वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०६ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००६
आमची राज्य सेवा—२००६
km ८/०६ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता ऑगस्ट: पुढील ३२ पानांचे कोणतेही माहितीपत्रक देऊ शकता: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का? जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी) आणि जागृत राहा! काही ठिकाणी, पुढील माहितीपत्रके सादर करणे योग्य ठरेल: सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी), आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—ते तुम्हाला मदत करू शकतात किंवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), आणि समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करण्यात यावा. हे पुस्तक देण्यात आलेल्या प्रत्येक घरी, गृह बायबल अभ्यास सुरू करण्याच्या हेतूने पुनर्भेट दिली पाहिजे. बायबल काय शिकवते पुस्तकाबरोबर तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका द्या. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकाच्या प्रती द्याव्यात. घरमालकाने आवड व्यक्‍त केल्यास, बायबलबद्दल त्याची आस्था वाढवण्याकरता जागृत राहा! हे माहितीपत्रक द्यावे. नोव्हेंबर: थोर शिक्षकापासून शिकणे हे पुस्तक सादर केले जाईल. जर घरमालकाच्या भाषेत हे पुस्तक उपलब्ध नसेल तर सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक यांपैकी एखादे पुस्तक व त्यासोबत तुम्हाला बायबलविषयी अधिक जाणून घेण्यास आवडेल का? ही पत्रिका देखील द्यावी.

▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने सप्टेंबर १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. दुरुस्ती किंवा बांधकाम यासाठी एक वेगळा जमाखर्च असेल तर या अहवालाच्या हिशेब तपासणीची व्यवस्था करण्यात यावी. हिशेब तपासणी पूर्ण झाल्यानंतर, मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.

▪ जानेवारी ८, २००७ रोजी सुरू होणाऱ्‍या आठवड्यापासून मंडळीच्या पुस्तक अभ्यासात आपण प्रकटीकरण—त्याचा भव्य कळस जवळ आहे! या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. अभ्यास सुरू होण्याआधी मंडळीजवळ या पुस्तकाचा पुरेसा साठा असावा.

▪ ऑगस्ट ३१, २००६ किंवा त्यानंतर लवकरात लवकर साहित्य व मासिकांची वार्षिक मोजणी केली जावी. ही वार्षिक मोजणी दर महिन्यात लिटरेचर कोऑर्डिनेटर जी मोजणी करतात त्यासारखीच आहे. एकूण संख्या लिटरेचर इन्व्हेन्टरी (S-18) फॉर्मवर भरावी. मासिकांची एकूण संख्या, मॅगझीन सर्व्हंट सांगू शकतील. कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या सचिवांनी इन्व्हेन्टरीची तपासणी करावी. त्यांनी व कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी फॉर्मवर सह्‍या कराव्यात. प्रत्येक कोऑर्डिनेटिंग मंडळीला तीन लिटरेचर इन्व्हेन्टरीचे (S-18) फॉर्म्स मिळतील. मूळ फॉर्म भरून कृपया सप्टेंबर ६ च्या आत शाखा दफ्तराला पाठवावा. फॉर्मची कार्बन प्रत मंडळीच्या फाईलसाठी ठेवावी. तिसरी प्रत हिशेबासाठी वापरू शकता.

▪ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर —इंग्रजी

ही नेहमीच्या आकारातली, पण मऊ पुठ्ठ्याची आवृत्ती आहे. हे बायबल विशेषतः क्षेत्रसेवेत लोकांना देण्याकरता असले तरीही, प्रचारकसुद्धा त्याचा वापर करू शकतात. यापुढे, नेहमीच्या आकारातल्या बायबलची मागणी केल्यास हेच मऊ पुठ्ठ्याचे बायबल पुरवले जाईल. जर तुम्हाला कठीण पुठ्ठ्याच्या बांधणीचे बायबल हवे असेल तर तसा खास उल्लेख करावा लागेल. याविषयी अतिरिक्‍त माहिती ऑगस्ट १, २००५ तारखेच्या आमच्या (इंग्रजी) पत्रात सापडेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा