घोषणा
▪ साहित्य सादरता एप्रिल व मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. आवड दाखवणाऱ्या व्यक्तींना पुनर्भेट देताना, तसेच जे नियमित सभांना येत नाहीत पण स्मारकविधी व/किंवा ईश्वरशासित कार्यक्रमांना उपस्थित राहतात अशा इतर व्यक्तींना भेटताना बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक देण्याचा खास प्रयत्न करावा. या पुस्तकातून बायबल अभ्यास सुरू करण्याचा आपला उद्देश असावा. जून: थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी) हे पुस्तक द्यावे. हे पुस्तक घरमालकाच्या भाषेत उपलब्ध नसल्यास सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक यांपैकी एक पुस्तक द्यावे. जुलै व ऑगस्ट: पुढील ३२ पानांचे कोणतेही माहितीपत्रक देऊ शकता: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का? जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी) आणि जागृत राहा! काही ठिकाणी, पुढील माहितीपत्रके सादर करणे योग्य ठरेल: सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी), आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—ते तुम्हाला मदत करू शकतात किंवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), आणि समाधानी जीवन—कसे मिळवता येईल?
▪ एप्रिलपासून, तुमच्या मंडळीच्या मुख्य भाषेतले २००६ सालच्या प्रांतीय अधिवेशनाचे बॅजकार्ड तुमच्या लिटरेचरबरोबरच पाठवले जातील. प्रत्येक मंडळीच्या आकारानुसार, २५-२५ च्या लॉटमध्ये हे कार्ड तुम्हाला पाठवले जातील. तुम्हाला जर इतर भाषेतले कार्ड हवे असतील तर तुम्हाला त्यांची ऑर्डर पाठवावी लागेल, अन्यथा तुमच्या मंडळीच्या मुख्य भाषेतल्या बॅजकार्डसाठी खास ऑर्डर देण्याची गरज नाही. तुमच्या मंडळीला जादा बॅजकार्ड हवे असतील तर लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मचा (S-14) उपयोग करून तुम्ही ते मागवू शकता.
▪ मंडळीच्या सचिवांनी, सामान्य पायनियर सेवेसाठी अर्ज (S-205) व सहायक पायनियर सेवा (S-205b) या अर्जांचा पुरेसा साठा आपल्याजवळ बाळगावा. या फॉर्म्सची मागणी साहित्य मागणी फॉर्म (S-14) यावर केली जाऊ शकते. या फॉर्म्सचा निदान एका वर्षाचा तरी साठा उपलब्ध ठेवावा. सामान्य पायनियर सेवेचे अर्ज शाखेला पाठवताना, तो पूर्णपणे भरलेला आहे याची खात्री करावी.
▪ राज्य सभागृहाचा बांधकाम प्रकल्प—मग तो नवीन राज्य सभागृह असो अथवा जुन्या राज्य सभागृहाची डागडुजी असो—हाती घेण्याआधी वडिलांनी शाखा दफ्तरातील राज्य सभागृह बांधकाम विभागाशी संपर्क साधला पाहिजे. या विषयीची अधिक माहिती त्यांच्याजवळ असते व या माहितीचा उपयोग मंडळ्यांनी केल्यास, जमिनीची खरेदी, बांधकाम साहित्य तसेच इतर बाबींविषयी त्यांना सुज्ञ निर्णय घेता येईल.
▪ सर्व अध्यक्षीय पर्यवेक्षकांच्या आणि सचिवांच्या पत्त्यांची आणि टेलिफोन क्रमांकांची अद्ययावत माहिती शाखा दफ्तराला जपून ठेवावी लागते. तेव्हा, यात केव्हाही काही बदल झाल्यास मंडळीच्या सेवा समितीने प्रिसायडींग ओव्हरसियर/सेक्रटरी चेन्ज ऑफ ॲड्रेस फॉर्म (S-29) भरून, सही करून शाखा दफ्तराला विनाविलंब पाठवावा. टेलिफोनच्या एसटीडी कोडमध्ये बदल झाला असल्यास त्याबद्दल देखील शाखा दफ्तराला कळवणे आवश्यक आहे.
▪ लिटरेचर आयटम्सच्या वार्षिक कॅलेंडरप्रमाणे, एप्रिल महिना हा, लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्ममध्ये दिलेल्या (S-14) फॉर्म्सची चालू आणि पुढील सेवा वर्षासाठी ऑर्डर पाठवण्याचा महिना आहे, याची कृपया नोंद घ्या. यास्तव, लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मच्या (S-14) पृष्ठ दोन वरील सर्व फॉर्म्सच्या अनुक्रमणिकेनुसार तुम्हाला वर्षभरात कोणकोणत्या फॉर्म्सचा साठा लागतो ते कृपया पाहा आणि मग तुमच्या पुढील महिन्याच्या लिटरेचर रिक्वेस्टबरोबर तुमची ऑर्डर पाठवा. असे पाहण्यात आले आहे, की मंडळ्या बहुतेकदा एक किंवा दोन फॉर्म्स त्वरेने पाठवण्याची विनंती करतात. सेवा फॉर्म्सची ऑर्डर लिटरेचर रिक्वेस्ट बरोबर पाठवली पाहिजे जेणेकरून वेळेची आणि पैशाची बचत होऊ शकेल.