सेवा सभा आराखडा
ऑक्टोबर ९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २ (१५)
१० मि:स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असणाऱ्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज ऑक्टोबर १ आणि सावध राहा! ऑक्टोबर-डिसेंबर अंक राज्य वार्ता क्र. ३७ या पत्रिकेसोबत कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.
१५ मि:“इतरांना देवाशी मैत्री करण्यास साहाय्य करणे.”a इतरांच्या उदाहरणामुळे व मनःपूर्वक प्रार्थनेमुळे बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करण्यास कशाप्रकारे साहाय्य मिळाले याविषयी आपले अनुभव सांगण्यास श्रोत्यांना निवेदन करावे.
२० मि:राज्य वार्ता क्र. ३७ याचे वितरण करण्याची तयारी करा. भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. या पत्रिकेच्या वितरण मोहिमेच्या व्यवस्थांची उजळणी करावी. याविषयी आमची राज्य सेवा सप्टेंबर अंकात चर्चा करण्यात आली होती. सर्वांना या कार्यात जास्तीतजास्त सहभाग घेण्याचे प्रोत्साहन द्यावे. ज्यांचे बायबल अभ्यास चांगली प्रगती करत आहेत त्यांना आपल्या या विद्यार्थ्यांना या मोहिमेत बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक म्हणून सहभाग घेता येईल का यासंबंधी विचार करण्याचे प्रोत्साहन द्यावे. आईवडिलांनीही आपली मुले या कार्यात सहभाग घेऊ शकतील का यावर विचार करावा. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता सुसंघटित या पुस्तकातील पृष्ठे ७९-८१ यावरील अटींची उजळणी करावी.
गीत क्र. २७ (२२१) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर १६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
१० मि:स्थानीय घोषणा.
२० मि:मंडळीच्या पुस्तक अभ्यासाचा फायदा करून घ्या. पुरवणीतील ७ पृष्ठापासून ८ व्या पृष्ठावरील पहिल्या उपशीर्षकापर्यंतच्या माहितीवर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा.
१५ मि:“तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाचे काय?” b राज्याच्या कार्यांना प्राधान्य देण्याकरता आपल्या नित्यक्रमात कशाप्रकारे बदल केला आणि यामुळे कोणते आशीर्वाद अनुभवण्यास मिळाले आहेत याविषयी आपले अनुभव सांगण्याचे निवडक प्रचारकांना निवेदन करा.
गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर २३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २६ (२१२)
१० मि:स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा अथवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असलेल्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज नोव्हेंबर १ अंक किंवा सावध राहा! ऑक्टोबर-डिसेंबर अंक कसा सादर करता येईल हे प्रात्यक्षिकाच्या रूपात दाखवावे. एका प्रात्यक्षिकात “तुम्ही लोक वारंवार का येता?” असे म्हणून संभाषणाला खीळ घालू पाहणाऱ्या व्यक्तीला कसे उत्तरे द्यावे हे दाखवावे.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्यात व कशा चालू ठेवाव्यात, पृ. १२.
१५ मि:स्थानिक गरजा.
२० मि:“क्षेत्र सेवाकार्याच्या सभांचा पूर्ण फायदा घ्या.”c ३ ऱ्या परिच्छेदावर चर्चा करताना, सप्टेंबर २००१ आमची राज्य सेवा यातील ४ थ्या परिच्छेदातील प्रश्न पेटीतील मुद्द्यांचा समावेश करावा. सभा चालवण्याकरता सुयोग्य बांधव उपलब्ध नसल्यास काय करावे यासंबंधी यात सूचना दिल्या आहेत.
गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर ३० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १ (१३)
१० मि:स्थानीय घोषणा. सर्वांना क्षेत्र सेवाकार्याचा अहवाल देण्याची आणि त्याच्या मागच्या बाजूला राज्य वार्ता क्र. ३७ या पत्रिकेच्या किती प्रती दिल्या हे लिहिण्याची आठवण करून द्यावी.
१५ मि:शाळासोबत्यांना प्रचार कसा करावा? भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. शाळासोबत्यांना प्रचार करताना आलेले चांगले अनुभव सांगण्याचे श्रोत्यांना निवेदन करावे.
२० मि:राज्य वार्ता क्र. ३७ या पत्रिकेचे वितरण करताना आलेले अनुभव. राज्य वार्ता क्र. ३७ या पत्रिकेचे वितरण करताना आलेले उत्तेजनदायक अनुभव सांगण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्यावे. आतापर्यंत कितपत क्षेत्र पूर्ण करण्यात आले आहे आणि नोव्हेंबर १२ पर्यंत संपूर्ण क्षेत्र पूर्ण करण्याकरता काय करावे लागेल यासंबंधी माहिती द्यावी. बायबल काय शिकवते या पुस्तकाच्या साहाय्याने पुनर्भेट कशी करावी हे प्रात्यक्षिकातून दाखवावे. राज्य वार्तेच्या ज्या उर्वरित प्रती मोहीम संपण्याआधी आपल्याला वितरीत करता येणार नाहीत त्या परत करण्याची प्रचारकांना आठवण करून द्यावी जेणेकरून इतरजण त्यांचा वापर करू शकतील.
गीत क्र. २६ (२१२) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर ६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ११ (८५)
१० मि:स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा जानेवारी २००५ अंकातील ३-४ पृष्ठांवरील सूचनांचा उपयोग करून किंवा तुमच्या क्षेत्रात परिणामकारक ठरलेल्या इतर सादरतांचा उपयोग करून, नोव्हेंबरच्या उरलेल्या दिवसांत थोर शिक्षकापासून शिका हे पुस्तक कसे सादर करावे हे प्रात्यक्षिकातून दाखवावे. वेळ असल्यास, श्रोत्यांना हे प्रकाशन क्षेत्रात वापरताना किंवा आपल्या कुटुंबात याचा वापर करताना मिळालेल्या उत्तम परिणामांविषयी सांगण्याचे निवेदन करावे.
१५ मि:विवाह सोहळ्याचा आनंद आणि प्रतिष्ठा द्विगुणीत करा. नोव्हेंबर १, २००६ टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठे २०-२३ वरील माहितीवर आधारित भाषण. हे भाषण वडिलांनी द्यावे.
२० मि:वचनाचा प्रचार करणे उत्साहवर्धक आहे. टेहळणी बुरूज जानेवारी १५, २००२ अंकातील पृष्ठे ८-९ वरील माहितीवर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. प्रचारकार्य उत्साहवर्धक का वाटते यासंबंधी आपले विचार मांडण्याची श्रोत्यांना विनंती करावी. याकरता एखाद दोघा प्रचारकांना आधीपासूनच सांगून ठेवावे.
गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.