मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज ऑक्टो. १
“आजच्या अनैतिक जगात नैतिकरित्या शुद्ध राहण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल? [उत्तर ऐकून घ्या, मग नीतिसूत्रे २२:३ वाचा. यानंतर पृष्ठ १२ उघडून त्यावरील लेख दाखवा.] या लेखात काही व्यवहारोपयोगी सूचना दिल्या आहेत ज्या बऱ्याच जणांना उपयोगी पडल्या आहेत.”
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“बऱ्याच जणांचे मत आहे की मानवांना निर्माण करण्यात आले. इतरांना वाटते की मानवांची उत्क्रांती झाली. याविषयी आपले काही विशिष्ट मत आहे का? [उत्तर ऐकून घ्या.] या बाबतीत योग्य निष्कर्षावर येण्याकरता येथे काय सुचवण्यात आले आहे, बघा. [ईयोब १२:७, ८] सावध राहाच्या! या विशेषांकात, निसर्गात दिसून येणाऱ्या बुद्धिमत्तेतून व कल्पक रचनांवरून आपण काय शिकू शकतो याविषयी चर्चा केली आहे.”
टेहळणी बुरूज नोव्हें. १
“मुलांच्या संगोपनासंबंधी आज बरीच वेगवेगळी मते आहेत. आईवडिलांना या विषयावर विश्वासार्ह मार्गदर्शन कोठे मिळू शकते, आपल्याला काय वाटते? [उत्तर ऐकून घ्या. मग स्तोत्र ३२:८ वाचा.] या लेखात बायबलमध्ये बाल संगोपनाविषयी दिलेल्या व्यवहारोपयोगी मार्गदर्शनाविषयी सांगितले आहे.”
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“बऱ्याच जणांचा निर्माणकर्त्यावर विश्वास आहे. आपण या विश्वासाचे समर्थन कसे करू शकतो? [उत्तर ऐकून घ्या आणि मग इब्री लोकांस ३:४ वाचा. पृष्ठ २६ वरील लेख उघडून दाखवा.] निर्माणकर्ता असल्याचे आपण का मानतो हे इतरांना आपण कसे समजावून सांगू शकतो याविषयी या लेखात काही मार्ग सुचवले आहेत.”