सन २००७ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा
सूचना
सन २००७ मध्ये ईश्वरशासित सेवा प्रशाला पुढील व्यवस्थेनुसार चालवली जाईल.
मूळ-पाठ: द होली बायबल मराठी—आर. व्ही. [bsi], टेहळणी बुरूज [w-MR], ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा फायदा घ्या [be], एकमात्र खऱ्या देवाची उपासना [wt], चर्चेसाठी बायबल विषय [td-MR].
प्रशालेची सुरुवात, गीत, प्रार्थना आणि स्वागतपर शब्दांनी वेळेवर झाली पाहिजे व ती पुढीलप्रमाणे व्हावी. प्रत्येक भागानंतर प्रशाला पर्यवेक्षक पुढील भागाचा परिचय करून देतील.
भाषणाचा गुण: ५ मिनिटे. प्रशाला पर्यवेक्षक, साहाय्यक सल्लागार किंवा दुसरे एखादे योग्यताप्राप्त वडील, सेवा प्रशाला पाठ्यपुस्तकावर आधारित असलेल्या एखाद्या भाषणाच्या गुणाची चर्चा करतील. (कमी वडील असलेल्या मंडळ्यांत, योग्यताप्राप्त सेवा सेवकांना हा भाग दिला जाऊ शकतो.)
नेमणूक क्र. १: १० मिनिटे. योग्यताप्राप्त वडील किंवा सेवा सेवकांकरवी ही नेमणूक हाताळली जावी आणि ती टेहळणी बुरूज, ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा फायदा घ्या (इंग्रजी) किंवा एकमात्र खऱ्या देवाची उपासना (इंग्रजी) यावर आधारलेली असेल. हा भाग दहा मिनिटांच्या बोधप्रद भाषणाच्या रूपात सादर केला जावा. केवळ दिलेले साहित्य सादर करणे हाच यामागील हेतू नसावा तर त्या माहितीच्या व्यावहारिक मूल्यावर लक्ष केंद्रित करून मंडळीस अत्यंत सहायक ठरणारे मुद्दे ठळकपणे मांडणे हा असावा. आराखड्यात दिलेले शीर्षक वापरावे. या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवांनी आपले भाषण मर्यादित वेळेमध्ये संपवण्याची दक्षता घ्यावी. आवश्यक असल्यास खासगी सूचना दिल्या जाऊ शकतात.
बायबल वाचनातील ठळक मुद्दे: १० मिनिटे. एखाद्या योग्यताप्राप्त वडिलांनी अथवा सेवा सेवकांनी, सुरवातीच्या पाच मिनिटांसाठी दिलेले साहित्य स्थानीय गरजांना प्रभावीपणे लागू केले पाहिजे. आठवड्यासाठी नेमलेल्या बायबल वाचनाच्या कोणत्याही भागावर ते विवेचन मांडू शकतात. पण त्यांनी वाचनाचा केवळ सारांश देऊ नये. या भागाचा प्रमुख हेतू, ही माहिती आपल्याकरता का व कशाप्रकारे महत्त्वाची आहे, हे जाणण्यास श्रोत्यांना साहाय्य करणे हा आहे. वक्त्याने सुरुवातीच्या भागासाठी देण्यात आलेल्या पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेऊ नये. त्यानंतर, त्यांनी उरलेली पाच मिनिटे श्रोत्यांबरोबरील चर्चेसाठी असल्याची खातरी करावी. श्रोत्यांना बायबल वाचन करताना आवडलेल्या मुद्यांवर आणि त्यांच्या लाभांवर संक्षिप्त (३० किंवा त्याहूनही कमी सेकंदात) टिपणी देण्यासाठी आमंत्रण द्यावे. यानंतर मग प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात पाठवतील.
नेमणूक क्रमांक २: ४ मिनिटे किंवा कमी. वाचनाची ही नेमणूक एखाद्या बांधवाला दिली जावी. नेमलेला भाग, प्रस्तावना किंवा समारोप न देता विद्यार्थ्याने नुसताच वाचावा. प्रशाला पर्यवेक्षक खासकरून विद्यार्थ्यांना, नेमलेल्या भागाचा अर्थ समजून, अस्खलितपणे, उचित ठिकाणी जोर देऊन, आवाजात योग्य चढउतार करून, उचित ठिकाणी थांबून, आणि सहजपणे वाचण्यास मदत करतील.
नेमणूक क्रमांक ३: ५ मिनिटे. ही नेमणूक भगिनीला नेमून देण्यात येईल. ही नेमणूक मिळालेल्या भगिनी, स्वतः एखादे दृश्य निवडतील अथवा सेवा प्रशाला पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ ८२ वरील यादीतील एखादे दृश्य त्यांना नेमले जाईल. विद्यार्थीनीने, नेमलेला विषय वापरावा आणि तो विषय, स्थानीय क्षेत्रात वास्तविक आणि व्यावहारिक ठरेल अशा क्षेत्र सेवेतील एखाद्या पैलूला लागू करावा. मूळ-पाठ सूचित करणारा संदर्भ नसतो तेव्हा विद्यार्थीनीला आपल्या प्रकाशनांतून संशोधन करून तिच्या भाषणासाठी माहिती गोळा करावी लागेल. नवीन विद्यार्थ्यांना, ज्या भाषणांना संदर्भ दिलेले आहेत अशी भाषणे नेमावीत. विद्यार्थीनी साहित्य कशाप्रकारे मांडते आणि घरमालकाला शास्त्रवचनांवर तर्क करायला तसेच सादरतेतील मुख्य मुद्दे समजायला कशाप्रकारे मदत करते ते प्रशाला पर्यवेक्षक खासकरून पाहतील. प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थिनीला एक साहाय्यकही नेमतील.
नेमणूक क्रमांक ४: ५ मिनिटे. विद्यार्थ्याने, दिलेल्या विषयावर भाषण तयार करावे. मूळ-पाठ सूचित करणारा संदर्भ नसतो तेव्हा विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला आपल्या प्रकाशनांतून संशोधन करून आपल्या भाषणासाठी माहिती गोळा करावी लागेल. हा भाग एखाद्या बांधवाला नेमला जातो तेव्हा तो, राज्य सभागृहातील श्रोत्यांना उद्देशून भाषणाच्या रूपात सादर करता येईल. एखाद्या भगिनीला हा भाग नेमल्यास तिने तो नेमणूक क्रमांक ३ च्या पद्धतीने सादर करावा. उचित असते तेव्हा प्रशाला पर्यवेक्षक नेमणूक क्रमांक ४ हा भाग एखाद्या बांधवाला नेमू शकतात. कृपया चौफुली चिन्ह असलेले विषय, केवळ बांधवांना नेमले जावेत व ते भाषण-रूपात सादर केले जावेत याची नोंद घ्या.
सल्ला: १ मिनिट. प्रशाला पर्यवेक्षकाने विद्यार्थी ज्या भाषण गुणावर काम करत आहे त्याविषयी आगाऊ सांगू नये. नेमणूक क्र. २, क्र. ३ आणि क्र. ४ हाताळल्यानंतर, प्रशाला पर्यवेक्षक एखाद्या प्रशंसनीय मुद्द्यावर सकारात्मक अभिप्राय देतील. प्रशाला पर्यवेक्षकांचा हेतू “भाषण खूप चांगले होते,” फक्त असे म्हणण्याचा नसून विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणातील तो पैलू प्रभावी असण्यामागच्या विशिष्ट कारणांकडे लक्ष आकर्षित करणे हा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार, सभा संपल्यावर किंवा इतर वेळी खासगीत अतिरिक्त सकारात्मक सल्ला दिला जाऊ शकतो.
वेळ: कोणतेही भाषण किंवा सल्लागाराचे शेरे ओव्हरटाईम जाऊ नयेत. नेमणूक क्रमांक २ ते ४, वेळ पूर्ण होते तेव्हा विचारशीलपणे थांबवले पाहिजेत. भाषणाच्या गुणावर सुरुवातीचे भाषण देणारे बांधव, नेमणूक क्रमांक १ हाताळणारे किंवा बायबल वाचनातील ठळक मुद्दे सादर करणारे बांधव जादा वेळ घेत असतील तर त्यांना खासगीत सल्ला द्यावा. सहभाग घेणाऱ्या सर्वांनी आपापल्या वेळेकडे विशेष लक्ष द्यावे. कार्यक्रमाची एकूण वेळ: गीत व प्रार्थना सोडून ४५ मिनिटे आहे.
काऊंसल फॉर्म: पाठ्यपुस्तकात आहे.
साहाय्यक सल्लागार: प्रशाला पर्यवेक्षकांच्या व्यतिरिक्त आणखी एखादे योग्यताप्राप्त वडील उपलब्ध असल्यास, वडील वर्ग त्यांना साहाय्यक सल्लागार म्हणून नेमू शकतात. मंडळीत अधिक वडील असल्यास दर वर्षी वेगवेगळे योग्यताप्राप्त वडील ही जबाबदारी सांभाळू शकतील. साहाय्यक सल्लागाराची जबाबदारी, आवश्यक असल्यास नेमणूक क्रमांक १ आणि बायबल वाचनातील ठळक मुद्दे सादर करणाऱ्या बांधवांना खासगी सल्ला देणे ही असेल. परंतु सहवडिलांच्या किंवा सेवा सेवकांच्या प्रत्येक भाषणानंतर त्यांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही.
तोंडी उजळणी: ३० मिनिटे. दर दोन महिन्यांनी प्रशाला पर्यवेक्षक एक तोंडी उजळणी घेतील. ही उजळणी, भाषणाच्या गुणावर चर्चा केल्यानंतर आणि वर सांगितल्याप्रमाणे बायबल वाचनातील ठळक मुद्द्यांची चर्चा केल्यानंतर असेल. तोंडी उजळणी, गेल्या दोन महिन्यांच्या आणि चालू आठवड्याच्या प्रशालेत चर्चिलेल्या विषयांवर आधारित असेल. समजा तोंडी उजळणीच्या आठवड्यात तुमच्या मंडळीचे विभागीय संमेलन असल्यास, उजळणी (आणि बाकीचा साप्ताहिक आराखडा) एक आठवडा पुढे ढकलून त्या आठवड्याचा आराखडा सादर करावा. आणि समजा तोंडी उजळणीच्या आठवड्यातच तुमच्या मंडळीत विभागीय पर्यवेक्षकांची भेट असली, तर गीत, भाषणाचा गुण आणि बायबल वाचनातील ठळक मुद्दे हे भाग नेमण्यात आल्याप्रमाणे सादर करावेत. बोधपर भाषण (भाषणाच्या गुणानंतर दिले जाणारे) पुढील आठवड्याच्या आराखड्यातून घेतले जावे. पुढील आठवड्याच्या ईश्वरशासित सेवा प्रशालेत आराखड्यानुसार भाषणाचा गुण आणि बायबल वाचनातील ठळक मुद्दे यानंतर तोंडी उजळणी असेल.
आराखडा
जाने. १ बायबल वाचन: यशया २४-२८ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: साहित्याचा व्यावहारिक उपयोग (be पृ. १५८ परि. २-४)
क्र. १: प्रशालेकरता विद्यार्थ्याच्या नेमणुकांची तयारी करणे (be पृ. ४३ परि. १-पृ. ४४ परि. ३)
क्र. २: यशया २६:१-१८
क्र. ३: td-MR १९ख मानवांचा आदर केला जाऊ शकतो, पण उपासना फक्त देवाची केली पाहिजे
क्र. ४: आपण ‘प्रभु येशू ख्रिस्ताला परिधान कसे करू’ शकतो? (रोम १३:१४)
जाने. ८ बायबल वाचन: यशया २९-३३ गीत २१ (१९१)
भाषणाचा गुण: मुद्दा समजण्यासाठी इतरांना मदत करणे (be पृ. १५९ परि. १-४)
क्र. १: तुमच्या भागाचा एक विषय असतो आणि एक सेटिंग असते (be पृ. ४४ परि. ४-पृ. ४६ परि. २)
क्र. २: यशया ३०:१-१४
क्र. ३: td-MR २०क पृथ्वीबद्दल देवाचा उद्देश
क्र. ४: यहोवा देव मुलांवर प्रेम करतो हे आपण कसे जाणतो
जाने. १५ बायबल वाचन: यशया ३४-३७ गीत २९ (२२२)
भाषणाचा गुण: निवडक शब्द (be पृ. १६० परि. १-३)
क्र. १: चांगले व वाईट यासंबंधी येशूसारखी योग्य मनोवृत्ती विकसित करा (w-MR०५ १/१ पृष्ठे ९-१० परि. ११-१५)
क्र. २: यशया ३४:१-१५
क्र. ३: खरे प्रेम कसे वाढवाल
क्र. ४: td-MR २०ख पृथ्वी पुन्हा नष्ट किंवा निर्जन होणार नाही
जाने. २२ बायबल वाचन: यशया ३८-४२ गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: सहज समजली जाणारी भाषा (be पृ. १६१ परि. १-४)
क्र. १: विरोधामुळे माघार घेऊ नका (w-MR०५ १/१ पृ. १५ परि. १६-१८)
क्र. २: यशया ३८:९-२२
क्र. ३: td-MR २१क देव कोणत्या प्रार्थना ऐकतो
क्र. ४: दुसऱ्यांवर, वाईट हेतू असलेले असा आरोप लावण्याचे का टाळावे
जाने. २९ बायबल वाचन: यशया ४३-४६ गीत १२ (११३)
भाषणाचा गुण: निरनिराळ्या व अचूक अर्थाच्या शब्दांचा वापर (be पृ. १६१ परि. ५-पृ. १६२ परि. ४)
क्र. १: यहोवाचा न्याय आपण का स्वीकारावा? (w-MR०५ २/१ पृष्ठे २३-४ परि. ४-९)
क्र. २: यशया ४५:१-१४
क्र. ३: td-MR २१ख तीच तीच प्रार्थना करणे, मरीया किंवा इतर “संतांना” प्रार्थना करणे व्यर्थ आहे
क्र. ४: aख्रिश्चन स्पर्धात्मक तुलना करण्याचे का टाळतात
फेब्रु. ५ बायबल वाचन: यशया ४७-५१ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: उत्साह, भावना आणि जिवंतपणा आणणारे शब्द (be पृ. १६३ परि. १-पृ. १६४ परि. २)
क्र. १: यहोवाचे वचन आपल्याला शुद्ध राखते आणि देवाचे वचन आपल्याला विश्वासू राहण्यास मदत करते (w-MR०५ ५/१ पृष्ठे २३-२४ परि. ५-११)
क्र. २: यशया ५०:१-११
क्र. ३: td-MR २२क आध्यात्मिकरीत्या निरोगी झाल्यामुळे चिरकालिक फायदे मिळतात
क्र. ४: दान देण्याला बायबल मनाई करते का?
फेब्रु. १२ बायबल वाचन: यशया ५२-५७ गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: व्याकरणाच्या नियमाला धरून बोलणे (be पृ. १६४ परि. ३-पृ. १६५ परि. १)
क्र. १: यहोवाचे वचन आपल्याला धैर्य देते (w-MR०५ ५/१ पृष्ठे २४-२५ परि. १२-१४)
क्र. २: यशया ५५:१-१३
क्र. ३: स्वार्थत्यागी जीवन जगणे हितकर
क्र. ४: td-MR २२ख देवाचे राज्य कायमचे शारीरिक आरोग्य प्रदान करेल
फेब्रु. १९ बायबल वाचन: यशया ५८-६२ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: रूपरेषेचा वापर (be पृ. १६६ परि. १-पृ. १६७ परि. २)
क्र. १: देवाचे वचन धैर्याने सांगत राहणे (wt पृ. १६७-७४)
क्र. २: यशया ६०:१-१४
क्र. ३: देवाची चाकरी करणे ही आनंदाची गोष्ट का आहे?
क्र. ४: td-MR २२ग आज, विश्वासाने बरे करण्याला देवाच्या मान्यतेचा पुरावा नाही
फेब्रु. २६ बायबल वाचन: यशया ६३-६६ गीत १७ (१८७)
भाषणाचा गुण: क्रमानुसार तुमचे विचार मांडणे (be पृ. १६७ परि. ३-पृ. १६८ परि. २)
तोंडी उजळणी
मार्च ५ बायबल वाचन: यिर्मया १-४ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: तुमच्या भाषणाची रूपरेषा सोपी ठेवा (be पृ. १६८ परि. ३-पृ. १६९ परि. ५)
क्र. १: यहोवाचा दिवस सतत लक्षात ठेवा (wt पृ. १७५-८३)
क्र. २: यिर्मया ३:१-१३
क्र. ३: खरा आनंद कशावर अवलंबून आहे?
क्र. ४: td-MR २२घ अन्य भाषेत बोलणे केवळ एक तात्पुरती तरतूद होती
मार्च १२ बायबल वाचन: यिर्मया ५-७ गीत १३ (१२४)
भाषणाचा गुण: तर्काला धरून साहित्याची मांडणी करणे (be पृ. १७० परि. १-पृ. १७१ परि. २)
क्र. १: मंडळीकरता भाषणे तयार करणे (be पृ. ४७ परि. १-पृ. ४९ परि. १)
क्र. २: यिर्मया ५:१-१४
क्र. ३: td-MR २३क देवाचे वचन ईश्वरप्रेरित आहे
क्र. ४: निर्गम १४:११ मधील धडा आपल्या काळात लागू करणे
मार्च १९ बायबल वाचन: यिर्मया ८-११ गीत २४ (१८५)
भाषणाचा गुण: तर्काला धरून माहिती सादर करणे (be पृ. १७१ परि. ३-पृ. १७२ परि. ५)
क्र. १: सेवा सभेतील भागांची आणि इतर भाषणांची तयारी करणे (be पृ. ४९ परि. २-पृ. ५१ परि. २)
क्र. २: यिर्मया १०:१-१६
क्र. ३: अब्राहाम, ईयोब आणि दानीएल यांचा पुनरूत्थानावर विश्वास होता हे आपल्याला कशावरून समजते?
क्र. ४: td-MR २३ख आपल्या दिवसांसाठी व्यावहारिक मार्गदर्शन आहे
मार्च २६ बायबल वाचन: यिर्मया १२-१६ गीत २८ (२२४)
भाषणाचा गुण: केवळ आवश्यक साहित्याचा उपयोग करणे (be पृ. १७३ परि. १-४)
क्र. १: समेट करणे हितावह का आहे (w-MR०५ ३/१ पृष्ठे ४-७)
क्र. २: यिर्मया १२:१-१३
क्र. ३: td-MR २३ग बायबल सर्व राष्ट्रांतील व सर्व जातीच्या लोकांसाठी लिहिण्यात आले आहे
क्र. ४: एखाद्या ख्रिश्चनाने कशाच्या बाबतीत अभिमान बाळगला पाहिजे?
एप्रि. २ बायबल वाचन: यिर्मया १७-२१ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: नोट्स न पाहता भाषण देणे (be पृ. १७४ परि. १-पृ. १७५ परि. ४)
क्र. १: जाहीर भाषणांची तयारी करणे (be पृ. ५२ परि. १-पृ. ५४ परि. १)
क्र. २: यिर्मया २०:१-१३
क्र. ३: td-MR २४क बाप्तिस्म्यासाठी ख्रिस्ती अपेक्षा
क्र. ४: bसल्ल्याबद्दल आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे?
एप्रि. ९ बायबल वाचन: यिर्मया २२-२४ गीत २८ (२२४)
भाषणाचा गुण: नोट्स न पाहता भाषण देण्यातले धोके टाळणे (be पृ. १७५ परि. ५-पृ. १७७ परि. १)
क्र. १: भाषण देणाऱ्याचे निर्णय (be पृ. ५४ परि. २-४; पृ. ५५, पेटी)
क्र. २: यिर्मया २३:१-१४
क्र. ३: सेवेत भाग घेतल्याने आपल्याला आनंद का मिळतो
क्र. ४: td-MR २४ख बाप्तिस्म्यामुळे पातके धुतली जात नाहीत
एप्रि. १६ बायबल वाचन: यिर्मया २५-२८ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: इतर जण स्पष्टीकरण विचारतात तेव्हा (be पृ. १७७ परि. २-पृ. १७८ परि. २)
क्र. १: शिक्षक या नात्याने आपल्या कुशलतेत वाढ करा (be पृ. ५६ परि. १-पृ. ५७ परि. २)
क्र. २: यिर्मया २६:१-१५
क्र. ३: td-MR २५क मरीया, येशूची आई “देवाची आई” नव्हे
क्र. ४: कोणत्या दृष्टीने भूमीला शाप आला? (उत्प. ३:१७)
एप्रि. २३ बायबल वाचन: यिर्मया २९-३१ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: संभाषणाची शैली (be पृष्ठे १७९-८०)
क्र. १: “भेद जाणा” (be पृ. ५७ परि. ३-पृ. ५८ परि. २)
क्र. २: यिर्मया ३१:१-१४
क्र. ३: यहोवाची महानता अमर्याद का आहे?
क्र. ४: td-MR २५ख मरीया “सर्वकाळ कुमारी” राहिली नाही
एप्रि. ३० बायबल वाचन: यिर्मया ३२-३४ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: आवाजाचा दर्जा (be पृ. १८१ परि. १-४)
तोंडी उजळणी
मे ७ बायबल वाचन: यिर्मया ३५-३८ गीत २० (९३)
भाषणाचा गुण: श्वासोच्छ्वासावर उचित नियंत्रण (be पृ. १८१ परि. ५-पृ. १८४ परि. १; पृ. १८२, पेटी)
क्र. १: श्रोत्यांना विचार करण्याचे उत्तेजन द्या (be पृ. ५८ परि. ३-पृ. ५९ परि. ३)
क्र. २: यिर्मया ३६:१-१३
क्र. ३: td-MR २६क उपासनेत मूर्तीचा, प्रतिमांचा उपयोग केल्याने देवाचा अपमान होतो
क्र. ४: ख्रिश्चन अनिश्चित गोष्टींचा कशाप्रकारे सामना करतात?
मे १४ बायबल वाचन: यिर्मया ३९-४३ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: ताणलेल्या स्नायुंना सैल करणे (be पृ. १८४ परि. २-पृ. १८५ परि. ३; पृ. १८४, पेटी)
क्र. १: लागू करण्याचे शिकवा आणि चांगले उदाहरण मांडा (be पृ. ६० परि. १-पृ. ६१ परि. ३)
क्र. २: यिर्मया ३९:१-१४
क्र. ३: td-MR २६ख इस्त्राएलांनी मूर्तिपूजा केल्यामुळे त्यांचा नाश झाला
क्र. ४: cखरे ख्रिश्चन लग्नाआधीच्या गाठीभेटीत पावित्र्य का राखतात
मे २१ बायबल वाचन: यिर्मया ४४-४८ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: इतरांविषयी आवड बाळगा (be पृ. १८६ परि. १-४)
क्र. १: संभाषणाच्या शैलीत सुधारणा कशी करावी (be पृ. ६२ परि. १-पृ. ६४ परि. १)
क्र. २: यिर्मया ४६:१-१७
क्र. ३: स्वतःशी केलेली लबाडी म्हणजे काय आणि आपण त्यापासून दक्ष कसे राहू शकतो?
क्र. ४: प्रकटीकरणातील बॅबिलोनला ओळखणे
मे २८ बायबल वाचन: यिर्मया ४९-५० गीत २८ (२२४)
भाषणाचा गुण: लक्ष देऊन ऐकणे (be पृ. १८७ परि. १-५)
क्र. १: संभाषण कसे चालू ठेवावे (be पृ. ६४ परि. २-पृ. ६५ परि. ४)
क्र. २: यिर्मया ४९:१४-२७
क्र. ३: td-MR २६ग देवासोबत ‘इतर गोष्टींची’ उपासना करण्यास मनाई
क्र. ४: पालकांनी त्यांच्या मुलांना वाचून का दाखवावे
जून ४ बायबल वाचन: यिर्मया ५१-५२ गीत १५ (१२७)
भाषणाचा गुण: प्रगती करण्याकरता इतरांची मदत करणे (be पृ. १८७ परि. ६-पृ. १८८ परि. ३)
क्र. १: यहोवाच्या उद्देशाची वैभवी पूर्णता (wt पृ. १८४-९१)
क्र. २: यिर्मया ५२:१-१६
क्र. ३: देवापासून स्वतंत्र राहणे मूर्खपणाचे
क्र. ४: td-MR २७क मृत्यूचे कारण
जून ११ बायबल वाचन: विलापगीत १-२ गीत १८ (१६२)
भाषणाचा गुण: व्यावहारिक मार्गाने मदत करणे (be पृ. १८८ परि. ४-पृ. १८९ परि. ४)
क्र. १: आज उपासनेतील ऐक्य—त्याचा काय अर्थ होतो? (wt पृ. ५-९ परि. १-९)
क्र. २: विलापगीत २:१-१०
क्र. ३: td-MR २७ख मृतांची अवस्था
क्र. ४: खरा दयाळूपणा निर्बलता का नाही
जून १८ बायबल वाचन: विलापगीत ३-५ गीत २६ (२१२)
भाषणाचा गुण: इतरांना आदर दाखवणे (be पृ. १९० परि. १-४)
क्र. १: कोणत्या गोष्टींमुळे एकता वाढते (wt पृ. ९-१३ परि. १०-१४)
क्र. २: विलापगीत ४:१-१३
क्र. ३: td-MR २७ग मृतांसोबत संभाषण करणे शक्य नाही
क्र. ४: dखरे ख्रिस्ती राजकारणात भाग का घेत नाहीत
जून २५ बायबल वाचन: यहेज्केल १-५ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: इतरांना अभिवादन करा (be पृ. १९१ परि. १-पृ. १९२ परि. १)
तोंडी उजळणी
जुलै २ बायबल वाचन: यहेज्केल ६-१० गीत ३ (३२)
भाषणाचा गुण: आदरपूर्वक भाषण देणे (be पृ. १९२ परि. २-पृ. १९३ परि. २)
क्र. १: एकच खरा देव यहोवा याची महिमा करा—भाग १ (wt पृष्ठे १५-१८ परि. १-९)
क्र. २: यहेज्केल ७:१-१३
क्र. ३: देवाच्या जवळ येण्यासाठी कशाची गरज आहे (याको. ४:८)
क्र. ४: td-MR २८क देवाचे नाव
जुलै ९ बायबल वाचन: यहेज्केल ११-१४ गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: खात्रीपूर्वक बोला (be पृ. १९४ परि. १-पृ. १९५ परि. २)
क्र. १: येशू ख्रिस्ताचा तुमच्या जीवनावर कितपत प्रभाव आहे? (w-MR०५ ४/१ पृष्ठे ४-७)
क्र. २: यहेज्केल ११:१-१३
क्र. ३: td-MR २८ख देवाचे अस्तित्व
क्र. ४: आपण प्रकटीकरण १७:९-११ कसे समजावे?
जुलै १६ बायबल वाचन: यहेज्केल १५-१७ गीत १८ (१६२)
भाषणाचा गुण: खात्रीपूर्वक कसे बोलावे (be पृ. १९५ परि. ३-पृ. १९६ परि. ४)
क्र. १: पुनरुत्थान एक अद्भुत आशा (w-MR०५ ५/१ पृष्ठे ४-७)
क्र. २: यहेज्केल १६:१-१३
क्र. ३: शहाणा असण्याचा काय अर्थ होतो? (नीति. १३:१६)
क्र. ४: td-MR २८ग देवाचे गुण
जुलै २३ बायबल वाचन: यहेज्केल १८-२० गीत १८ (१६२)
भाषणाचा गुण: व्यवहार कुशल असण्यासोबत दृढही असले पाहिजे (be पृ. १९७ परि. १-३)
क्र. १: प्रश्न विचारणाऱ्यांचा दृष्टिकोन समजून घेणे (be पृ. ६६ परि. १-पृ. ६८ परि. १)
क्र. २: यहेज्केल १८:१९-२९
क्र. ३: td-MR २८घ सर्वच यहोवा देवाची सेवा करत नाहीत
क्र. ४: देवाचे राज्य वास्तविक असल्याचा पुरावा
जुलै ३० बायबल वाचन: यहेज्केल २१-२३ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: साक्ष देताना व्यवहार कुशलता (be पृ. १९७ परि. ४-पृ. १९८ परि. ५)
क्र. १: प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर कसे द्यायचे याची खातरी करा (be पृ. ६८ परि. २-पृ. ७० परि. ३)
क्र. २: यहेज्केल २३:१-१७
क्र. ३: td-MR २९क यहोवाच्या साक्षीदारांचा आरंभ
क्र. ४: श्रेष्ठपणाविषयी योग्य दृष्टिकोन कोणता आहे?
ऑग. ६ बायबल वाचन: यहेज्केल २४-२७ गीत ९ (३७)
भाषणाचा गुण: योग्य शब्द योग्य वेळी (be पृ. १९९ परि. १-४)
क्र. १: पत्रव्यवहाराद्वारे संवाद (be पृष्ठे ७१-३)
क्र. २: यहेज्केल २४:१-१४
क्र. ३: मोशे ख्रिश्चनांकरता एक उत्तम उदाहरण कशाप्रकारे आहे?
क्र. ४: td-MR ३०क येशू देवाचा पुत्र आणि नियुक्त राजा आहे
ऑग. १३ बायबल वाचन: यहेज्केल २८-३१ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: कौटुंबिक सदस्य आणि इतरांबरोबर व्यवहार कुशलतेने वागणे (be पृ. २०० परि. १-४)
क्र. १: प्रगतीशील असा—उन्नती करीत राहा (be पृ. ७४ परि. १-पृ. ७५ परि. ३)
क्र. २: यहेज्केल २८:१-१६
क्र. ३: td-MR ३०ख तारणासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे अत्यावश्यक
क्र. ४: शास्त्रवचनात सांगितलेल्या “द्वेष” या शब्दाचा काय अर्थ होतो?
ऑग. २० बायबल वाचन: यहेज्केल ३२-३४ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: उभारणीकारक आणि सकारात्मक (be पृ. २०२ परि. १-पृ. २०३ परि. २)
क्र. १: तुमच्या वरदानाचा उपयोग करा (be पृ. ७५ परि. ४-पृ. ७७ परि. २)
क्र. २: यहेज्केल ३४:१-१४
क्र. ३: देवाचा पवित्र आत्मा आपल्याला मदत कशी करतो?
क्र. ४: td-MR ३०ग येशूवर केवळ विश्वास असणे पुरेसे नाही
ऑग. २७ बायबल वाचन: यहेज्केल ३५-३८ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: तुमचा आवाज सकारात्मक ठेवणे (be पृ. २०३ परि. ३-पृ. २०४ परि. १)
तोंडी उजळणी
सप्टें. ३ बायबल वाचन: यहेज्केल ३९-४१ गीत २० (९३)
भाषणाचा गुण: सहविश्वासूंसोबत संवाद साधताना (be पृ. २०४ परि. २-पृ. २०५ परि. ४)
क्र. १: देवाच्या वचनाची आवड का धरावी? (w-MR०५ ५/१ पृष्ठे २७-२८ परि. ३-६)
क्र. २: यहेज्केल ४०:१-१५
क्र. ३: मानव देवाला खरोखर आनंदी करू शकतात का?
क्र. ४: td-MR ३१क रक्तसंक्रमण रक्ताच्या पावित्र्याचा भंग करते
सप्टें. १० बायबल वाचन: यहेज्केल ४२-४५ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: जोर देण्यासाठी पुनरावृत्ती (be पृ. २०६ परि. १-४)
क्र. १: वृद्धपण “शोभेचा मुकुट” (w-MR०५ १/१५ पृष्ठे ८-९)
क्र. २: यहेज्केल ४३:१-१२
क्र. ३: td-MR ३१ख जीवन वाचवण्याचा प्रश्न म्हणून देवाची आज्ञा मोडता येते असे समर्थन करता येत नाही
क्र. ४: eआपण “परक्यांची वाणी” कशी ओळखू शकतो? (योहा. १०:५)
सप्टें. १७ बायबल वाचन: यहेज्केल ४६-४८ गीत १९ (१६४)
भाषणाचा गुण: क्षेत्र सेवा करताना आणि भाषण देताना पुनरावृत्ती (be पृ. २०७ परि. १-पृ. २०८ परि. ४)
क्र. १: यहोवाच केवळ खरा देव म्हणून त्याची महिमा करा—भाग २ (wt पृष्ठे १९-२२ परि. १०-१६)
क्र. २: यहेज्केल ४७:१-१४
क्र. ३: td-MR ३२क देवाचे राज्य मानवजातीसाठी काय करील
क्र. ४: fपालक आपल्या मुलांना देत असलेला समृद्ध आध्यात्मिक वारसा सर्वोत्तम भेट का आहे
सप्टें. २४ बायबल वाचन: दानीएल १-३ गीत २ (१५)
भाषणाचा गुण: विषय विकसित करणे (be पृ. २०९ परि. १-३)
क्र. १: देवाच्या वचनावर घट्ट पकड ठेवा (wt पृष्ठे २३-२७ परि. १-१०)
क्र. २: दानीएल २:१-१६
क्र. ३: १४४,००० ही संख्या शब्दश: का आहे? (प्रकटी. ७:४)
क्र. ४: td-MR ३२ख ख्रिस्ताचे शत्रू कार्यशील असतानाच राज्यकारभार सुरू होतो
ऑक्टो. १ बायबल वाचन: दानीएल ४-६ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: उचित विषय निवडा (be पृ. २१० परि. १-पृ. २११ परि. १; पृ. २११, पेटी)
क्र. १: लवकरच जगातून गरिबी नाहीशी होईल (w-MR०५ ६/१ पृष्ठे ४-७)
क्र. २: दानीएल ४:१-१७
क्र. ३: मफीबोशेथने दाखवलेल्या चांगल्या गुणांचे अनुकरण आपण कसे करू शकतो?
क्र. ४: td-MR ३२ग देवाचे राज्य ‘हृदयात’ नाही, मानवांच्या प्रयत्नांनी उभे राहिले नाही
ऑक्टो. ८ बायबल वाचन: दानीएल ७-९ गीत ९ (३७)
भाषणाचा गुण: मुख्य मुद्दे स्पष्ट करा (be पृ. २१२ परि. १-पृ. २१३ परि. १)
क्र. १: काम—वरदान की शाप? (w-MR०५ ७/१ पृष्ठे ४-८)
क्र. २: दानीएल ७:१-१२
क्र. ३: gtd-MR ३३क विवाह बंधन आदरणीय असले पाहिजे
क्र. ४: क्षेत्र सेवेत नियमित भाग घेतल्याने कोणता विशेष आनंद मिळतो?
ऑक्टो. १५ बायबल वाचन: दानीएल १०-१२ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: बरेच मुख्य मुद्दे भाषणात नसावते (be पृ. २१३ परि. २-पृ. २१४ परि. ५)
क्र. १: देवाच्या वचनावर घट्ट पकड ठेवा—आपला उद्देश (wt पृष्ठे २८-३१ परि. ११-१३)
क्र. २: दानीएल ११:१-१४
क्र. ३: नम्रता गैरसमज दूर करण्यास मदत कशी करू शकते
क्र. ४: htd-MR ३३ख ख्रिश्चनांनी मस्तकपदाच्या तत्त्वाचा आदर केला पाहिजे
ऑक्टो. २२ बायबल वाचन: होशेय १-७ गीत ९ (३७)
भाषणाचा गुण: आवड वाढवणारी सुरुवात (be पृ. २१५ परि. १-पृ. २१६ परि. ५)
क्र. १: ज्याच्याविषयी सर्व संदेष्ट्यांनी साक्ष दिली (wt पृष्ठे ३२-३७ परि. १-९)
क्र. २: होशेय ५:१-१५
क्र. ३: itd-MR ३३ग ख्रिस्ती पालकांची मुलांसंबंधीची जबाबदारी
क्र. ४: खरे ख्रिश्चन कशाप्रकारे धीर दाखवतात
ऑक्टो. २९ बायबल वाचन: होशेय ८-१४ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: क्षेत्र सेवेत लोकांचे लक्ष वेधणे (be पृ. २१७ परि. १-४)
तोंडी उजळणी
नोव्हें. ५ बायबल वाचन: योएल १-३ गीत १५ (१२७)
भाषणाचा गुण: प्रस्तावनेत आपल्या भाषणाचा विषय पुन्हा सांगणे (be पृ. २१७ परि. ५-पृ. २१९ परि. ३)
क्र. १: ख्रिस्तावर विश्वास दाखवा (wt पृष्ठे ३७-४० परि. १०-१५)
क्र. २: योएल २:१-१४
क्र. ३: “पूर्ण प्रीति” असण्याचा काय अर्थ होतो? (१ योहा. ४:१८)
क्र. ४: jtd-MR ३३घ ख्रिश्चनांनी केवळ ख्रिश्चनांशीच विवाह केला पाहिजे
नोव्हें. १२ बायबल वाचन: आमोस १-९ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: प्रभावकारी समाप्ती (be पृ. २२० परि. १-३)
क्र. १: यहोवाचे उपासक उपभोगत असलेले स्वातंत्र्य (wt पृष्ठे ४१-४५ परि. १-९)
क्र. २: आमोस २:१-१६
क्र. ३: केवळ अनुभव एक चांगला शिक्षक का असू शकत नाही
क्र. ४: ktd-MR ३३च बहुपत्नीकत्व शास्त्रवचनानुसार नाही
नोव्हें. १९ बायबल वाचन: ओबद्या १–योना ४ गीत २९ (२२२)
भाषणाचा गुण: लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे (be पृ. २२० परि. ४-पृ. २२१ परि. ४)
क्र. १: जग समजत असलेल्या स्वातंत्र्याचे दुष्परिणाम (wt पृष्ठे ४५-४९ परि. १०-१४)
क्र. २: योना १:१-१७
क्र. ३: पृथ्वीवरील नंदनवनाच्या अगोदर आध्यात्मिक नंदनवन का असले पाहिजे
क्र. ४: td-MR ३४क ख्रिश्चनांचा विरोध का केला जातो
नोव्हें. २६ बायबल वाचन: मीका १-७ गीत १५ (१२७)
भाषणाचा गुण: क्षेत्रसेवेत (be पृ. २२१ परि. ५-पृ. २२२ परि. ६)
क्र. १: आपल्या सर्वांना तोंड द्यावा लागणारा वादविषय—भाग १ (wt पृष्ठे ५०-५३ परि. १-८)
क्र. २: मीका २:१-१३
क्र. ३: td-MR ३४ख पत्नीने पतीच्या दबावामुळे देवापासून अलिप्त होऊ नये
क्र. ४: नम्र असणे म्हणजे काय
डिसें. ३ बायबल वाचन: नहूम १–हबक्कूक ३ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: अचूक माहिती देणे (be पृ. २२३ परि. १-५)
क्र. १: आपल्या सर्वांना तोंड द्यावा लागणारा वादविषय—भाग २ (wt पृष्ठे ५४-५९ परि. ९-१८)
क्र. २: हबक्कूक १:१-१७
क्र. ३: सार्वकालिक जीवन कंटाळवाणे का नसेल
क्र. ४: ltd-MR ३४ग पतीने पत्नीच्या दबावामुळे देवाची सेवा करण्याचे सोडू नये
डिसें. १० बायबल वाचन: सफन्या १–हाग्गय २ गीत २१ (१९१)
भाषणाचा गुण: ‘विश्वसनीय वचनाला धरून राहा’ (be पृ. २२४ परि. १-४)
क्र. १: देवाने दुष्टाईला अनुमती का दिली? (wt पृ. ६०-३ परि. १-७)
क्र. २: सफन्या ३:१-१७
क्र. ३: td-MR ३५क ख्रिश्चनांनी शब्बाथ पाळणे बंधनकारक नाही
क्र. ४: aपतीपत्नीचा यहोवा देवाबरोबर चांगला नातेसंबंध असेल तर त्यांच्या विवाहावर याचा कसा परिणाम होईल?
डिसें. १७ बायबल वाचन: जखऱ्या १-८ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: अचूक माहिती पडताळणे (be पृ. २२५ परि. १-३)
क्र. १: देवाने दुष्टाईला दिलेल्या अनुमतीवरून आपल्याला काय शिकायला मिळते (wt पृ. ६३-९ परि. ८-१८)
क्र. २: जखऱ्या ७:१-१४
क्र. ३: रूपांतराच्या दुष्टांताची पूर्णता कशी झाली?
क्र. ४: td-MR ३५ख प्राचीन इस्त्राएली लोकांनाच केवळ शब्बाथाचे पालन करावयाचे होते
डिसें. २४ बायबल वाचन: जखऱ्या ९-१४ गीत १ (१३)
भाषणाचा गुण: इतरांना समजण्याजोगे भाषण (be पृ. २२६ परि. १-पृ. २२७ परि. १)
क्र. १: ‘दुरात्म्यांविरूद्ध लढत’ देणे (wt पृ. ७०-५ परि. १-१२)
क्र. २: जखऱ्या १०:१-१२
क्र. ३: td-MR ३५ग देवाचा शब्बाथ विसावा (उत्पत्ती ‘सप्ताहामधील’ ७ वा दिवस)
क्र. ४: छळाला तोंड देण्याची आपण तयारी कशी करू शकतो?
डिसें. ३१ बायबल वाचन: मलाखी १-४ गीत २० (९३)
भाषणाचा गुण: अपरिचित शब्दांचे स्पष्टीकरण देणे (be पृ. २२७ परि. २-पृ. २२८ परि. १)
तोंडी उजळणी
[तळटीपा]
a हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
b हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
c हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
d हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
e हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
f हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
g हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
h हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
i हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
j हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
k हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
l हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
a हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.