वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०६ पृ. १
  • निर्भय, पण शांतीपूर्ण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निर्भय, पण शांतीपूर्ण
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • “सर्व माणसांबरोबर . . . शांतीने राहा”
    आमची राज्य सेवा—२०१२
  • आजच्या जगात शांतताप्रिय बनणे व्यावहारिक आहे का?
    सावध राहा!—२००६
  • “शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • तुम्ही धैर्याने सुवार्तेची घोषणा करता का?
    आमची राज्य सेवा—२०००
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ११/०६ पृ. १

निर्भय, पण शांतीपूर्ण

१ प्रचार कार्यात भेटणारे अनेकजण आपली प्रामाणिक मते व्यक्‍त करतात, जी कधीकधी बायबलमधील सत्याच्या विरोधात असतात. आपण निर्भयतेने प्रचार केला पाहिजे हे जरी खरे असले तरी, आपण ‘सर्व माणसांबरोबर शांतीने राहू’ इच्छितो आणि कोणालाही विनाकारण चिडवू इच्छित नाही. (रोम. १२:१८; प्रे. कृत्ये ४:२९) तर मग राज्याचा संदेश सादर करताना आपण निर्भय असण्यासोबतच शांतिप्रिय कसे काय राहू शकतो?

२ परस्पर संमतीचे मुद्दे शोधा: जो शांतिप्रिय असतो तो वादविवाद टाळतो. घरमालकाच्या मनात पक्के बसलेले विचार चुकीचे आहेत असे आपण त्याला सरळसरळ सांगितल्यास, कदाचित त्याला आपले बोलणे ऐकून घ्यावेसे वाटणार नाही. त्याने एखादे चुकीचे विधान केले तरीसुद्धा, आपण विचारशीलपणे असा एखादा मुद्दा त्याच्या लक्षात आणून देऊ शकतो की ज्याविषयी त्याचे व आपले एकमत आहे. परस्पर संमतीच्या मुद्द्‌यांवर भर दिल्यामुळे त्याच्या मनात असलेल्या कोणत्याही नकारात्मक भावनांवर मात करून आपण त्याचे मन जिंकू शकतो.

३ पण घरमालकाने केलेल्या चुकीच्या विधानात सुधारणा न करण्याचा अर्थ आपण हातमिळावणी करत आहोत किंवा सत्यात भेसळ करत आहोत का? नाही. ख्रिस्ती सेवक या नात्याने आपले काम हे प्रत्येक चुकीच्या विश्‍वासाचे खंडन करण्याचे नसून, देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचे आहे. (मत्त. २४:१४) एखादा चुकीचा दृष्टिकोन व्यक्‍त केला जातो तेव्हा आवेशात येऊन त्याचे खंडन करण्यापेक्षा, ही त्या व्यक्‍तीची विचारसरणी अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्याची संधी आहे असे आपण समजू शकतो.—नीति. १६:२३.

४ अनादर करू नका: कधीकधी खोट्या शिकवणुकींचे निर्भयपणे व धैर्याने खंडन करणे आवश्‍यक असते. पण अशा वेळीही शांतिप्रिय व्यक्‍ती या नात्याने आपण खोट्या शिकवणुकींवर विश्‍वास करणाऱ्‍या किंवा त्या शिकवणाऱ्‍या व्यक्‍तींची टिंगल करत नाहीत. तसेच त्यांच्याविषयी अपमानास्पद शब्दांत बोलत नाही. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत अशा आविर्भावात जर आपण बोललो तर लोक आपल्यापासून दूर जातील पण तेच जर आपण दयाळूपणे त्यांच्याशी बोललो तर सत्याची आवड धरणारे मोकळ्या मनाने आपले बोलणे ऐकून घेण्यास प्रवृत्त होतील. आपले ऐकून घेणाऱ्‍यांबद्दल आणि त्यांच्या विश्‍वासांबद्दल आदर दाखवल्यामुळे, आपला संदेश स्वीकारणे त्यांना सोपे जाते.

५ प्रेषित पौलाने ज्यांना प्रचार केला त्यांच्या विश्‍वासांची जाणीव बाळगून तो त्यांच्याशी बोलला आणि त्यांना भावेल अशा पद्धतीने त्याने त्यांना सुवार्ता सादर केली. (प्रे. कृत्ये १७:२२-३१) “कित्येकांचे तारण साधावे” म्हणून तो “सर्वांना सर्व काही” झाला. (१ करिंथ. ९:२२) सुवार्तेचा निर्भयतेने प्रचार करण्यासोबतच शांतिप्रिय राहून आपणही हेच साध्य करू शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा