वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०६ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००६
  • उपशिर्षक
  • जानेवारी ९ ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी १६ ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी २३ ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी ३० ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी ६ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००६
km १/०६ पृ. २

सेवा सभा आराखडा

जानेवारी ९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २१ (१९१)

१० मि:स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज जानेवारी १ आणि सावध राहा! जानेवारी-मार्च अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एका प्रात्यक्षिकात प्रचारक व्यापार क्षेत्रात काम करत आहे असे दाखवावे.

१५ मि:“बायबल काय शिकवते पुस्तक—बायबल अभ्यासाचे आपले मुख्य साधन.”a या नव्या पुस्तकाच्या साहाय्याने बायबल अभ्यास सुरू करण्याबद्दल सर्वांचा उत्साह वाढवावा.

२० मि:“बायबल काय शिकवते पुस्तकाच्या साहाय्याने बायबल अभ्यास सुरू करणे.” पुरवणीच्या पृष्ठ ३ च्या आधारावर श्रोत्यांसोबत चर्चा व प्रात्यक्षिके. आपल्या संदेशाबद्दल आवड दाखवणाऱ्‍यांसोबत आपण आतापासूनच बायबल काय शिकवते पुस्तकाच्या साहाय्याने बायबल अभ्यास सुरू करू शकतो. तीन प्रात्यक्षिके दाखवण्याची व्यवस्था करावी. यांत पुनर्भेट करताना, (१) पृष्ठे ४-५, (२) पृष्ठ ६ आणि (३) पृष्ठ ७ वरील पहिल्या परिच्छेदाचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल हे दाखवावे. प्रात्यक्षिकांची चांगली तयारी केलेली असावी. प्रत्येक प्रात्यक्षिकाआधी त्यात काय दाखवले जाणार आहे ते थोडक्यात सांगावे आणि प्रात्यक्षिक झाल्यावर त्याची फेर उजळणी करावी. बायबल काय शिकवते पुस्तकातून परिच्छेदांची चर्चा करताना ती वेळेनुसार काहीशी संक्षिप्त केली जाऊ शकते. प्रत्येक प्रात्यक्षिकाच्या शेवटी प्रचारक पुढच्या भेटीची व्यवस्था करतो असे दाखवावे.

गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी १६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २० (९३)

१० मि:स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. दोन आठवड्यांनंतर सेवा सभेत होणार असलेल्या चर्चेची तयारी करण्याकरता, संक्रमण-पर्यायी वैद्यकीय सेवा—रुग्णाच्या गरजा व हक्क पूर्ण करणे हा व्हिडिओपट पाहण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्यावे.

१५ मि:यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता संघटित. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता संघटित (इंग्रजी) या पुस्तकातील ४-७ पृष्ठांवर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. पृष्ठ ४ च्या आधारावर तीन मिनिटांपेक्षा कमी वेळात प्रस्तावना करून, पृष्ठ ५ ते पृष्ठ ७ वरील उपशीर्षकापर्यंत श्रोत्यांसोबत चर्चा करावी. संघटित पुस्तकातील पुढच्या भागांची आगामी सेवा सभांमध्ये चर्चा केली जाईल.

२० मि:“ज्योतीसारखी चमकणारी मुले.”b शाळेत कशाप्रकारे साक्ष दिली याविषयी सांगण्यास शाळकरी मुलांना निवेदन करा. एक किंवा दोन जणांना आधीपासूनच तयारी करण्याची सूचना द्यावी.

गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी २३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १७ (१८७)

१० मि:स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा अथवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असलेल्या सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज फेब्रुवारी १ अंक व सावध राहा! जानेवारी-मार्च अंक कसा सादर करावा याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एक प्रात्यक्षिक लहान प्रचारकाने करावे.

१५ मि:स्थानीय गरजा.

२० मि:“प्रश्‍न विचारून व लक्षपूर्वक ऐकून—वैयक्‍तिक आस्था व्यक्‍त करा”c २ ऱ्‍या परिच्छेदाची चर्चा करताना, श्रोत्यांना विचारा की त्यांना संभाषणे सुरू करण्याकरता कोणते प्रश्‍न परिणामकारक असल्याचे दिसून आले आहेत. एखाद्या व्यक्‍तीला विचारपूर्वक प्रश्‍न विचारून तिला कशाप्रकारे बोलके करायचे, आणि तिचे बोलणे कशाप्रकारे लक्षपूर्वक ऐकायचे हे एका प्रात्यक्षिकात दाखवावे.

गीत क्र. २८ (२२४) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी ३० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  ५ (४६)

१० मि:स्थानीय घोषणा. प्रचारकांना जानेवारी महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी. फेब्रुवारी महिन्याच्या साहित्य सादरतेचा उल्लेख करून एका सादरतेचे प्रात्यक्षिक दाखवावे.

१५ मि:आपल्या लाभाकरता प्रेमळपणे केलेल्या तरतुदी. वडिलांनी हा भाग सादर करावा. जानेवारी ३, २००६ तारखेचे शाखा दफ्तराने सर्व मंडळ्यांना पाठवलेले पत्र वाचून दाखवावे व त्यावर चर्चा करावी. यात हॉस्पिटल लिएझॉन कमिटी (एचएलसी) व पेशन्ट व्हिजिटेशन ग्रूप (पीव्हीजी) यांच्या साहाय्याचा कशाप्रकारे फायदा करून घेता येईल यासंबंधी माहिती दिली आहे.

२० मि:“एका महत्त्वाच्या वैद्यकीय प्रघातावर प्रकाश टाकणारा व्हिडिओपट.” प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९ वाचावे. ख्रिस्ती रक्‍त संक्रमण स्वीकारत नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे रक्‍ताच्या पावित्र्याविषयी देवाच्या कायद्याला ते आदर दाखवू इच्छितात यावर थोडक्यात जोर द्यावा. मग सरळ लेखातील प्रश्‍नांच्या साहाय्याने रुग्णांचे हक्क व गरजा या व्हिडियोपटाविषयी चर्चेला सुरुवात करावी. शेवटल्या परिच्छेदाचे वाचन करून या भागाचा समारोप करावा.

गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी ६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ११ (८५)

१० मि:स्थानीय घोषणा.

२५ मि:लोकांना शिकवण्याकरता आपल्याला मिळालेल्या नव्या साधनाशी परिचित होणे. भाषण व श्रोत्यांशी चर्चा. बायबल काय शिकवते या पुस्तकात आपल्याला विशेषतः काय आवडले याविषयी सांगण्याचे प्रचारकांना निवेदन करावे. उदाहरणार्थ, प्रत्येक अध्यायातील मुख्य मुद्द्‌यांवर प्रकाश टाकणारे सुरुवातीचे प्रश्‍न व उजळणीचा चौकोन (पृ. १०६, ११४), चित्रे, तक्‍ते (पृ. १२२-३, १४७, १९८) व परिशिष्ट (पृ. १९७, परि. १-२). या पुस्तकात वापरलेली भाषा मैत्रीपूर्ण व मनाचा ठाव घेणारी आहे (पृ. १२, परि. १२). यात साध्या व सुस्पष्ट पद्धतीने विवरण केले आहे (पृ. ५८, परि. ५) व परिणामकारक शब्दचित्रे रेखाटली आहेत (पृ. १५९, परि. १२). प्रस्तावनेची रचना बायबल अभ्यास सुरू करण्यास आपल्याला साहाय्य करण्याच्या दृष्टीने केलेली आहे (पृ. ३-७). नव्या बायबल विद्यार्थ्याशी बोलताना पृष्ठ ७ वरील चौकोनाचा कसा उपयोग करता येईल याचे एक प्रात्यक्षिक दाखवावे. या नव्या पुस्तकाचा उपयोग करताना आलेले अनुभव सांगावेत.

१० मि:सहायक पायनियर सेवा केल्याने मिळणारे आशीर्वाद. (नीति. १०:२२) मागच्या उन्हाळ्यात ज्यांनी सहायक पायनियर सेवा केली त्यांना विचारा की याकरता त्यांनी कशाप्रकारे समायोजन केले आणि त्यांना कोणते आनंददायक अनुभव व आशीर्वाद प्राप्त झाले. मार्च, एप्रिल व मे महिन्यात सहायक पायनियर सेवा करण्याविषयी सर्वांना प्रार्थनापूर्वक विचार करण्याचे प्रोत्साहन द्यावे.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा