ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
एप्रिल २४, २००६ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, मार्च ६ ते एप्रिल २४, २००६ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]
भाषणाचे गुण
१. शिकवत असताना, आपण विचार बदलतो तेव्हा का थांबले पाहिजे, पण काय केल्यावर आपण थांबणार नाही? [be पृ. ९८ परि. २-३]
२. इतरांना साक्ष देताना आपण का थांबले पाहिजे? [be पृ. ९९ परि. ५-पृ. १०० परि. ४]
३. भाषण देताना योग्य प्रकारे अर्थावर जोर देणे महत्त्वाचे का आहे, आणि आपण हे चांगल्याप्रकारे कसे करू शकतो? [be पृ. १०१ परि. १-५, चौकोन]
४. सामूहिक वाचन करताना, आपल्या साहित्यातील प्रमुख विचारांवर आपण जोर कसा देऊ शकतो? [be पृ. १०५ परि. १-६]
५. शिकवताना, ऐकू येईल अशा मोठ्या आवाजात बोलणे महत्त्वाचे का आहे व किती मोठ्याने बोलावे हे आपण कसे ठरवू शकतो? [be पृ. १०७-८]
नेमणूक क्र. १
६. विश्वासू अभिषिक्त ख्रिश्चनांचे पुनरुत्थान केव्हा घडते? [wt पृ. ८४ परि. १०]
७. “सर्व काही व्यर्थ व वायफळ” आहे असे जेव्हा शलमोनाने म्हटले तेव्हा तो कशाचे वर्णन करत होता? (उप. २:११) [w-MR०४ १०/१५ पृ. ४ परि. ३-४]
८. आपण देवाबद्दल प्रेम कसे विकसित करू शकतो? (मार्क १२:३०) [w-MR०४ ३/१ पृ. १९ परि. १९-२१]
९. आध्यात्मिक मूल्ये आणि भौतिकवाद यांच्यात काय फरक आहे? [w-MR०४ १०/१५ पृ. ५-७]
१०. कोणकोणत्या गोष्टी आपल्याला, संमेलने व अधिवेशने येथे आपले लक्ष विचलित न करता ऐकण्यास मदत करू शकतात? [be पृ. १५-१६]
साप्ताहिक बायबल वाचन
११. हामानाचे तोंड का झाकण्यात आले? (एस्तेर ७:८)
१२. कोणत्या प्रकारच्या आत्मिक प्राण्याने अलिफजच्या विचारसरणीवर प्रभाव पाडला? (ईयो. ४:१५, १६) [w०५ ९/१५ पृ. २६ परि. २]
१३. ईयोब ७:९, १० आणि १०:२१ मधील ईयोबाची विधाने, त्याला पुनरुत्थानावर विश्वास नसल्याचे सूचित करतात का?
१४. “मी केवळ दातांच्या कातडीनिशी बचावलो आहे” या वाक्यांशावरून ईयोबाला नेमके काय म्हणायचे असेल? (ईयो. १९:२०)
१५. “मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही” यावरून ईयोबाला काय म्हणायचे होते, आणि यावरून आपण काय शिकू शकतो? (ईयो. २७:५)