घोषणा
▪ साहित्य सादरता जून: थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी) हे पुस्तक द्यावे. हे पुस्तक घरमालकाच्या भाषेत उपलब्ध नसल्यास सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक यांपैकी एक पुस्तक द्यावे. जुलै व ऑगस्ट: पुढील ३२ पानांचे कोणतेही माहितीपत्रक देऊ शकता: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का? जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी) आणि जागृत राहा! काही ठिकाणी, पुढील माहितीपत्रके सादर करणे योग्य ठरेल: सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी), आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—ते तुम्हाला मदत करू शकतात किंवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), आणि समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करण्यात यावा. हे पुस्तक देण्यात आलेल्या प्रत्येक घरी, गृह बायबल अभ्यास सुरू करण्याच्या हेतूने पुनर्भेट दिली पाहिजे. बायबल काय शिकवते पुस्तकाबरोबर तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका द्या.
▪ तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका कशी सादर करायची त्याबद्दलच्या सूचना, आमची राज्य सेवा, नोव्हेंबर २००१ अंकाच्या पृष्ठ ३ वर आहेत. कृपया त्या पाहाव्यात.
▪ जुलै महिन्यात पाच शनिवार-रविवार असल्यामुळे या महिन्यात सहायक पायनियर सेवा करण्याची उत्तम संधी आहे.
▪ तरुणांचे प्रश्न—मी खरे मित्र कसे बनवू शकतो? या व्हिडिओ कार्यक्रमाची चर्चा सप्टेंबर महिन्याच्या एका सेवा सभेत केली जाईल. तुम्हाला जर या व्हिडिओच्या प्रती हव्या असतील तर तुम्ही त्या लवकरात लवकर आपल्या मंडळीद्वारे मागवल्या पाहिजेत.
▪ ब्रेलमध्ये उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
बायबल नेमके काय शिकवते?
सर्व दुःखांचा लवकरच अंत! —इंग्रजी ब्रेल ग्रेड दोन