वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०५ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००५
  • उपशिर्षक
  • डिसेंबर १२ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर १९ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर २६ ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी २ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००५
km १२/०५ पृ. २

सेवा सभा आराखडा

डिसेंबर १२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ३ (३२)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून ऑक्टोबर-डिसेंबरचा सावध राहा! आणि डिसेंबर १ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचा देखील उपयोग करता येईल. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर, सादरतेत एखाद्या शास्त्रवचनाचा समावेश करणे किती सोपे आहे यावर टिपणी करा.

१५ मि: “शिकलेल्या माहितीचा जीवनात उपयोग करण्यास मदत करणारी प्रशाला.” प्रशाला पर्यवेक्षकांचे भाषण. आमची राज्य सेवा याच्या ऑक्टोबर २००५ अंकाच्या पुरवणीतील काही मुद्द्‌यांचा समावेश करा.

२० मि: “जीवन देणारे शिक्षण.”a आपल्या संस्थेकरवी देव देत असलेल्या शिक्षणातून फायदा कसा झाला यावर टिपणी करण्यास एक दोघांची आधीच योजना करा.

गीत क्र. २८ (२२४) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर १९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १६ (१४३)

५ मि: स्थानीय घोषणा. डिसेंबर २५ आणि जानेवारी १ रोजी खास क्षेत्र सेवेच्या व्यवस्थांविषयी सांगा.

१५ मि: “जुळवून घेण्याद्वारे—वैयक्‍तिक आस्था असल्याचे दाखवा.”b घरमालकाच्या अभिप्रायाच्या आधारावर एक प्रचारक आपला राज्य संदेश कसा जुळवतो त्याचे एक लहानसे प्रात्यक्षिक दाखवा.

२५ मि: “तुमचे मूल महत्त्वाचा निर्णय घेऊ शकेल का?”c वडिलांनी हा भाग हाताळावा. सुयोग्य वाचन करणाऱ्‍या बांधवाला प्रत्येक परिच्छेद मोठ्याने वाचावयास सांगा. उद्धृत केलेल्या सर्व शास्त्रवचनांवर चर्चा करा. परिच्छेद २ वर चर्चा केल्यावर, टेहळणी बुरूज मे १, १९९२  अंकातील पृष्ठे १६-१७ वरील १६ आणि १७ परिच्छेदात आणि चौकोनात उल्लेख केलेल्या दोन युवकांच्या अनुभवांतील फरक सांगा. शेवटी, पालकांना आपल्या मुलांबरोबर टेहळणी बुरूज मधील लेखाची उजळणी करायचे उत्तेजन द्या. तसेच रक्‍ताविषयी बायबलमधील आज्ञा काय आहे व पूर्ण आत्मविश्‍वासाने आपले विश्‍वास कसे मांडायचे यांचा त्यांच्याबरोबर सराव करण्याचे उत्तेजन द्या. बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक मुलाकडे डिपीए कार्ड आहे आणि बाप्तिस्मा न घेतलेल्या मुलाकडे आयडेंटीटी कार्ड आहे याची कुटुंब प्रमुखांनी खात्री करावी. मंडळीतील कोणालाही इस्पितळात दाखल केले जाते आणि रक्‍त संक्रमणाचा मुद्दा निघतो तेव्हा वडिलांनी साहाय्यासाठी इस्पितळ सहकार्य समितीशी संपर्क साधला पाहिजे.

गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर २६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ११ (८५)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करा. प्रचारकांना डिसेंबर महिन्याचा रिपोर्ट देण्याची आठवण करून द्या. तुमची मंडळी, नवीन वर्षासाठी सभांच्या वेळात बदल करणार असेल तर नवीन वेळांची घोषणा करा. जानेवारी महिन्यात कोणते साहित्य सादर करायचे आहे त्याची घोषणा करा आणि सुचवलेल्या सुवार्ता सादरता कोठे मिळू शकतील तेही सांगा.

१५ मि: स्थानीय गरजा.

२० मि: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिके सादर करा. फेब्रुवारी २००५ च्या आमची राज्य सेवा, पृष्ठ ८ वर, मासिकांचे प्लेसमेंट वाढवण्याच्या संबंधाने असलेल्या सूचनांची उजळणी करा. चालू मासिकातील लक्षणीय लेखांची चर्चा करा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून (तुमच्या क्षेत्रात लागू होत असेल तर), जानेवारी-मार्चचा सावध राहा! अंक आणि जानेवारी १ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचा देखील उपयोग करता येईल. प्रत्येक प्रात्यक्षिकात, आपल्या जगव्याप्त कार्याचा खर्च कसा चालवला जातो ते सांगा.—टेहळणी बुरूज, पृष्ठ २ किंवा सावध राहा! पृ. ५ पाहा.

गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी २ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

नोंद: मंडळ्यांनी, जानेवारी २ ने सुरु होणारी सेवा सभा, (विभागीय पर्यवेक्षकांची भेट असल्याखेरीज) आदल्या आठवडी घेऊ नये. प्रत्येक मंडळीत, सेवा सभेच्या आराखड्यात ठरवल्याप्रमाणे त्याच आठवडी अधिवेशनाच्या बाबतीत असलेल्या पुरवणीची चर्चा करावी. या आठवड्यात विभागीय संमेलन असेल तर, पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी त्यांच्या ठरलेल्या पुस्तक अभ्यासांच्या वेळी, अधिवेशनाचे ठिकाण आणि तारीख सांगावी.

५ मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: “आपल्या बायबल आधारित साहित्याचा विचारपूर्वक उपयोग करा.”d सप्टेंबर २००२ च्या आमची राज्य सेवा याच्या पृष्ठ १ वरील टिपणींचा समावेश करा.

२५ मि: “‘मुक्‍तिमय जवळ आला आहे’ २००६ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन.”e मंडळीच्या सचिवांनी हा भाग हाताळावा. पहिल्या परिच्छेदावर चर्चा केल्यानंतर, डिसेंबर १५, २००५ तारखेचे अधिवेशन नेमणूक पत्र वाचा. मंडळीतील सर्वांना अधिवेशनाच्या योजना होता होईल तितक्या लवकर करण्याचे उत्तेजन द्यावे.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा