वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०६ पृ. ११
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००६
आमची राज्य सेवा—२००६
km १२/०६ पृ. ११

घोषणा

▪ साहित्य सादरता डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करावे. याव्यतिरिक्‍त मंडळीकडे साठा असल्यास, बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा तुम्ही या पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तकेही सादर करता येतील. जानेवारी: पिवळ्या पडणाऱ्‍या कागदावर छापलेले अथवा १९९१ सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक सादर करावे. जर मंडळीत यांपैकी कोणत्याही पुस्तकांचा साठा नसल्यास, ज्ञान पुस्तक किंवा जागृत राहा! माहितीपत्रक सादर करावे. फेब्रुवारी: यहोवाच्या जवळ या (इंग्रजी) हे पुस्तक सादर केले जाईल. जर हे पुस्तक उपलब्ध नसेल तर प्रकटीकरणाचा कळस किंवा ज्याचा ज्यादा साठा आहे असे जुने प्रकाशन सादर करावे. मार्च: बायबल काय शिकवते हे पुस्तक सादर करावे आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करावा. बायबल काय शिकवते पुस्तकासोबत तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका द्यावी.

▪ प्रत्येक मंडळीच्या प्रमुख भाषेत २००७ सालाच्या स्मारकविधीच्या आमंत्रणपत्रिका लवकरच सर्व मंडळ्यांना पाठवल्या जातील. तुमच्या क्षेत्रात इतर भाषा बोलल्या जात असतील आणि तुम्हाला त्या भाषेत आमंत्रणपत्रिकांचा साठा हवा असेल तर लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवर (S-14) यांची मागणी लवकरात लवकर करावी. तुमच्या क्षेत्रात ज्या भाषेत आमंत्रण पत्रिका लागतात त्याच भाषांसाठी मागणी पाठवावी. ही आमंत्रण पत्रिका आसामी, इंग्रजी, कन्‍नड, गुजराती, तमिळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मराठी, मल्याळम, मिझो आणि हिंदी भाषांत उपलब्ध आहे.

▪ २००८ सालाचा स्मारकविधी शनिवार, मार्च २२, या तारखेला, सूर्यास्तानंतर होईल, याची कृपया नोंद घ्यावी. जेथे अनेक मंडळ्या एकच राज्य सभागृह वापरतात तेथील बांधवांना हॉल बुक करण्यासाठी किंवा इतर कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही आगाऊ सूचना दिली जात आहे. स्मारक विधी शांतीने आणि सुव्यवस्थितपणे पार पडावा म्हणून भाड्याने घेतलेल्या सभागृहाच्या इमारतीत त्या दिवशी इतर कोणत्या कार्यक्रमामुळे गडबड किंवा गोंधळ होऊ नये, याविषयी वडिलांनी सभागृहाच्या व्यवस्थापन अधिकाऱ्‍यांना आधीच सांगावे. ही सभा अतिशय महत्त्वाची असल्यामुळे याप्रसंगी भाषण कोण देणार हे ठरवताना वडील वर्गाने दर वर्षी आलटून पालटून भाषण देण्यापेक्षा किंवा दर वर्षी एकाच बांधवाने भाषण देण्यापेक्षा उत्तम वक्‍त्‌याची निवड करावी. अभिषिक्‍तांपैकी एक अनुभवी बांधव भाषण देण्याकरता उपलब्ध असल्यास त्यांची निवड केली जावी.

▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

यहोवाचा दिवस मनात बाळगून जगणे —इंग्रजी

पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर—मऊ पुठ्ठ्याच्या बांधणीचे लहान आकाराचे इंग्रजी बायबल काळ्या व किरमिजी रंगात उपलब्ध आहे. हे लहान आकाराचे बायबल जनतेकरता व प्रचारकांकरता देखील उपलब्ध आहे. कृपया अधिक माहितीसाठी आमच्या ऑगस्ट १, २००५ तारखेचे पत्र पाहा.

टेहळणी बुरूज प्रकाशन सूची २००१-२००५ —इंग्रजी

बायबल नेमके काय शिकवते? —फ्रेंच

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा