ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
जून २६, २००६ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, मे १ ते जून २६, २००६ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]
भाषणाचे गुण
१. आवाजात चढ-उतार करणे म्हणजे काय व हे महत्त्वपूर्ण का आहे? [be पृ. १११ चौकोन]
२. भाषण देताना आपण कशाप्रकारे गती वाढवू शकतो व कमी करू शकतो? [be पृ. ११२ परि. ३-६, चौकोन]
३. आपण आपले भाषण आवेशाने कसे देऊ शकतो व हे महत्त्वाचे का आहे? [be पृ. ११५ परि. १-परि. ११६, चौकोन]
४. इतरांना शिकवताना आपण प्रेमळपणा का दाखवला पाहिजे व कोणती गोष्ट आपल्याला हे दाखवण्यास मदत करेल? [be पृ. ११८ परि. २-पृ. ११९ परि. ५]
५. संभाषण करतेवेळी, हाव-भाव व चेहऱ्यावरील भाव महत्त्वाचे का आहेत याचे स्पष्टीकरण द्या. (मत्त. १२:४८, ४९) [be पृ. १२१, चौकोन]
नेमणूक क्र. १
६. मानवी परिपूर्णता प्राप्त करण्यात काय काय समाविष्ट आहे? [wt पृ. ९७ परि. १४]
७. क्षेत्र सेवेसाठी एक आराखडा तयार करणे फायदेकारक का आहे? [wt पृ. १०८ परि. १४]
८. नीतिसूत्रे १३:१६ वचनात उल्लेख केल्याप्रमाणे, शहाणा मनुष्य म्हणजे धूर्त व्यक्ती का? स्पष्टीकरण द्या. [w-MR०४ ७/१५ पृ. २८ परि. १९-२१]
९. पवित्र आत्मा कशाप्रकारे कैवारी म्हणून कार्य करतो, आणि हे माहीत झाल्यावर आपल्याला काय करण्याचे उत्तेजन मिळते? (योहान १४:२५, २६) [be पृ. १९ परि. २-३]
१०. कोणत्या अर्थाने येशू येतो आणि मत्तय १६:२८ मध्ये येशू कोणत्या ‘येण्याविषयी’ बोलत होता? [w-MR०४ ३/१ पृ. १६ चौकोन]
साप्ताहिक बायबल वाचन
११. ईयोब ४२:१-६ येथे उल्लेख केल्याप्रमाणे, ईयोबाने यहोवाच्या बोलण्यावर जी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून आपण काय शिकू शकतो?
१२. राष्ट्रे कोणती “व्यर्थ योजना” करीत आहेत? (स्तो. २:१, २)
१३. कोणते आधारस्तंभ ढासळले आहेत? (स्तो. ११:३)
१४. गर्विष्ठ व्यक्तीला भरपूर प्रतिफळ कसे मिळते? (स्तो. ३१:२३, पं.र.भा.)
१५. मर्त्य शरीराच्या अपरिपूर्णतेचा व या युगाच्या विविध संकटांचा सामना करण्याकरता, स्तोत्र ४० आपल्याला कोणते सांत्वन देते? (स्तो. ४०:१, २, ५, १२)