सेवा सभा आराखडा
जून १२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २९ (२२२)
१० मि:स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असणाऱ्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज जून १ आणि सावध राहा! एप्रिल-जून अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एका प्रात्यक्षिकात मासिके सादर केली जात असणारे अनौपचारिक दृश्य दाखवा.
२० मि:“आपले दयाशील सेवाकार्य.”a वेळ मिळेल त्याप्रमाणे, श्रोत्यांना उल्लेखित शास्त्रवचनांवर आपले मत मांडण्यास सांगा.
१५ मि:‘विश्वासू व बुद्धिमान दासावर’ भरवसा ठेवणे. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता सुसंघटित याच्या तिसऱ्या अध्यायावर भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा.
गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
जून १९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १६ (१४३)
१० मि:स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून काही निवडक घोषणा.
२० मि:समयोचित बोल किती उत्तम! आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००३ अंकाच्या पृष्ठ १ वरील लेखाच्या आधारावर भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. श्रोत्यांना पुढील प्रश्नांवर भाष्य करण्यास सांगा: सर्वात आधी स्तुती मिळण्यास कोण पात्र आहे? सहउपासकांची आपण उचित प्रशंसा का केली पाहिजे? मंडळीत प्रशंसा करण्यासाठी आपल्याजवळ कोणकोणत्या संधी असतात? घरातील सदस्यांची आपण प्रशंसा का केली पाहिजे, आणि हे आपण कसे करू शकतो? कोणीतरी जेव्हा तुमची प्रशंसा केली तेव्हा तुम्हाला कशाप्रकारे प्रोत्साहन मिळाले किंवा तुमचा विश्वास कसा मजबूत झाला?
१५ मि:“स्तुती करण्याद्वारे व्यक्तिगत आस्था दाखवा.”b एक प्रचारक, घरमालकाचे बोलणे लक्ष देऊन ऐकतो, त्याची मनापासून तारीफ करतो आणि मग, घरमालक जे बोलला होता त्या विषयावर एखादे शास्त्रवचन दाखवून आणखी बोलतो, असे दृश्य असलेले एक प्रात्यक्षिक दाखवा.
गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.
जून २६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २२ (१३०)
१२ मि:स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा अथवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असलेल्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज जुलै १ अंक व सावध राहा! जुलै-सप्टेंबर अंक कसा सादर करावा याचे प्रात्यक्षिक दाखवावे. प्रत्येक प्रात्यक्षिकाच्या शेवटी प्रचारक, घरमालकाला विचार करायला लावेल असा प्रश्न विचारतो आणि त्याचे उत्तर पुढील आठवडी बायबल काय शिकवते पुस्तकातून दिले जाईल, असे सांगतो.
१८ मि:सहविश्वासू भाऊबहिणींबरोबर मैत्री जोडा. (नीति. १८:२४; २७:९) टेहळणी बुरूज डिसेंबर १, २०००, पृष्ठे २२-३ वरील लेखावर आधारित भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. खऱ्या उपासनेच्या आशीर्वादांपैकी एक आशीर्वाद म्हणजे, आपण खरे मित्र बनवू शकतो. सभा, क्षेत्र सेवा आणि इतर प्रसंगी बंधूभगिनींबरोबरच्या आपल्या सहवासामुळे आपल्याला भरपूर उत्तेजन मिळते. मंडळीतील इतरांबरोबरही आपण मैत्री कशाप्रकारे जोडू शकतो? “टिकाऊ मैत्रीकरता सहा मुद्दे” या चौकोनातील मुद्द्यांची उजळणी करा व प्रत्येक मुद्दा, बांधवांबरोबरच्या आपल्या व्यवहाराला कशाप्रकारे लागू करता येईल, यावर टिपणी करण्यास श्रोत्यांना सांगा.
१५ मि:जुलै महिन्यात सुवार्ता सादर करणे. तुमच्या क्षेत्रातील बहुतेक लोकांना कोणत्या विषयांमध्ये आवड आहे? एक किंवा दोन प्रचारकांची थोडक्यात मुलाखत घ्या. त्यांनी, बायबल काय शिकवते पुस्तक कसे सादर केले, आणि जर कदाचित त्यांनी या पुस्तकातून एक बायबल अभ्यास चालू केला असेल तर तो कसा केला हे विचारा. मग, तुमच्या क्षेत्रात या पुस्तकाच्या सर्वात प्रभावी ठरलेल्या सुवार्ता सादरतेचा उपयोग करून, घरोघरी कार्य करत असल्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.—आमची राज्य सेवा जानेवारी २००५, पृ. ८, परि. ५ पाहा.
गीत क्र. १७ (१८७) आणि समाप्तीची प्रार्थना.
जुलै ३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ५ (४६)
१० मि:स्थानीय घोषणा. प्रचारकांनी जून महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल दिला नसेल तर तो देण्याची आठवण करून द्यावी.
१५ मि:स्थानीय गरजा.
२० मि:“आध्यात्मिक ध्येये साकारण्याचे मार्ग.”c मंडळीतील तरुणांनी कोणती आध्यात्मिक ध्येये ठेवली आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी ते काय करत आहेत यावर टिपणी करण्यास त्यांना सांगा. एक किंवा दोन तरुणांना टिपणी करण्यास आगाऊ सांगितले जाऊ शकते.
गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.