सेवा सभा आराखडा
डिसेंबर ११ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २२ (१३०)
१० मि:स्थानीय घोषणा. पृष्ठ १२ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असणाऱ्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज डिसेंबर १ आणि सावध राहा! ऑक्टोबर ते डिसेंबर अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एका प्रात्यक्षिकात ‘मला आस्था नाही’ असे म्हणून संभाषणाला खीळ घालू पाहणाऱ्याला कसे उत्तर देता येईल हे दाखवावे.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पृ. ८ पाहावे.
१५ मि:सन २००७ साठी ईश्वरशासित सेवा प्रशाला. प्रशाला पर्यवेक्षकांचे भाषण व मुलाखती. ऑक्टोबर महिन्याच्या आमची राज्य सेवा यातल्या पुरवणीतून, मंडळीला लागू होणाऱ्या मुद्द्यांची चर्चा करा. विद्यार्थ्याला कोणत्या भाषण गुणात सुधारणा करायची आहे, याची आगाऊ घोषणा प्रशाला पर्यवेक्षक करत नाहीत. यशया २४ पासून संपूर्ण मलाखीपर्यंतच्या इब्री शास्त्रवचनांचे २००७ सालादरम्यान आपले वाचन करून होणार असल्यामुळे, ज्या बांधवांना बायबल वाचनावरील ठळक मुद्दे हा भाग मिळेल त्यांना व उत्तरे देणाऱ्या प्रचारकांना, या भविष्यसूचक पुस्तकांवर प्रकाश टाकणाऱ्या लेखांचा चांगला उपयोग करण्याची संधी आहे. श्रोत्यांतील, एक नवीन विद्यार्थी, एक तरुण विद्यार्थी जो चांगली प्रगती करत आहे आणि एक अनुभवी विद्यार्थी अशा दोन अथवा तीन प्रचारकांची मुलाखत घ्या. प्रशालेचा त्यांच्या सेवेवर आणि त्यांच्या आध्यात्मिकतेवर कोणता परिणाम झाला आहे हे सांगण्यास त्यांना आमंत्रित करा. सर्वांना आपल्या नेमणूका काळजीपूर्वक पार पाडण्याचे, बायबल वाचनावरील ठळक मुद्दे या भागात उत्तरे देण्याचे आणि ईश्वरशासित सेवा प्रशाला प्रशिक्षणाचा फायदा घेणे (इंग्रजी) यांतून दिल्या जाणाऱ्या सूचनांचा अवलंब करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
२० मि:“आपली पहिली प्रीति सोडू नका.”a वेळ असेल तर श्रोत्यांना उद्धृत शास्त्रवचनांवर टिपणी देण्यास आमंत्रित करा.
गीत क्र. १८ (१६२) आणि समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर १८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २० (९३)
१० मि:स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. प्रश्न पेटीवर चर्चा करा. डिसेंबर २५ आणि जानेवारी १ या तारखांना खास क्षेत्र सेवेच्या व्यवस्था करण्यात आल्या असतील तर त्यांची घोषणा करावी.
१५ मि:“थोडीशीही आवड दाखवतात, अशा सर्वांची पुन्हा भेट घ्या.”b अनौपचारिक साक्षकार्य करताना किंवा रस्त्यावरील साक्षकार्य करताना राज्य संदेशात आवड दाखवणाऱ्यांकडून संपर्क माहिती कशी मिळवता आली आणि अशा लोकांना पुनर्भेट देताना आलेला उल्लेखनीय अनुभव सांगण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा. आधीच एक दोघांच्या टिपणींची व्यवस्था करू शकता.
२० मि:“मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे आशीर्वाद मिळतात.”c मदत करण्याची प्रवृत्ती म्हणून नावाजलेल्या एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. त्यांनी मदत करण्याची प्रवृत्ती कशी दाखवली आहे? यासाठी त्यांना कोणते फेरबदल करावे लागतात व हे बदल ते कसे करतात? यामुळे त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले?
गीत क्र. ५ (४६) आणि समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर २५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २३ (२००)
१० मि:स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ १२ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असणाऱ्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज जानेवारी १ आणि सावध राहा! जानेवारी ते मार्च अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. प्रत्येक प्रात्यक्षिकाच्या शेवटी, बायबल काय शिकवते पुस्तकाच्या आधारावर उत्तर देता येईल असा घरमालकाला विचार करायला प्रवृत्त करेल असा प्रश्न विचारा.
१५ मि:स्थानीय गरजा.
२० मि:“तुमच्याकडे वैयक्तिक क्षेत्र आहे का?”d मंडळीच्या क्षेत्र सेवेची हद्द कोठवर आहे, हे क्षेत्र कितींदा उरकले जाते आणि प्रचारकांना वैयक्तिक क्षेत्र घेण्याची शक्यता आहे की नाही यावर सेवा पर्यवेक्षक संक्षिप्त टिपणी देऊ शकतात.
गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १५ (१२७)
सूचना: जानेवारी १ सप्ताहाची सेवा सभा, विभागीय पर्यवेक्षकांची भेट असेल तर बदलावी अन्यथा बदलू नये. सर्व मंडळ्यांमध्ये, अधिवेशनसंबंधित पुरवणीची चर्चा दिलेल्या तारखेलाच व्हावी. उपलब्ध हॉटेल्सची यादी मंडळीला पाठवल्याबरोबर ती राज्य सभागृहातील सूचना फलकावर लावण्यात यावी. या आठवड्यात विभागीय संमेलन असेल तर पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी त्यांच्या नेहमीच्या पुस्तक अभ्यासांत, अधिवेशनाच्या ठिकाणांची व तारखांची उपस्थितांना माहिती द्यावी. हॉटेल्सच्या यादींच्या जादा प्रती असतील तर एकेक प्रत प्रत्येक मंडळीच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना देण्यात यावी जेणेकरून या गटात उपस्थित राहणारे प्रचारक, आरक्षणाकरता हॉटेल्सचे फोननंबर लिहून घेऊ शकतील. परंतु प्रचारकांसाठी यादींच्या अनेक प्रती बनवू नयेत.
५ मि:स्थानिक घोषणा. प्रचारकांना नोव्हेंबर महिन्याचा क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी.
१५ मि:सेवाकार्यातील प्रगतीचा अहवाल. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता सुसंघटित या पुस्तकातील पृष्ठे ८३ वरील पोटमथळ्यापासून अध्यायाच्या शेवटपर्यंत असलेल्या माहितीच्या आधारावर भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा.
२५ मि:“‘ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला’ २००७ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन.”e मंडळीच्या सचिवांनी हा भाग हाताळावा. पुरवणीची चर्चा सुरू करायच्या आधी, डिसेंबर १५, २००६ तारखेचे अधिवेशन नेमणूक पत्र वाचावे. पुरवणीतल्या ८ व्या परिच्छेदाची चर्चा करताना “हॉटेलमध्ये आरक्षण करण्यासंबंधी सूचना” या पेटीतील प्रत्येक मुद्दा वाचा. सर्वांना शक्य तितक्या लवकर अधिवेशनाच्या तयारीला लागण्याचे उत्तेजन द्या.
गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.