घोषणा
▪ साहित्य सादरता ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या प्रती द्याव्यात. घरमालकाने आस्था दाखवल्यास जागृत राहा! हे माहितीपत्रक दाखवून बायबलमधील त्याची आस्था वाढवण्याचा प्रयत्न करावा. नोव्हेंबर: थोर शिक्षकाकडून शिका पुस्तक (इंग्रजी). घरमालकाच्या भाषेत हे पुस्तक उपलब्ध नसल्यास, सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक व त्यासोबत तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका द्यावी. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करावे. याव्यतिरिक्त मंडळीकडे साठा असल्यास, बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा तुम्ही या पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तकेही सादर करता येतील. जानेवारी: पिवळ्या पडणाऱ्या कागदावर छापलेले अथवा १९९१ सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक सादर करावे. जर मंडळीत यांपैकी कोणत्याही पुस्तकांचा साठा नसल्यास, ज्ञान पुस्तक किंवा जागृत राहा! माहितीपत्रक सादर करावे.
▪ डिसेंबर महिन्यात पाच शनिवार-रविवार येत असल्यामुळे, हा महिना साहाय्यक पायनियरींगसाठी उत्तम आहे.
▪ आमची राज्य सेवा याच्या या अंकातील पुरवणीत “सन २००७ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा” असल्यामुळे, २००७ मध्ये संदर्भासाठी तो जपून ठेवावा.
▪ नो ब्लड—मेडिसिन मीट्स द चॅलेंज या व्हिडिओवर आधारित चर्चा जानेवारी महिन्यात सेवा सभेत घेतली जाईल. आवश्यक असल्यास, मंडळीमार्फत या व्हिडिओची सीडी लवकरात लवकर मागवावी.
▪ २००७ सालच्या स्मारकविधीच्या काळातील खास जाहीर भाषण रविवार, एप्रिल १५, २००७ रोजी दिले जाईल. भाषणाचा विषय नंतर कळवला जाईल. त्या रविवारी ज्या मंडळ्यांमध्ये विभागीय पर्यवेक्षकांची भेट असेल किंवा संमेलन असेल त्या मंडळ्यांमध्ये जाहीर भाषण पुढील आठवडी दिले जाईल. रविवार, एप्रिल १५ च्या आधी कोणत्याही मंडळीत हे खास जाहीर भाषण दिले जाऊ नये.