वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०६ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००६
आमची राज्य सेवा—२००६
km ५/०६ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तींना पुनर्भेट देताना, तसेच जे नियमित सभांना येत नाहीत पण स्मारकविधी व/किंवा ईश्‍वरशासित कार्यक्रमांना उपस्थित राहतात अशा इतर व्यक्‍तींना भेटताना बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक देण्याचा खास प्रयत्न करावा. या पुस्तकातून बायबल अभ्यास सुरू करण्याचा आपला उद्देश असावा. जून: थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी) हे पुस्तक द्यावे. हे पुस्तक घरमालकाच्या भाषेत उपलब्ध नसल्यास सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक यांपैकी एक पुस्तक द्यावे. जुलै व ऑगस्ट: पुढील ३२ पानांचे कोणतेही माहितीपत्रक देऊ शकता: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का? जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी) आणि जागृत राहा! काही ठिकाणी, पुढील माहितीपत्रके सादर करणे योग्य ठरेल: सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी), आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—ते तुम्हाला मदत करू शकतात किंवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), आणि समाधानी जीवन—कसे मिळवता येईल?

▪ जुलै महिन्यात पाच शनिवार-रविवार असल्यामुळे, हा महिना साहाय्यक पायनियरींगकरता उत्तम महिना आहे.

▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने जून १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. दुरुस्ती किंवा बांधकाम यासाठी एक वेगळा जमाखर्च असेल तर या अहवालाच्या हिशेब तपासणीची व्यवस्था करण्यात यावी. हिशेब तपासणी पूर्ण झाल्यानंतर, मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.

▪ आम्ही असे सुचवू इच्छितो की सामान्य पायनियर सेवेकरता केलेले अर्ज, विनंती केलेल्या तारखेच्या कमीतकमी ३० दिवसांआधी शाखा दफ्तराला सादर केले जावेत. अर्ज पाठवण्याआधी मंडळीच्या सचिवांनी, ते पूर्णपणे भरले आहेत की नाही याची खात्री करावी. जर अर्जदारांना बाप्तिस्म्याची नेमकी तारीख आठवत नसेल, तर त्यांनी अंदाजे तारीख भरावी आणि या तारखेची नोंद करून ठेवावी. सचिवांनीही या तारखेची मंडळीचे प्रचारक अहवाल कार्ड (S-21) यावर नोंद करावी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा