वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०६ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००६
  • उपशिर्षक
  • एप्रिल १० ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल १७ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल २४ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे १ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००६
km ४/०६ पृ. २

सेवा सभा आराखडा

सूचना: येणाऱ्‍या महिन्यात आमची राज्य सेवा यात दर आठवडी एका सेवा सभेचे आयोजन केले जाईल. “मुक्‍तिसमय जवळ आला आहे!” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मंडळ्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार फेरफार करावे लागतील. उचित असते तेव्हा, अधिवेशनाच्या आदल्या आठवड्याच्या सेवा सभेत १५ मिनिटांसाठी, या महिन्याच्या पुरवणीत तुमच्या मंडळीला लागू होणारा सल्ला व सूचना यांची उजळणी करा. तुमचे अधिवेशन होऊन एक किंवा दोन महिने उलटल्यानंतर, एका सेवा सभेतील १५ ते २० मिनिटे (कदाचित स्थानीय गरजांचा भाग), अधिवेशनातील मुख्य मुद्द्‌यांची चर्चा करण्यासाठी बाजूला ठेवा. संपूर्ण अधिवेशन कार्यक्रमाची ही उजळणी नसेल. तर, क्षेत्र सेवेशी थेट संबंधित असलेल्या कार्यक्रमातील भागांवरच भर द्या. श्रोत्यांना, ते शिकलेल्या माहितीचा आपल्या सेवेत कशाप्रकारे उपयोग करीत आहेत त्यावर टिपणी देण्यास आमंत्रण द्या.

एप्रिल १० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि:स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज एप्रिल १ आणि सावध राहा! एप्रिल-जून अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एका प्रात्यक्षिकात, बायबलच्या संदेशात खूपच आस्था दाखवणाऱ्‍या घरमालकाला प्रचारक बायबल काय शिकवते पुस्तक सादर करत असल्याचे दाखवा.

१५ मि:“आवेश कसा टिकवायचा?”a टेहळणी बुरूज जून १५, २००२ अंकाच्या पृष्ठ १४, परिच्छेद १३ मधील मुद्द्‌यांचा समावेश करा.

२० मि:“तुम्ही तुमच्या वेळापत्रकात फेरफार करू शकता का?”b या लेखातील माहिती स्थानीय परिस्थितीला लागू करा. संध्याकाळच्या साक्षकार्यासाठी मंडळीने केलेल्या व्यवस्थेचा उल्लेख करा.

गीत क्र. १ (१३) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल १७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ८ (५३)

१५ मि:स्थानीय घोषणा. खास जाहीर भाषणासाठी स्थानीय व्यवस्थांवर जोर द्या. टेहळणी बुरूजच्या एप्रिल १ अंकाच्या पृष्ठ ३१ वर असलेल्या आमंत्रण पत्रिकेचा, स्मारकविधीला येणाऱ्‍यांना, बायबल विद्यार्थ्यांना व इतर आस्थेवाईक लोकांना आमंत्रण देण्यासाठी उपयोग करीत राहण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. खास भाषणाचे आमंत्रण देण्यासाठी टेहळणी बुरूजच्या या अंकाचा उपयोग केल्यामुळे आलेले एक किंवा दोन अनुभव सांगा.

१२ मि:स्थानीय गरजा.

१८ मि:“दारात उभे राहून व टेलिफोनवरून प्रगतीशील बायबल अभ्यास घेणे.”c एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा; प्रचारक इतके दिवस घरमालकाबरोबर दारात उभे राहून अभ्यास करत होता. आता तो घरमालकाला घरात बसून अभ्यास करण्यास कसे सुचवत आहे हे या प्रात्यक्षिकात दाखवा.

गीत क्र. १८ (१६२) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल २४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ९ (३७)

१५ मि:स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. मे महिन्यात आपण टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकेच सादर करणार आहोत. पृष्ठ ८ वरील सूचनांचा अथवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असलेल्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज मे १ अंक व सावध राहा! एप्रिल-जून अंक कसा सादर करावा याचे प्रात्यक्षिक दाखवावे. प्रात्यक्षिकांनंतर, स्थानीय क्षेत्रातील लोकांना लागू होणाऱ्‍या नियतकालिकांतील इतर लेखांकडे श्रोत्यांचे लक्ष वेधा.

३० मि:“यहोवाची वाट पाहा.”d मंडळीच्या सचिवांनी हा भाग हाताळावा. मंडळीला कोणत्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यास सांगितले आहे ते सांगा. अधिवेशन होणाऱ्‍या शहरात असताना सर्व वेळी अधिवेशन बॅज लावल्यामुळे कशाप्रकारे साक्ष देण्याच्या संधी मिळू शकतात यावर टिपणी करण्यास श्रोत्यांना आमंत्रण द्या. अनौपचारिक साक्ष देण्याच्या संधींचा फायदा घेण्यास व आस्थेवाईक व्यक्‍ती भेटते तेव्हा कृपया पुनःभेट द्या (S-43) फॉर्म भरण्यास श्रोत्यांना उत्तेजन द्या.

गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे १ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २२ (१३०)

५ मि:स्थानीय घोषणा. प्रचारकांना एप्रिल महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी. पृष्ठ ६ वरील, “तुम्ही कधी असे विचारून पाहिले आहे का?” या चौकानावर चर्चा करा.

१० मि:“घरमालकाच्या हावभावांकडे लक्ष देऊन—वैयक्‍तिक आस्था व्यक्‍त करा.”e एका सार्वजनिक ठिकाणी, एक प्रचारक एका व्यक्‍तीकडे पाहून हसतो, स्वतःहून संभाषण सुरू करतो आणि साक्ष देतो, असे एक लहानसे प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि:यहोवाच्या कृत्यांवर मनन करा. (स्तो. ७७:१२) २००६ आमची राज्य सेवा अंकातील पुरवणीवर आधारित भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा. नियमन मंडळाच्या पत्रातील प्रोत्साहनदायक मुद्द्‌यांची चर्चा करा.

१५ मि:“‘मुक्‍तिसमय जवळ आला आहे!’ प्रांतीय अधिवेशनाची जाहिरात करण्याकरता विश्‍वव्यापी मोहीम.”f सर्व परिच्छेदांचे वाचन करा.

गीत क्र. १० (८२) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

f एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा