वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०६ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००६
  • उपशिर्षक
  • मे ८ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे १५ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे २२ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे २९ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून ५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००६
km ५/०६ पृ. २

सेवा सभा आराखडा

मे ८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ७ (५१)

१० मि:स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज मे १ आणि सावध राहा! एप्रिल-जून अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एका प्रात्यक्षिकात असे दाखवा की प्रचारक, मासिक मार्ग सुरू केलेल्या व्यक्‍तीला टेहळणी बुरूज मासिकाचे एप्रिल १ आणि मे १ अंक आणि सावध राहा! मासिकाचा एप्रिल-जून अंक द्यायला गेला आहे; कारण घरमालकाला टेहळणी बुरूज मासिकाचा एप्रिल १ अंक मिळालेला नाही. तिन्ही अंक देताना प्रात्यक्षिकात केवळ एकाच अंकावर चर्चा करा. प्रचारक, मासिक मार्ग असलेल्या लोकांकडे महिन्यातून एकदा किंवा दोनदा भेट द्यायला जाऊ शकतात.

२० मि:“मला अनुसरत राहावे.”a राज्य सुवार्तेचा प्रचार करण्याकरता व इतरांची सेवा करण्याकरता अधिक वेळ मिळावा म्हणून आपली जीवनशैली साधी ठेवणाऱ्‍या व व्यक्‍तिगत गोष्टींत जास्त वेळ खर्च न करणाऱ्‍या एका उत्तम प्रचारकाची थोडक्यात मुलाखत घ्या. असे केल्यामुळे त्याला कोणकोणते आशीर्वाद मिळाले, त्यावर जोर द्या.

१५ मि:स्थानीय अनुभव. मार्च आणि एप्रिल महिन्यात सेवेत अधिक भाग घेतल्यामुळे मिळालेल्या उत्तम प्रतिफळांविषयी सांगण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा. बायबल अभ्यास सुरु केल्यामुळे आणि नवीन लोकांना स्मारकविधीसाठी उपस्थित राहण्यास मदत केल्यामुळे मिळालेल्या परिणामांविषयी ठळकपणे सांगा. एक किंवा दोन अनुभवांचे नाट्य रुपांतर करून दाखवल्यास चालेल.

गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे १५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २२ (१३०)

१० मि:स्थानीय घोषणा. मे २९ ने सुरु होणाऱ्‍या सप्ताहातील सेवा सभेत नोहा—देवाबरोबर चालला या व्हिडिओपटावर चर्चा करण्यात येईल. त्याची तयारी करण्याकरता सर्वांना हा व्हिडियो पाहण्याचे उत्तेजन द्या.

१० मि:ख्रिस्ताच्या नेतृत्वाधीन ऐक्याने कार्य करणे. यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास सुसंघटित, (इंग्रजी) पृष्ठे १३-१५ किंवा पुरवणी पृष्ठ ६ वरील, “त्याची भूमिका ओळखण्याचा काय अर्थ होतो” या पोटमथळ्याखालील माहितीच्या आधारावर भाषण.

२५ मि:“राज्य सभागृह बांधकाम—पवित्र सेवेचा महत्त्वपूर्ण पैलू.”b दुसऱ्‍या परिच्छेदावर चर्चा करत असताना, राज्य सभागृह बांधकाम स्वयंसेवक कार्यक्रम (A-25) फॉर्म दाखवा आणि हे कसे मिळतील ते सांगा. अशा काही बंधूभगिनींची मुलाखत घ्या ज्यांनी, राज्य सभागृहांच्या बांधकाम प्रकल्पावर किंवा नविनीकरणाच्या कामात भाग घेतला होता.

गीत क्र. ३ (३२) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे २२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २३ (२००)

१२ मि:स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा अथवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असलेल्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज जून १ अंक व सावध राहा! एप्रिल-जून अंक कसा सादर करावा याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एक कुटुंब मासिके सादर करण्याचा सराव करत आहे असे दृश्‍य दाखवावे.

१५ मि:“विचारशील व विनम्र असण्याद्वारे—वैयक्‍तिक आस्था व्यक्‍त करा.”c

१८ मि:उत्तम व्यक्‍तिगत पेहराव. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकाची पृष्ठे १३१-३ यांवर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. आपला पेहराव आणि केशभूषा यांजशी संबंधित असलेल्या त्यातील पाच तत्त्वांवर चर्चा करा. मंडळीच्या सभांना येताना आपण नीटनेटका पेहराव का केला पाहिजे, हे बायबल विद्यार्थ्याला समजावण्यासाठी आपण या माहितीचा व्यवहारचातुर्याने उपयोग करू शकतो, हे सांगा.

गीत क्र. ११ (८५) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे २९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २५ (२०४)

१० मि:स्थानीय घोषणा. प्रचारकांना मे महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी.

१० मि:जून महिन्यात सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करावे. १९९४ सालच्या डिसेंबर आमची राज्य सेवेच्या पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्रात लागू होणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक कसे सादर करायचे त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. वेळ असेल तर श्रोत्यांना, त्यांनी हे प्रकाशन क्षेत्र सेवेत उपयोग केल्यामुळे किंवा आपल्या कुटुंबातच त्याचा उपयोग केल्यामुळे कोणते चांगले परिणाम मिळालेत ते सांगण्यासाठी आमंत्रित करा.

२५ मि:“आबालवृद्धांसाठी एक उदाहरण.” एक किंवा त्याहूनही कमी मिनिटाच्या प्रस्तावनेनंतर, थेट नोहा व्हिडिओसाठी असलेल्या प्रश्‍नमंजुषेवर श्रोत्यांबरोबर चर्चा सुरू करा. या चर्चेत दुसऱ्‍या परिच्छेदातील सर्व प्रश्‍नांचा उपयोग करा. मग, डिव्हिडी आवृत्तीत सुचवलेल्या “लर्निंग ॲक्टीविटीज” मध्ये भाग घेतल्याने कुटुंबांना कोणता फायदा झाला यावर टिपणी करण्यास त्यांना सांगा. त्यानंतर, तिसऱ्‍या परिच्छेदातील प्रश्‍न आणि शास्त्रवचने यांवर चर्चा करा.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

जून ५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ८ (५३)

१० मि:स्थानीय घोषणा.

१५ मि:स्थानीय गरजा.

२० मि:पुनर्भेटी करण्यात यशस्वी कसे होता येईल. टेहळणी बुरूज नोव्हेंबर १५, २००३ अंकाच्या पृष्ठ १६ वरील चौकोनाच्या आधारावर श्रोत्यांबरोबर चर्चा करा. चौकोनात दिलेल्या सातही सूचनांची चर्चा करा आणि या सातही मुद्द्‌यांचा स्थानीय क्षेत्रात कशाप्रकारे अवलंब करता येईल त्यावर टिपणी देण्यास श्रोत्यांना विचारा. जे लोक आपली प्रकाशने घेतात किंवा आस्था दाखवतात अशा सर्व लोकांबरोबर बायबल अभ्यास सुरू करण्याच्या हेतूने त्यांना पुनर्भेट देण्याचे उत्तेजन प्रचारकांना द्या. आमची राज्य सेवा याच्या जानेवारी २००६ अंकाच्या पृष्ठ ६ वरील सूचनांचा उपयोग करून, पुनर्भेट देताना बायबल अभ्यासाविषयी कसे सांगायचे याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा