ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
डिसेंबर २५, २००६ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, नोव्हेंबर ६, ते डिसेंबर २५, २००६ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]
भाषणाचे गुण
१. कोणकोणत्या गोष्टींच्या आधारावर तुम्ही एखाद्या शास्त्रवचनाचा उल्लेख करू शकाल? [be पृ. १४८ परि. ४-पृ. १४९ परि. १]
२. कोणत्या काही पद्धती आहेत ज्यांचा उपयोग आपण शब्दांवर व वाक्यांशावर उचित जोर देण्यासाठी करू शकतो? [be पृ. १५१ परि. ४-पृ. १५२ परि. ३]
३. इतरांना देवाचे वचन शिकवणे ही एक गंभीर गोष्ट असल्यामुळे, आपण जर ‘सत्याचे वचन नीट सांगू’ इच्छित असू तर आपण काय केले पाहिजे? (२ तीम. २:१५) [be पृ. १५३ परि. १-३, चौकोन; पृ. १५४ परि. १-२]
४. आपण जी वचने वाचतो ती कशी लागू करता येतील हे आपण स्पष्ट शब्दांत कसे सांगू शकतो? [be पृ. १५४ परि. ४-पृ. १५५ परि. ३]
५. आपल्या साहित्याचे पालन करण्याचे फायदे स्पष्ट सांगणे का महत्त्वाचे आहे आणि कोणते काही मार्ग आहेत ज्यांद्वारे आपण असे करू शकतो? [be पृ. १५७ परि. १-४, चौकोन; पृ. १५८ परि. १]
नेमणूक क्र. १
६. यहोवा आज आपल्याला शिस्त कशी लावतो? [wt पृ. १४३ परि. १६]
७. आपल्या आध्यात्मिक बहिणीच्या अथवा भावाच्या एखाद्या कार्यामुळे तुम्ही नाराज झाला आहात तर अशावेळी काय केले पाहिजे? [wt पृ. १४७ परि. ८]
८. कोणत्या काही कारणांमुळे काही विवाह टिकून राहिले आहेत? [wt पृ. १५२-३ परि. ४]
९. आरंभीच्या ख्रिश्चनांनी कसे दाखवले की ते जगाचा आत्मा टाळत होते परंतु लोकांवर त्यांचे प्रेम होते? [wt पृ. १६१ परि. ६]
१०. वक्ते लांबलचक नोट्स घेण्याचे कसे टाळू शकतात? [be पृ. ४२ परि. १]
साप्ताहिक बायबल वाचन
११. “परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना सर्व काही समजते,” हे कसे? (नीति. २८:५)
१२. “मूर्ख श्रम करूनकरून थकतो” हे कसे? (उप. १०:१५)
१३. शुलेमकरीण कोणत्या अर्थाने ‘बंद असलेल्या बागेसारखी’ होती व ती आज अविवाहित ख्रिस्ती स्त्रीयांसाठी एक उत्तम उदाहरण कशी आहे? (गीत. ४:१२)
१४. “चला, या आपण बुद्धिवाद करू” असे इस्राएली लोकांना आमंत्रण देऊन यहोवा हे सूचित करत होता का, की तो आपल्या लोकांबरोबर समझोता करण्यास तयार होता? (यश. १:१८अ)
१५. यशया ११:६-९ या वचनांची पूर्णता प्राचीन काळांत कशी झाली आणि मोठी पूर्णता केव्हा होणार आहे?