घोषणा
▪ साहित्य सादरता ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या प्रती द्याव्यात. घरमालकाने आस्था दाखवल्यास कृपया अपेक्षितो माहितीपत्रक द्यावे. नोव्हेंबर: थोर शिक्षकाकडून शिका पुस्तक (इंग्रजी). आपल्याला मुले नाहीत असे घरमालकाने सांगितल्यास, ज्ञान पुस्तक किंवा तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका द्यावी. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करावे. याऐवजी, मंडळीकडे साठा असल्यास, बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी), बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा तुम्ही या पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तकेही सादर करता येतील. जानेवारी: पिवळ्या पडणाऱ्या कागदावर छापलेले अथवा १९९१ सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक सादर करावे. घरमालक पुस्तक घेत नसतील तर जागृत राहा! माहितीपत्रक सादर करा.
▪ ऑक्टोबर महिन्यात पाच शनिवार-रविवार येत असल्यामुळे, हा महिना साहाय्यक पायनियरींगसाठी उत्तम आहे.
▪ आमची राज्य सेवा याच्या या अंकातील पुरवणीत “सन २००६ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा” असल्यामुळे, २००६ मध्ये संदर्भासाठी तो जपून ठेवावा.