रिय व्यक्ती यहोवाला सोडून देते तेव्हा. आमची राज्य सेवा ऑगस्ट २००२ अंकातील पृष्ठे ३ व ४ वर आधारित वडिलांचे भाषण.
२० मि: “माझ्या स्मरणार्थ हे करा.”a तिसऱ्या परिच्छेदावर चर्चा करताना आमची राज्य सेवा मार्च २००६ अंकातील १ ल्या पृष्ठावरील ३ ऱ्या परिच्छेदातून स्मारकविधीचे निमंत्रण देताना बायबल काय शिकवते या पुस्तकातून स्मारकविधीच्या महत्त्वाविषयी आपण एखाद्या व्यक्तीला कसे समजावू शकतो यावर काही मुद्द्यांचा समावेश करावा.
गीत क्र. ८ (५३) आणि समाप्तीची प्रार्थना.
मार्च १९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २२ (१३०)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ९ वरील “स्मारकविधीकरता सूचना” या चौकटीतील मुख्य मुद्द्यांची उजळणी करावी.
२० मि: आपले सेवाकार्य वाढवण्याचे काही मार्ग. पुरवणीवर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा.
१५ मि: “उत्तरे द्या पाहू.”b या सदराचा अधूनमधून कौटुंबिक अभ्यासात कशाप्रकारे उपयोग करता येईल याचे एक लहानसे प्रात्यक्षिक दाखवावे.
गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.
मार्च २६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २३ (२००)
१० मि: स्थानीय घोषणा. मार्च महिन्याचा सेवा अहवाल देण्याची प्रचारकांना आठवण करून द्यावी. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ १०वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असणाऱ्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज एप्रिल १ आणि सावध राहा! एप्रिल ते जून अंक व त्यासोबत स्मारकविधीची खास निमंत्रणपत्रिका कशी सादर करायची त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.
१५ मि: स्थानिक गरजा.
२० मि: मी आपल्या जीवनाचा कसा उपयोग करावा? आमची राज्य सेवा एप्रिल २००२ अंकातील पृष्ठ ४ वरील माहितीच्या आधारावर भाषण. शालेय शिक्षण संपल्यावर पूर्ण वेळेचे सेवाकार्य सुरू केलेल्या एखाद दोन व्यक्तींची मुलाखत घ्यावी. त्यांनी पूर्ण वेळेचे सेवाकार्य का निवडले? त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?
गीत क्र. २६ (२१२) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ४ (४३)
१० मि: स्थानिक घोषणा. टेहळणी बुरूज एप्रिल १, २००७ अंकाच्या मागील पृष्ठावर आढळणाऱ्या निमंत्रणाची उजळणी करावी आणि एप्रिल १५ रोजी दिल्या जाणाऱ्या खास जाहीर भाषणाकरता आस्थेवाईक लोकांना निमंत्रित करण्याचे प्रचारकांना प्रोत्साहन द्यावे.
२० मि: स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्यांना साहाय्य करत राहणे. वडिलांचे भाषण. स्थानिक मंडळीत स्मारकविधीकरता किती लोक उपस्थित होते याची घोषणा करावी आणि यांपैकी आस्थेवाईक लोक किती होते हे सांगावे. स्मारकविधीची खास निमंत्रण पत्रिका देताना किंवा स्मारकविधीला उपस्थित राहिल्यानंतर बायबल अभ्यासाची विनंती करण्याकरता परिचारकांना येऊन भेटलेल्या काही व्यक्तींचा खास अनुभव असल्यास तो सांगावा. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या व्यक्तींना आणखी आध्यात्मिक साहाय्य कसे देता येईल याविषयी सांगावे. (km-MR ३/०६, पृ. १, परि. ५; km-MR २/०५ पृ. ४, परि. ९; km-MR २/०४, पृ. ५, परि. १६ कृपया पाहावे.) प्रचारकांना या आस्थेवाईक लोकांना लवकरात लवकर पुनर्भेट देण्याचे प्रोत्साहन द्यावे.
१५ मि: “नियमन मंडळाकडून पत्र” या भागाची उजळणी करावी.
गीत क्र. २ (१५) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.