वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०६ पृ. ७
  • आबालवृद्धांसाठी एक उदाहरण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आबालवृद्धांसाठी एक उदाहरण
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • तो “देवाबरोबर चालला”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • नोहा—तो देवासमागमे चालला सर्वांकरता उद्‌बोधक
    आमची राज्य सेवा—२००२
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • त्याचे “सात जणांसह रक्षण” करण्यात आले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ५/०६ पृ. ७

आबालवृद्धांसाठी एक उदाहरण

त्याचा देवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंध होता. यहोवाची इच्छा पूर्ण करण्यात त्याने आपले आयुष्य वेचले. तो “देवाबरोबर चालला” आणि त्याचे त्याला प्रतिफळ मिळाले. हा मनुष्य होता नोहा. नोहा, सर्व वयाच्या लोकांसाठी एक उदाहरण आहे. (उत्प. ६:९) नोहा—देवाबरोबर चालला हा व्हिडिओपट तुम्हाला, नोहाची जीवनशैली कशी होती, तो यहोवाचे आशीर्वाद मिळण्यास पात्र का होता आणि तुम्ही त्याच्या उत्तम गुणांचे अनुकरण कसे करू शकता याची कल्पना करण्यास मदत करेल.

नोहा व्हिडिओपटाच्या डिव्हिडी आवृत्तीत पुढील “व्हिडिओ प्रश्‍नमंजुषा” आहे. व्हिडिओ पाहा आणि स्वतःला हे प्रश्‍न विचारा: (१) काही देवदूतांनी कोणती चूक केली, आणि नेफिलिम कोण होते? (उत्प. ६:१, २, ४) (२) लोक इतके वाईट का झाले, आणि देवाला याविषयी कसे वाटत होते? (उत्प. ६:४-६) (३) नोहा इतर लोकांपासून वेगळा कसा होता? (उत्प. ६:२२) (४) वाईट लोकांचा नाश कसा करण्यात आला? (उत्प. ६:१७) (५) जहाज किती मोठे होते? (उत्प. ६:१५) (६) नोहाने आणखी काय केले, आणि लोकांनी त्याला प्रतिसाद कसा दिला? (मत्त. २४:३८, ३९; २ पेत्र २:५) (७) जहाजात प्रत्येक जातीचे किती प्राणी होते? (उत्प. ७:२, ३, ८, ९, NW; W५४ २/१५ पृ. १२७, वाचकांचे प्रश्‍न) (८) पाऊस किती दिवस पडला, आणि पृथ्वी पाण्याखाली किती दिवस होती? (उत्प. ७:११, १२; ८:३, ४) (९) नोहा आणि त्याचे कुटुंब का वाचले? (उत्प. ६:१८, २२; ७:५) (१०) जहाज कुठे जाऊन टेकले? (उत्प. ८:४) (११) जहाजातून आता बाहेर येणे सुरक्षित आहे, हे नोहाला कसे समजले? (उत्प. ८:६-१२) (१२) नोहा जहाजातून बाहेर आला तेव्हा त्याने काय केले? (उत्प. ८:२०-२२) (१३) मेघधनुष्य कशाला चित्रित करते? (उत्प. ९:८-१६) (१४) ‘देवाबरोबर चालण्याचा’ काय अर्थ होतो? (उत्प. ६:९, २२; ७:५) (१५) नोहाला जर आपण परादिसमध्ये भेटू इच्छितो तर आपण आता काय केले पाहिजे? (मत्त. २८:१९, २०; १ पेत्र २:२१)

बायबलमधील विश्‍वासू, आज्ञाधारक नोहाबद्दलच्या अहवालावरून तुम्हाला ‘देवाबरोबर चालण्याविषयी’ आणि आधुनिक दिवसांतील आपल्या सेवकांना वाचवण्याच्या संबंधाने यहोवाच्या शक्‍तीवर भरवसा ठेवण्याविषयी काय शिकायला मिळाले आहे?—उत्प. ७:१; नीति. १०:१६; इब्री ११:७; २ पेत्र २:९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा