सेवा सभा आराखडा
नोव्हेंबर १४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २९ (२२२)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून नोव्हेंबर १ चा टेहळणी बुरूज अंक आणि ऑक्टोबर-डिसेंबरचा सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचा देखील उपयोग करता येईल. प्रत्येक प्रात्यक्षिकात, “मला धर्मामध्ये आस्था नाही” या संभाषणाला खीळ घालणाऱ्या प्रतिसादाला हाताळण्याची वेगळी पद्धत दाखवा.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिकेचे पान ९ पाहा.
१५ मि: यहोवाला प्रसन्न करणाऱ्या देणग्या. टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, २००५, पृष्ठे ८-१२ वरील लेखावर वडिलांचे भाषण.
२० मि: “यहोवाचे गौरव जाहीर करा.”a परिच्छेद ४ वर चर्चा करताना श्रोत्यांना, उत्तम आचरणामुळे साक्ष देण्याचा मार्ग कसा खुला होतो त्याचे थोडक्यात अनुभव सांगण्याचे आमंत्रण द्या.
गीत क्र. १३ (१२४) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ५ (४६)
१० मि: स्थानीय घोषणा.
२० मि: यहोवाला आपला देव बनवा. हिंदी भाषेतील टेहळणी बुरूज एप्रिल १, २००५, पृष्ठे २५-८ वर वडिलांचे भाषण. अब्राहाम, दावीद आणि एलीया यांच्या उदाहरणांतून आपण जे धडे शिकतो त्यांचा व्यवहारात उपयोग दाखवा.
१५ मि: “व्यक्तिगत आस्था घ्या—निरीक्षक वृत्ती ठेवण्याद्वारे.”b एक प्रचारक घरमालकाच्या घरात काहीतरी पाहतो ज्यावरून त्याला घरमालकाला कोणत्या बाबतीत आस्था आहे हे दिसून येते आणि त्यानुसार मग तो त्याच्याबरोबर बोलायला सुरुवात करतो, असे एक प्रात्यक्षिक दाखवा.
गीत क्र. २६ (२१२) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १७ (१८७)
१२ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करा. प्रचारकांना नोव्हेंबर महिन्याचा रिपोर्ट देण्याची आठवण करून द्या. पृष्ठ ४ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून डिसेंबर १ चा टेहळणी बुरूज अंक आणि ऑक्टोबर-डिसेंबरचा सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचा देखील उपयोग करता येईल. देणग्यांच्या व्यवस्थेचा उल्लेख करण्यास विसरू नका.
१५ मि: “आम्हाला काही मदत द्यायची असेल तर ती कशी देता येईल?” भाषण. हलाखीत असलेल्या सहउपासकांना मदत करण्यासाठी यहोवाच्या सेवकांनी केलेल्या प्रयत्नांची काही उदाहरणे द्या. (पाहा सावध राहा! (इंग्रजी) ऑगस्ट ८, २००३, पृ. १०-१५; नोव्हेंबर २२, २००२, पृ. १९-२४ आणि ऑक्टोबर २२, २००१, पृ. २३-७. इतर संदर्भांचा देखील उपयोग करता येईल.) यानंतर, आमची राज्य सेवा याच्या पृष्ठ ३ वरील लेखातील मुख्य मुद्द्यांची चर्चा करा. जर कोणी, मदत म्हणून वर्गणी देऊ इच्छित असेल तर त्यांनी जगभराच्या कार्यासाठी असलेल्या देणगींमध्ये ती टाकणे बरे असेल, यावर जोर द्या.
१८ मि: डिसेंबर महिन्यात सुवार्तेचा प्रचार करणे. भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. पाच मिनिटांच्या प्रस्ताविक भाषणात, संक्षिप्तपणे आमची राज्य सेवा याच्या जानेवारी २००५ अंकाच्या पृष्ठ ८ वरील “नमुना म्हणून दिलेल्या सादरतांचा कसा वापर करावा?” यांमधून पुढील मुद्द्यांची उजळणी करावी: (१) नमुनेदाखल पुरवल्या जाणाऱ्या सादरता आपण आपल्या स्वतःच्या शब्दांत सादर केल्यास आपण प्रभावीपणे साक्ष देऊ शकू हे निश्चित आहे. (२) आपण समजदारी दाखवून स्थानीय परिस्थितीनुरुप आपली सादरता सादर करू शकतो. (३) आपण क्षेत्रातील लोकांची पार्श्वभूमी, त्यांची विचारसरणी लक्षात घेतली पाहिजे. (४) आपण जो अध्याय घरमालकाला दाखवू इच्छितो त्यातून त्याला आवडतील असे मुद्दे निवडण्यासाठी आपण आधी तो अध्याय काळजीपूर्वक वाचला पाहिजे. (५) नमुनेदाखल दिलेल्या सादरताच आपण वापराव्यात असा नियम नाही. डिसेंबर महिन्यात कोणते प्रकाशन सादर करायचे आहे त्यावर चर्चा करताना वरील मुद्दे कसे लागू करायचे त्याची चर्चा करा. तुम्ही, आमची राज्य सेवा याच्या जानेवारी २००५ अंकाच्या पुरवणीतील नमुनेदाखल सादरतांचा किंवा स्थानीय क्षेत्रात प्रभावी असलेल्या सादरतांचा उपयोग करू शकता. एक किंवा दोन सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर ५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १६ (१४३)
१० मि: स्थानीय घोषणा.
१५ मि: स्थानीय गरजा.
२० मि: “आपल्या सेवेतून काय निष्पन्न होते?”c परिच्छेद ५ वर चर्चा करताना, टेहळणी बुरुज फेब्रुवारी १५, २००४, पृष्ठे ३२ वरील लेखातल्या टिपणींचा समावेश करा.
गीत क्र. ३ (३२) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.