वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०६ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००६
  • उपशिर्षक
  • नोव्हेंबर १३ ने सुरू होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर २० ने सुरू होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर २७ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर ४ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००६
km ११/०६ पृ. २

सेवा सभा आराखडा

नोव्हेंबर १३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि:स्थानीय घोषणा. पृष्ठ १२ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज नोव्हेंबर १ आणि सावध राहा! ऑक्टोबर-डिसेंबर अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एका प्रात्यक्षिकात “मला तुमच्या कार्याची आधीच कल्पना आहे” असे म्हणून संभाषणाला खीळ घालू पाहणाऱ्‍याला कसे उत्तर देता येईल हे दाखवावे.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्यात व त्या कशा चालू ठेवाव्यात पृ. २० पाहावे.

२० मि:सुवार्तेचे सेवक. पृष्ठे ७-१० वरील पुरवणीत दिलेल्या माहितीच्या आधारावर भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा.

१५ मि:“निर्भय, पण शांतीपूर्ण.”a

गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर २० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २१ (१९१)

१० मि:स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा.

१५ मि:स्थानिक गरजा.

२० मि:डिसेंबर महिन्यात सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करणे. श्रोत्यांसोबत चर्चा. सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाचे कोणते वैशिष्ट्य तुम्हाला खास आवडते आणि हे पुस्तक देताना आलेले काही उल्लेखनीय अनुभव सांगण्यास श्रोत्यांना विनंती करावी. आमची राज्य सेवा जानेवारी २००५ यातील पुरवणीत दिलेल्या नमुनेवजा सादरतांवर चर्चा करा. यांपैकी एखाद्या सादरतेचा अथवा स्थानिक क्षेत्रात परिणामकारक ठरलेल्या दुसऱ्‍या एखाद्या सादरतेचा उपयोग करून हे पुस्तक कसे सादर करता येईल हे प्रात्यक्षिकाच्या रूपात दाखवावे.

गीत क्र. ५ (४६) आणि समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर २७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ८ (५३)

५ मि:स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा.

१० मि:यहोवाला प्रसन्‍न करणाऱ्‍या देणग्या. टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, २००५ यातील पृष्ठे ८-१२ वरील माहितीवर आधारित वडिलांचे भाषण.

१५ मि:“मासिक सादर करण्याची तयारी कशी कराल?b दोन प्रचारक, शक्य असल्यास पती पत्नी यांचे तीन मिनिटांचे प्रात्यक्षिक दाखवावे. ते पृष्ठ १२ वर (टेहळणी बुरूज डिसेंबर १ किंवा सावध राहा! ऑक्टोबर-डिसेंबर अंकाकरता) सुचवलेल्या सादरतांपैकी एक निवडतात आणि स्वतःच्या शब्दांत तिचा कसा उपयोग करता येईल हे कशाप्रकारे ठरवतात हे दाखवावे. मग, सदर भागात चर्चा केलेल्या मुद्द्‌यांचा उपयोग करून ते त्यांच्या क्षेत्रातील लोकांकरता समयोचित असलेला दुसरा एक लेख सादर करण्याची तयारी व प्रात्यक्षिक करतात.

१५ मि:“रक्‍ताचे अंश आणि माझ्याच रक्‍ताचा वापर करणाऱ्‍या वैद्यकीय प्रक्रियांविषयी माझा निर्णय काय असेल?”c प्रश्‍नोत्तर पद्धतीने चर्चा व प्रात्यक्षिक. हा भाग सादर करणाऱ्‍या वडिलाने शाखा दप्तराने दिलेल्या रूपरेषेला काळजीपूर्वक जडून राहावे.

गीत क्र. २५ (२०४) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर ४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २३ (२००)

१० मि:स्थानिक घोषणा. प्रचारकांना नोव्हेंबर महिन्याचा क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी.

१५ मि:“प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!”d या पुस्तकातील काही वैशिष्ट्ये म्हणजे यातील चौकटी व चित्र. यांचा चांगला उपयोग करण्याचे बांधवांना प्रोत्साहन द्यावे. प्रत्येक अभ्यासानंतर बायबलमधून त्या अध्यायाची उजळणी करावी.

२० मि:उत्तर देताना बायबलचा उपयोग करा. टेहळणी बुरूज ऑगस्ट १५, २००२ अंकातील पृष्ठे १७-१८ वरील “आपण जी सत्ये शिकवतो त्यांना प्रिय मानणे” या उपशीर्षकाखालील माहितीवर आधारित श्रोत्यांसोबत चर्चा. उपस्थितांना प्रत्येक प्रश्‍नावर अभिप्राय व्यक्‍त करण्याचे निवेदन करावे. एक प्रचारक आपल्या सहकर्मचाऱ्‍याला, त्याने “तुम्ही नाताळ का बरं साजरा करत नाही?” असे विचारल्यावर, युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकाचा उपयोग करून बायबलमधून कशाप्रकारे उत्तर देतो हे प्रात्यक्षिकाच्या रूपात दाखवावे.

गीत क्र. ८ (५३) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा