सन २००६ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा
सूचना
सन २००६ मध्ये ईश्वरशासित सेवा प्रशाला पुढील व्यवस्थेनुसार चालवली जाईल.
मूळ-पाठ: द होली बायबल मराठी—आर. व्ही. [bsi], टेहळणी बुरूज [w-MR], ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा फायदा घ्या [be], एकमात्र खऱ्या देवाची उपासना [wt], चर्चेसाठी बायबल विषय [td-MR].
प्रशालेची सुरुवात, गीत, प्रार्थना आणि स्वागतपर शब्दांनी वेळेवर झाली पाहिजे व ती पुढीलप्रमाणे व्हावी. प्रत्येक भागानंतर प्रशाला पर्यवेक्षक पुढील भागाचा परिचय करून देतील.
भाषणाचा गुण: ५ मिनिटे. प्रशाला पर्यवेक्षक, साहाय्यक सल्लागार किंवा दुसरे एखादे योग्यताप्राप्त वडील, सेवा प्रशाला पाठ्यपुस्तकावर आधारित असलेल्या एखाद्या भाषणाच्या गुणाची चर्चा करतील. (कमी वडील असलेल्या मंडळ्यांत, योग्यताप्राप्त सेवा सेवकांना हा भाग दिला जाऊ शकतो.)
नेमणूक क्र. १: १० मिनिटे. योग्यताप्राप्त वडील किंवा सेवा सेवकांकरवी ही नेमणूक हाताळली जावी आणि ती टेहळणी बुरूज, ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा फायदा घ्या (इंग्रजी) किंवा एकमात्र खऱ्या देवाची उपासना (इंग्रजी) यावर आधारलेली असेल. हा भाग दहा मिनिटांच्या बोधप्रद भाषणाच्या रूपात सादर केला जावा आणि त्यानंतर उजळणी प्रश्न विचारू नयेत. केवळ दिलेले साहित्य सादर करणे हाच यामागील हेतू नसावा तर त्या माहितीच्या व्यावहारिक मूल्यावर लक्ष केंद्रित करून मंडळीस अत्यंत सहायक ठरणारे मुद्दे ठळकपणे मांडणे हा असावा. आराखड्यात दिलेले शीर्षक वापरावे. या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवांनी आपले भाषण मर्यादित वेळेमध्ये संपवण्याची दक्षता घ्यावी. आवश्यक असल्यास खासगी सूचना दिल्या जाऊ शकतात.
बायबल वाचनातील ठळक मुद्दे: १० मिनिटे. एखाद्या योग्यताप्राप्त वडिलांनी अथवा सेवा सेवकांनी, सुरवातीच्या पाच मिनिटांसाठी दिलेले साहित्य स्थानीय गरजांना प्रभावीपणे लागू केले पाहिजे. आठवड्यासाठी नेमलेल्या बायबल वाचनाच्या कोणत्याही भागावर ते विवेचन मांडू शकतात. पण त्यांनी वाचनाचा केवळ सारांश देऊ नये. या भागाचा प्रमुख हेतू, ही माहिती आपल्याकरता का व कशाप्रकारे महत्त्वाची आहे, हे जाणण्यास श्रोत्यांना साहाय्य करणे हा आहे. वक्त्याने सुरवातीच्या भागासाठी देण्यात आलेल्या पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेऊ नये. त्यानंतर, त्यांनी उरलेली पाच मिनिटे श्रोत्यांबरोबरील चर्चेसाठी असल्याची खातरी करावी. श्रोत्यांना बायबल वाचन करताना आवडलेल्या मुद्यांवर आणि त्यांच्या लाभांवर संक्षिप्त (३० किंवा त्याहूनही कमी सेकंदात) टिपणी देण्यासाठी आमंत्रण द्यावे. यानंतर मग प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात पाठवतील.
नेमणूक क्रमांक २: ४ मिनिटे किंवा कमी. वाचनाची ही नेमणूक एखाद्या बांधवाला दिली जावी. नेमलेला भाग, प्रस्तावना किंवा समारोप न देता विद्यार्थ्याने नुसताच वाचावा. स्तोत्रसंहिताच्या नेमलेल्या भागाचे वाचन करताना त्याने उपरिलेखन वाचावे. प्रशाला पर्यवेक्षक खासकरून विद्यार्थ्यांना, नेमलेल्या भागाचा अर्थ समजून, अस्खलितपणे, उचित ठिकाणी जोर देऊन, आवाजात योग्य चढउतार करून, उचित ठिकाणी थांबून, आणि सहजपणे वाचण्यास मदत करतील.
नेमणूक क्रमांक ३: ५ मिनिटे. ही नेमणूक भगिनीला नेमून देण्यात येईल. ही नेमणूक मिळालेल्या भगिनी, स्वतः एखादे दृश्य निवडतील अथवा सेवा प्रशाला पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ ८२ वरील यादीतील एखादे दृश्य त्यांना नेमले जाईल. विद्यार्थीनीने, नेमलेला विषय वापरावा आणि तो विषय, स्थानीय क्षेत्रात वास्तविक आणि व्यावहारिक ठरेल अशा क्षेत्र सेवेतील एखाद्या पैलूला लागू करावा. मूळ-पाठ सूचित करणारा संदर्भ नसतो तेव्हा विद्यार्थीनीला आपल्या प्रकाशनांतून संशोधन करून तिच्या भाषणासाठी माहिती गोळा करावी लागेल. नवीन विद्यार्थ्यांना, ज्या भाषणांना संदर्भ दिलेले आहेत अशी भाषणे नेमावीत. विद्यार्थीनी साहित्य कशाप्रकारे मांडते आणि घरमालकाला शास्त्रवचनांवर तर्क करायला तसेच सादरतेतील मुख्य मुद्दे समजायला कशाप्रकारे मदत करते ते प्रशाला पर्यवेक्षक खासकरून पाहतील. प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थिनीला एक साहाय्यकही नेमतील.
नेमणूक क्रमांक ४: ५ मिनिटे. विद्यार्थ्याने, दिलेल्या विषयावर भाषण तयार करावे. मूळ-पाठ सूचित करणारा संदर्भ नसतो तेव्हा विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला आपल्या प्रकाशनांतून संशोधन करून आपल्या भाषणासाठी माहिती गोळा करावी लागेल. हा भाग एखाद्या बांधवाला नेमला जातो तेव्हा तो, राज्य सभागृहातील श्रोत्यांना उद्देशून भाषणाच्या रूपात सादर करता येईल. एखाद्या भगिनीला हा भाग नेमल्यास तिने तो नेमणूक क्रमांक ३ च्या पद्धतीने सादर करावा. उचित असते तेव्हा प्रशाला पर्यवेक्षक नेमणूक क्रमांक ४ हा भाग एखाद्या बांधवाला नेमू शकतात. कृपया चौफुली चिन्ह असलेले विषय, केवळ बांधवांना नेमले जावेत व ते भाषण-रूपात सादर केले जावेत याची नोंद घ्या.
वेळ: कोणतेही भाषण किंवा सल्लागाराचे शेरे ओव्हरटाईम जाऊ नयेत. नेमणूक क्रमांक २ ते ४, वेळ पूर्ण होते तेव्हा विचारशीलपणे थांबवले पाहिजेत. भाषणाच्या गुणावर सुरुवातीचे भाषण देणारे बांधव, नेमणूक क्रमांक १ हाताळणारे किंवा बायबल वाचनातील ठळक मुद्दे सादर करणारे बांधव जादा वेळ घेत असतील तर त्यांना खासगीत सल्ला द्यावा. सहभाग घेणाऱ्या सर्वांनी आपापल्या वेळेकडे विशेष लक्ष द्यावे. कार्यक्रमाची एकूण वेळ: गीत व प्रार्थना सोडून ४५ मिनिटे आहे.
सल्ला: १ मिनिट. नेमणूक क्र. २, क्र. ३ आणि क्र. ४ हाताळल्यानंतर एखाद्या प्रशंसनीय मुद्द्यावर सकारात्मक अभिप्राय देण्याकरता प्रशाला पर्यवेक्षकांनी एक मिनिटापेक्षा अधिक वेळ घेऊ नये. प्रशाला पर्यवेक्षकांचा हेतू “भाषण खूप चांगले होते,” फक्त असे म्हणण्याचा नसून विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणातील तो पैलू प्रभावी असण्यामागच्या विशिष्ट कारणांकडे श्रोत्यांचे लक्ष आकर्षित करणे हा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार, सभा संपल्यावर किंवा इतर वेळी खासगीत अतिरिक्त सकारात्मक सल्ला दिला जाऊ शकतो.
साहाय्यक सल्लागार: प्रशाला पर्यवेक्षकांच्या व्यतिरिक्त आणखी एखादे योग्यताप्राप्त वडील उपलब्ध असल्यास, वडील वर्ग त्यांना साहाय्यक सल्लागार म्हणून नेमू शकतात. मंडळीत अधिक वडील असल्यास दर वर्षी वेगवेगळे योग्यताप्राप्त वडील ही जबाबदारी सांभाळू शकतील. साहाय्यक सल्लागाराची जबाबदारी, आवश्यक असल्यास नेमणूक क्रमांक १ आणि बायबल वाचनातील ठळक मुद्दे सादर करणाऱ्या बांधवांना खासगी सल्ला देणे ही असेल. परंतु सहवडिलांच्या किंवा सेवा सेवकांच्या प्रत्येक भाषणानंतर त्यांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही.
काऊंसल फॉर्म: पाठ्यपुस्तकात आहे.
तोंडी उजळणी: ३० मिनिटे. दर दोन महिन्यांनी प्रशाला पर्यवेक्षक एक तोंडी उजळणी घेतील. ही उजळणी, भाषणाच्या गुणावर चर्चा केल्यानंतर आणि वर सांगितल्याप्रमाणे बायबल वाचनातील ठळक मुद्द्यांची चर्चा केल्यानंतर असेल. तोंडी उजळणी, गेल्या दोन महिन्यांच्या आणि चालू आठवड्याच्या प्रशालेत चर्चिलेल्या विषयांवर आधारित असेल. समजा तोंडी उजळणीच्या आठवड्यात तुमच्या मंडळीचे विभागीय संमेलन असल्यास, उजळणी (आणि बाकीचा साप्ताहिक आराखडा) एक आठवडा पुढे ढकलून त्या आठवड्याचा आराखडा सादर करावा. आणि समजा तोंडी उजळणीच्या आठवड्यातच तुमच्या मंडळीत विभागीय पर्यवेक्षकांची भेट असली, तर गीत, भाषणाचा गुण आणि बायबल वाचनातील ठळक मुद्दे हे भाग नेमण्यात आल्याप्रमाणे सादर करावेत. बोधपर भाषण (भाषणाच्या गुणानंतर दिले जाणारे) पुढील आठवड्याच्या आराखड्यातून घेतले जावे. पुढील आठवड्याच्या ईश्वरशासित सेवा प्रशालेत आराखड्यानुसार भाषणाचा गुण आणि बायबल वाचनातील ठळक मुद्दे यानंतर तोंडी उजळणी असेल.
आराखडा
जाने. २ बायबल वाचन: २ इतिहास २९-३२ गीत २१ (१९१)
भाषणाचा गुण: ईश्वरशासित सेवा प्रशालेतून पूर्ण लाभ घेणे (be पृ. ५ परि. १-पृ. ८ परि. १)
क्र. १: देवाचे वचन वाचण्यात मनापासून आनंद मिळवा (be पृ. ९ परि. १-५)
क्र. २: २ इतिहास ३०:१-१२
क्र. ३: खरे ख्रिस्ती गलिच्छ भाषा का टाळतात?
क्र. ४: td-MR १क पवित्र आत्मा काय आहे
जाने. ९ बायबल वाचन: २ इतिहास ३३-३६ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: अचूक वाचन (be पृ. ८३ परि. १-५)
क्र. १: देवाने दुःखाला अनुमती का दिली? (wt पृ. ६०-३ परि. १-७)
क्र. २: २ इतिहास ३४:१-११
क्र. ३: td-MR १ख जीवनी शक्तीला आत्मा म्हटले आहे
क्र. ४: बायबलच्या नैतिक मूल्यांनुसार चालण्यास कधीही लाजू नका
जाने. १६ बायबल वाचन: एज्रा १-५ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: अचूक वाचन कसे करावे (be पृ. ८४ परि. १-पृ. ८५ परि. ३)
क्र. १: देवाने दुष्टतेला दिलेल्या अनुमतीवरून आपण काय शिकतो (wt पृ. ६३-९ परि. ८-१८)
क्र. २: एज्रा १:१-११
क्र. ३: प्रामाणिक विवेक असण्याचे फायदे
क्र. ४: td-MR १ग भुतविद्या टाळली पाहिजे कारण ती दुरात्म्यांचे कार्य आहे
जाने. २३ बायबल वाचन: एज्रा ६-१० गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: स्पष्ट उच्चारलेले शब्द (be पृ. ८६ परि. १-६)
क्र. १: ‘दुरात्म्यांबरोबर झगडणे’ (wt पृ. ७०-५ परि. १-१२)
क्र. २: एज्रा ६:१-१२
क्र. ३: td-MR २क १९१४ (सा.यु.) मध्ये विदेश्यांच्या काळांची समाप्ती होते
क्र. ४: a विवाहाबद्दल देवाचा दृष्टिकोन
जाने. ३० बायबल वाचन: नहेम्या १-४ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: स्पष्टपणे कसे बोलावे (be पृ. ८७ परि. १-पृ. ८८ परि. ३)
क्र. १: जिंकण्यासाठी पूर्णपणे तयार (wt पृ. ७६-८ परि. १३-१५)
क्र. २: नहेम्या २:१-१०
क्र. ३: सर्वात महत्त्वपूर्ण प्रकारची सुरक्षा
क्र. ४: td-MR ३क येशूला वधस्तंभावर अपमानास्पद रीतीने टांगण्यात आले
फेब्रु. ६ बायबल वाचन: नहेम्या ५-८ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: स्पष्ट उच्चार—विचारात घेण्याजोगे मुद्दे (be पृ. ८९ परि. १-पृ. ९० परि. २)
क्र. १: दररोज बायबल वाचा (be पृ. १० परि. १-पृ. १२ परि. ४)
क्र. २: नहेम्या ५:१-१३
क्र. ३: td-MR ३ख क्रूसाची उपासना करू नये
क्र. ४: ‘आपल्या अंतःकरणाचे रक्षण करा’ (नीति. ४:२३)
फेब्रु. १३ बायबल वाचन: नहेम्या ९-११ गीत १३ (१२४)
भाषणाचा गुण: उच्चारात सुधारणा करण्याचे मार्ग (be पृ. ९० परि. ३-पृ. ९२)
क्र. १: युद्धाऐवजी शांती शिकणे (w०४-MR १/१ पृ. ६ परि. ८-पृ. ७ परि. ५)
क्र. २: नहेम्या १०:२८-३७
क्र. ३: यहोवा आपल्यावर प्रेम करत असल्याचा पुरावा
क्र. ४: td-MR ४क येशूचे मानवी जीवन “सर्वांसाठी खंडणी” म्हणून देण्यात आले
फेब्रु. २० बायबल वाचन: नहेम्या १२-१३ गीत २० (९३)
भाषणाचा गुण: अस्खलित भाषण (be पृ. ९३ परि. १-पृ. ९४ परि. ३)
क्र. १: पुनरुत्थानाच्या आशेचे सामर्थ्य (wt पृ. ७९-८३ परि. १-८)
क्र. २: नहेम्या १३:१-१४
क्र. ३: td-MR ४ख खंडणी समतुल्य किंमत होती
क्र. ४: b हिंसक व्हिडिओ गेम्स ख्रिश्चनांसाठी नाही
फेब्रु. २७ बायबल वाचन: एस्तेर १-५ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: अस्खलितपणासाठी सुधारणा कशी करावी (be पृ. ९४ परि. ४-पृ. ९६ परि. ३, पृ. ९५ वरील पेटी वगळून)
तोंडी उजळणी
मार्च ६ बायबल वाचन: एस्तेर ६-१० गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: तोतरेपणावर मात करणे (be पृ. ९५, पेटी)
क्र. १: “अधोलोकाच्या किल्ल्या” (wt पृ. ८३-९ परि. ९-१८)
क्र. २: एस्तेर ६:१-१०
क्र. ३: मृदु उत्तर रागाचे निवारण करू शकते
क्र. ४: td-MR ५क येशूचे परतणे मानवी डोळ्यांना अदृश्य
मार्च १३ बायबल वाचन: ईयोब १-५ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: विरामचिन्हे आणि विचारात बदल करण्यासाठी विराम (be पृ. ९७ परि. १-पृ. ९८ परि. ५)
क्र. १: त्या राज्याचा “कधी भंग होणार नाही” (wt पृ. ९०-६ परि. १-१०)
क्र. २: ईयोब २:१-१३
क्र. ३: td-MR ५ख जागतिक घडामोडींवरून त्याचे परतणे ओळखता येते
क्र. ४: खरे ख्रिस्ती कुरकुर करण्याचे का टाळतात
मार्च २० बायबल वाचन: ईयोब ६-१० गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: जोर देण्यासाठी विराम, ऐकण्यासाठी विराम (be पृ. ९९ परि. १-पृ. १०० परि. ४)
क्र. १: आध्यात्मिक मूल्यांची श्रेष्ठता (w०४-MR १०/१५ पृ. ४ परि. २-पृ. ५ परि. ३)
क्र. २: ईयोब ७:१-२१
क्र. ३: अंतःकरणात शुद्ध असण्याचा काय अर्थ होतो
क्र. ४: td-MR ६क खोट्या संदेष्ट्यांविषयी भाकीत करण्यात आले आहे; प्रेषितांच्या दिवसांतही होते
मार्च २७ बायबल वाचन: ईयोब ११-१५ गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: उचित अर्थावर जोर देणे (be पृ. १०१ परि. १-पृ. १०२ परि. ३)
क्र. १: “तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा” (be पृ. १३ परि. १-पृ. १४ परि. ५)
क्र. २: ईयोब १२:१-२५
क्र. ३: td-MR ७क चर्च आध्यात्मिक, ख्रिस्तावर उभारले आहे
क्र. ४: सेवेमुळे आपल्याला आनंद का मिळतो
एप्रि. ३ बायबल वाचन: ईयोब १६-२० गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: अर्थावर जोर देण्यात सुधारणा करणे (be पृ. १०२ परि. ४-पृ. १०४ परि. ४)
क्र. १: देवावर आपले प्रेम आहे हे आपण कसे दाखवतो (w०४-MR ३/१ पृ. १९-२१)
क्र. २: ईयोब १६:१-२२
क्र. ३: यहोवा त्याची उपासना करण्यासाठी लोकांना कसे आकर्षित करतो
क्र. ४: td-MR ७ख चर्च पेत्रावर उभारण्यात आलेले नाही
एप्रि. १० बायबल वाचन: ईयोब २१-२७ गीत १७ (१८७)
भाषणाचा गुण: मुख्य मुद्द्यांवर जोर देणे (be पृ. १०५ परि. १-पृ. १०६ परि. २)
क्र. १: आध्यात्मिक मूल्यांमुळे प्रतिफळ मिळते (w०४-MR १०/१५ पृ. ५ परि. ४-पृ. ७ परि. २)
क्र. २: ईयोब २४:१-२०
क्र. ३: यहोवा पराकोटीचे सामर्थ्य देतो
क्र. ४: td-MR ८क आज्ञाधारक मानवजातीला सार्वकालिक जीवनाची हमी दिली आहे
एप्रि. १७ बायबल वाचन: ईयोब २८-३२ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: श्रोत्यांच्या आवश्यकतेनुसार आवाज (be पृ. १०७ परि. १-पृ. १०८ परि. ४)
क्र. १: सभा व संमेलनांमध्ये ऐकणे (be पृ. १५ परि. १-पृ. १६ परि. ५)
क्र. २: ईयोब २९:१-२५
क्र. ३: td-MR ८ख स्वर्गीय जीवन केवळ ख्रिस्ताचे शरीर यात समाविष्ट असलेल्यांनाच मिळते
क्र. ४: येशूच्या शिक्षणामुळे लोकसमुदाय आश्चर्यचकित का झाला
एप्रि. २४ बायबल वाचन: ईयोब ३३-३७ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: तुमच्या आवाजात सुधारणा कशी करावी (be पृ. १०८ परि. ५-पृ. ११० परि. २)
तोंडी उजळणी
मे १ बायबल वाचन: ईयोब ३८-४२ गीत १ (१३)
भाषणाचा गुण: चढ-उतार—आवाज कमी-जास्त करा (be पृ. १११ परि. १-पृ. ११२ परि. २)
क्र. १: राज्याचे उद्देश—कसे साध्य केले जातील? (wt पृ. ९६-१०० परि. ११-१७)
क्र. २: ईयोब ३८:१-२४
क्र. ३: आज यशया ६०:२२ या वचनाची पूर्णता कशी होत आहे?
क्र. ४: td-MR ८ग पृथ्वीवरील जीवनाचे असीमित जणांस अभिवचन, “दुसरी मेंढरे”
मे ८ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १-१० गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: चढ-उतार—बोलण्याचा वेग कमी-जास्त करणे (be पृ. ११२ परि. ३-६)
क्र. १: ‘पहिल्याने त्याचे राज्य मिळविण्यास झटा’ (wt पृ. १०१-६ परि. १-९)
क्र. २: स्तोत्र ४:१-५:१२
क्र. ३: सुवचनांचा नमुना ओळखणे
क्र. ४: td-MR ९क जीवन काय आहे
मे १५ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ११-१८ गीत ९ (३७)
भाषणाचा गुण: आवाजाच्या पट्टीत फेरबदल (be पृ. ११३ परि. १-पृ. ११४ परि. ३)
क्र. १: तुमच्या जीवनात राज्याला प्रथम स्थान द्या (wt पृ. १०६-९ परि. १०-१५)
क्र. २: स्तोत्र १४:१-१६:६
क्र. ३: खरे ख्रिस्ती कोणत्या प्रकारे या जगाचे भाग नाहीत?
क्र. ४: td-MR १०क तारण देवाकडून येशूच्या खंडणी बलिदानाद्वारे मिळते
मे २२ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १९-२५ गीत २९ (२२२)
भाषणाचा गुण: भावनांसहित बोला (be पृ. ११५ परि. १-पृ. ११६ परि. ४)
क्र. १: समंजसपणाने कृपा संपादिता येते (w०४-MR ७/१५ पृ. २७ परि. ४-पृ. २८ परि. ४)
क्र. २: स्तोत्र २२:१-२२
क्र. ३: td-MR १०ख “एकदा तारण झाले की कायमचे झाले” हे बायबलनुसार नाही
क्र. ४: c देवाचे निर्बंध कोणते आहेत आणि आपण त्यांचे पालन का केले पाहिजे?
मे २९ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता २६-३३ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: साहित्याला अनुरूप उत्साह दाखवा (be पृ. ११६ परि. ५-पृ. ११७ परि. ४)
क्र. १: तुमच्या स्मरणशक्तीत तुम्ही सुधारणा करू शकता (be पृ. १७ परि. १-पृ. १९ परि. १)
क्र. २: स्तोत्र ३०:१-३१:८
क्र. ३: सत्य कोणत्या मार्गांनी बंधमुक्त करू शकते?
क्र. ४: td-MR १०ग “संपूर्ण जगाचे तारण होईल” हे बायबलनुसार नाही
जून ५ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ३४-३७ गीत २६ (२१२)
भाषणाचा गुण: कळकळ दाखवणे (be पृ. ११८ परि. १-पृ. ११९ परि. ५)
क्र. १: प्रार्थनेचे सामर्थ्य (w०४-MR ८/१५ पृ. १८ परि. ६-पृ. १९ परि. १०)
क्र. २: स्तोत्र ३४:१-२२
क्र. ३: td-MR ११क देव, जो पिता एकच व्यक्ती, विश्वात सर्वश्रेष्ठ आहे
क्र. ४: मूर्तिपूजेच्या कोणत्या प्रकारापांसून आपण पळ काढला पाहिजे?
जून १२ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ३८-४४ गीत ९ (३७)
भाषणाचा गुण: भावना व्यक्त करणे (be पृ. ११९ परि. ६-पृ. १२० परि. ५)
क्र. १: आठवण्यासाठी देवाच्या पवित्र आत्म्याची भूमिका (be पृ. १९ परि. २-पृ. २० परि. ३)
क्र. २: स्तोत्र ४०:१-१७
क्र. ३: खरे विज्ञान बायबलचे खंडन करत नाही
क्र. ४: td-MR ११ख पृथ्वीवर येण्याआधी आणि नंतरही पुत्र पित्यापेक्षा कमी
जून १९ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ४५-५१ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: हावभाव आणि चेहऱ्यावरील भाव यांचे महत्त्व (be पृ. १२१ परि. १-४)
क्र. १: येशूचे येणे केव्हा? (w०४-MR ३/१ पृ. १६, पेटी)
क्र. २: स्तोत्र ४६:१-४७:९
क्र. ३: td-MR ११ग देव आणि ख्रिस्त कोणत्या अर्थाने एक आहेत
क्र. ४: एखादा ख्रिस्ती अशक्त तेव्हाच सशक्त कसा असू शकतो? (२ करिंथ. १२:१०)
जून २६ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ५२-५९ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: हावभाव आणि चेहऱ्यावरील भाव व्यक्त करणे (be पृ. १२२ परि. १-पृ. १२३ परि. २)
तोंडी उजळणी
जुलै ३ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ६०-६८ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: सेवाकार्यात डोळ्यांत पाहून बोलणे (be पृ. १२४ परि. १-पृ. १२५ परि. ४)
क्र. १: यहोवाच्या नम्रतेचा आपल्यासाठी काय अर्थ होतो (w-MR०४ ११/१ पृ. २९-३०)
क्र. २: स्तोत्र ६०:१-६१:८
क्र. ३: ख्रिस्ती कार्यातील सहभाग देवाचे नियम तोडण्याची मोकळीक देतो का?
क्र. ४: td-MR ११घ देवाचा पवित्र आत्मा त्याची कार्यकारी शक्ती आहे
जुलै १० बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ६९-७३ गीत ९ (३७)
भाषणाचा गुण: भाषण देताना डोळ्यांत पाहून बोलणे (be पृ. १२५ परि. ५-पृ. १२७ परि. १)
क्र. १: मन लावून वाचन का केले पाहिजे? (be पृ. २१ परि. १-पृ. २३ परि. ३)
क्र. २: स्तोत्र ७१:१-१८
क्र. ३: td-MR १२क दियाबल आत्मिक व्यक्ती आहे
क्र. ४: d ख्रिश्चनांनी निःपक्षपाती का असावे
जुलै १७ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ७४-७८ गीत २० (९३)
भाषणाचा गुण: क्षेत्र सेवेत स्वाभाविक असा (be पृ. १२८ परि. १-पृ. १२९ परि. १)
क्र. १: योग्य उद्देश बाळगून वाचन करा (be पृ. २३ परि. ४-पृ. २६ परि. ५)
क्र. २: स्तोत्र ७५:१-७६:१२
क्र. ३: यहोवाचा शोध करण्यात काय समाविष्ट आहे? (सफ. २:३, पं.र.भा.)
क्र. ४: td-MR १२ख दियाबल जगाचा अदृश्य अधिपती आहे
जुलै २४ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ७९-८६ गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: स्टेजवर स्वाभाविकपणा (be पृ. १२९ परि. २-पृ. १३० परि. १)
क्र. १: ‘सरळांचा तंबू समृद्ध होईल’ (w०४-MR ११/१५ पृ. २६ परि. १-पृ. २८ परि. २)
क्र. २: स्तोत्र ८२:१-८३:१८
क्र. ३: td-MR १२ग दुरात्मे बंडखोर देवदूत आहेत
क्र. ४: अपरिपूर्ण मानव देवाला खरोखर प्रसन्न करू शकतात का?
जुलै ३१ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ८७-९१ गीत १५ (१२७)
भाषणाचा गुण: श्रोत्यांसमोर वाचताना स्वाभाविकपणा (be पृ. १३० परि. २-४)
क्र. १: जेव्हा “ज्ञानप्राप्ति होणे सोपे असते” आणि सुज्ञता आपल्याला नियंत्रित करते (w०४-MR ११/१५ पृ. २८ परि. ३-पृ. २९ परि. ७)
क्र. २: स्तोत्र ८९:१-२१
क्र. ३: बायबलचा अभ्यास आपल्या उपासनेचा भाग
क्र. ४: td-MR १३क जगातील समस्यांना कोण जबाबदार आहे
ऑग. ७ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ९२-१०१ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: वैयक्तिक स्वच्छता संदेशास शोभा आणते (be पृ. १३१ परि. १-३)
क्र. १: अभ्यास कसा करावा (be पृ. २७ परि. १-पृ. ३१ परि. २)
क्र. २: स्तोत्र ९२:१-९३:५
क्र. ३: td-MR १३ख दुष्टाईला अनुमती का देण्यात आली आहे
क्र. ४: नैतिक सत्वनिष्ठेचे महत्त्व
ऑग. १४ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १०२-१०५ गीत २६ (२१२)
भाषणाचा गुण: नम्रता आणि संयमाचा एखाद्याच्या पेहरावावर व वेशभूषेवर कसा परिणाम होतो (be पृ. १३१ परि. ४-पृ. १३२ परि. ३)
क्र. १: “हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत!” (w-MR०४ ११/१५ पृ. ८-९)
क्र. २: स्तोत्र १०४:१-२४
क्र. ३: आपण जागृत का राहिले पाहिजे
क्र. ४: td-MR १३ग अंताआधीचा हा दीर्घ काळ पुरवण्याद्वारे देवाने दया दाखवली आहे
ऑग. २१ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १०६-१०९ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: सभ्य पेहरावाचे मूल्य (be पृ. १३२ परि. ४-पृ. १३३ परि. १)
क्र. १: तरुणांनो—आंधळेपणाने तुमच्या मित्रमैत्रिणींचे अनुकरण करू नका (w०४-MR १०/१५ पृ. २२ परि. ४-पृ. २४ परि. ४)
क्र. २: स्तोत्र १०७:२०-४३
क्र. ३: td-MR १३घ जगाच्या दुःखद परिस्थितीवर उपाय मानवाकडून नाही
क्र. ४: आपण कोणत्या मार्गांनी देवाचे अनुकरण करू शकतो?
ऑग. २८ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ११०-११८ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: चांगला पेहराव इतरांना अडखळण्याचे कारण देत नाही (be पृ. १३३ परि. २-४)
तोंडी उजळणी
सप्टें. ४ बायबल वाचन: स्तोत्र ११९ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: बसण्या-उठण्याची लकब आणि नीटनेटकी साधनसामग्री (be पृ. १३३ परि. ५-पृ. १३४ परि. ४)
क्र. १: अभ्यासामुळे समाधान मिळते (be पृ. ३१ परि. ३-पृ. ३२ परि. ४)
क्र. २: स्तोत्र ११९:२५-४८
क्र. ३: आपण लौकिक अधिकाऱ्यांचा आदर का करतो
क्र. ४: td-MR १४क एकच खरा धर्म
सप्टें. ११ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १२०-१३४ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: भाषण देण्याची भीती कशी घालवावी (be पृ. १३५ परि. १-पृ. १३७ परि. २)
क्र. १: संशोधन कसे करावे (be पृ. ३३ परि. १-पृ. ३५ परि. ४)
क्र. २: स्तोत्र १२१:१-१२३:४
क्र. ३: td-MR १४ख खोट्या शिकवणीचे उचितरीत्या खंडन
क्र. ४: अतिशयोक्ती म्हणजे काय आणि येशूने तिचा कसा उपयोग केला?
सप्टें. १८ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १३५-१४१ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: शांती आणि संतुलन कसे राखावे (be पृ. १३७ परि. ३-पृ. १३८ परि. ५)
क्र. १: तुमच्या बाप्तिस्म्याचा अर्थ (wt पृ. ११०-१५ परि. १-१०)
क्र. २: स्तोत्र १३६:१-२६
क्र. ३: स्मारक कोणत्या अर्थाने शांत्यर्पणाचे भोजन आहे?
क्र. ४: td-MR १४ग आपला धर्म खोटा असल्याचे शाबीत झाल्यास, तो बदलणे अत्यावश्यक आहे
सप्टें. २५ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १४२-१५० गीत १७ (१८७)
भाषणाचा गुण: मायक्रोफोन्सचे महत्त्व (be पृ. १३९ परि. १-पृ. १४० परि. १)
क्र. १: आपल्या बाप्तिस्म्यानुसार जगणे (wt पृ. ११५-९ परि. ११-१६)
क्र. २: स्तोत्र १४२:१-१४३:१२
क्र. ३: td-MR १४घ “सर्व धर्मात चांगले आहे” असे दिसते, पण त्या सर्वांना देवाची स्वीकृती आहे असे म्हणता येत नाही
क्र. ४: आपण कोणत्या अर्थाने इतरांच्या गरजा स्वतःच्या गरजांच्या पुढे ठेवू शकतो?
ऑक्टो. २ बायबल वाचन: नीतिसूत्रे १-६ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: मायक्रोफोनचा प्रभावकारी वापर (be पृ. १४० परि. २-पृ. १४२ परि. १)
क्र. १: यहोवाच्या सिंहासनापुढे मोठा लोकसमुदाय (wt पृ. १२०-७ परि. १-१७)
क्र. २: नीतिसूत्रे ५:१-२३
क्र. ३: td-MR १५क नरक अग्नियातनांचे खरोखरचे ठिकाण नाही
क्र. ४: e कल्पित कहाण्या पसरवू नका (२ तीम. ४:४)
ऑक्टो. ९ बायबल वाचन: नीतिसूत्रे ७-११ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: उत्तर देताना बायबलचा उपयोग (be पृ. १४३ परि. १-३)
क्र. १: यहोवा आपल्या संघटनेला मार्गदर्शित कसे करतो—भाग १ (wt पृ. १२८-३१ परि. १-७)
क्र. २: नीतिसूत्रे ७:१-२७
क्र. ३: ख्रिस्ती तटस्थता आपल्या बंधुसमाजातील ऐक्याला हातभार लावते
क्र. ४: td-MR १५ख अग्नी सर्वनाशाचे द्योतक आहे
ऑक्टो. १६ बायबल वाचन: नीतिसूत्रे १२-१६ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: बायबलचा उपयोग करण्यात सुधारणा कशी करावी (be पृ. १४४ परि. १-४)
क्र. १: संशोधनासाठी इतर साहित्याचा उपयोग करण्यास शिकणे (be पृ. ३५ परि. ३-पृ. ३८ परि. ४)
क्र. २: नीतिसूत्रे १४:१-२१
क्र. ३: td-MR १५ग श्रीमंत मनुष्य आणि लाजर यांचा अहवाल चिरकालिक यातनेचा पुरावा नाही
क्र. ४: सभांमध्ये लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट मदत करू शकते?
ऑक्टो. २३ बायबल वाचन: नीतिसूत्रे १७-२१ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: बायबलचा उपयोग करण्यास प्रोत्साहन (be पृ. १४५-६)
क्र. १: यहोवा आपल्या संघटनेला मार्गदर्शित कसे करतो—भाग २ (wt पृ. १३१-५ परि. ८-१५)
क्र. २: नीतिसूत्रे १७:१-२०
क्र. ३: ख्रिश्चनांचा वयस्करांविषयीचा दृष्टिकोन
क्र. ४: td-MR १६क मानवाचे नशीब आधीच ठरवण्यात आलेले नाही
ऑक्टो. ३० बायबल वाचन: नीतिसूत्रे २२-२६ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: शास्त्रवचने प्रभावकारी पद्धतीने दाखवण्याचे महत्त्व (be पृ. १४७ परि. १-पृ. १४८ परि. २)
तोंडी उजळणी
नोव्हें. ६ बायबल वाचन: नीतिसूत्रे २७-३१ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: शास्त्रवचने दाखवण्यासाठी उचित टिपणी निवडणे (be पृ. १४८ परि. ३-पृ. १४९ परि. २)
क्र. १: सल्ला ऐका (wt पृ. १३६-९ परि. १-९)
क्र. २: नीतिसूत्रे २८:१-१८
क्र. ३: td-MR १७क पाप काय आहे
क्र. ४: क्षेत्रसेवेत भेटणाऱ्या लोकांचा आपण वरवर पाहून न्याय का करू नये
नोव्हें. १३ बायबल वाचन: उपदेशक १-६ गीत २ (१५)
भाषणाचा गुण: उचित जोर देण्यात भावनांचा समावेश (be पृ. १५० परि. १-२)
क्र. १: शिक्षेचा स्वीकार करा (wt पृ. १३९-४३ परि. १०-१६)
क्र. २: उपदेशक ५:१-१५
क्र. ३: बायबलचे सत्य ज्ञानी व विचारवंत लोकांपासून कसे गुप्त ठेवले आहे? (मत्त. ११:२५)
क्र. ४: td-MR १७ख आदामाच्या पापाचा परिणाम सर्वांना का सहन करावा लागला
नोव्हें. २० बायबल वाचन: उपदेशक ७-१२ गीत ९ (३७)
भाषणाचा गुण: योग्य शब्दांवर जोर देणे (be पृ. १५० परि. ३-पृ. १५१ परि. २)
क्र. १: “एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीति करा” (wt पृ. १४४-५० परि. १-१४)
क्र. २: उपदेशक ९:१-१२
क्र. ३: td-MR १७ग मना केलेले फळ खाणे आज्ञा मोडणे होते, लैंगिक संबंध ठेवणे नव्हे
क्र. ४: हेवा करणे चुकीचे का आहे?
नोव्हें. २७ बायबल वाचन: गीतरत्न १-८ गीत १५ (१२७)
भाषणाचा गुण: जोर देण्याचे मार्ग (be पृ. १५१ परि. ३-पृ. १५२ परि. ५)
क्र. १: घरात ईश्वरी भक्तीचे आचरण (wt पृ. १५१-८ परि. १-१३)
क्र. २: गीतरत्न ७:१-८:४
क्र. ३: ख्रिश्चनांचा पेहराव नीटनेटका, स्वच्छ आणि विनयशील का असला पाहिजे?
क्र. ४: td-MR १७घ कोणते पाप पवित्र आत्म्याविरुद्ध असू शकते (मत्त १२:३२; मार्क ३:२८, २९)
डिसें. ४ बायबल वाचन: यशया १-५ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: शास्त्रवचने योग्यप्रकारे लागू करणे (be पृ. १५३ परि. १-पृ. १५४ परि. ३)
क्र. १: ‘ते या जगाचे नाहीत’ (wt पृ. १५९-६६ परि. १-१५)
क्र. २: यशया ३:१-१५
क्र. ३: td-MR १८क मृतांसाठी आशा
क्र. ४: f ख्रिश्चनांनी “रागास मंद” का असावे (याको. १:१९)
डिसें. ११ बायबल वाचन: यशया ६-१० गीत २५ (२०४)
भाषणाचा गुण: शास्त्रवचन स्पष्टपणे लागू करणे (be पृ. १५४ परि. ४-पृ. १५५ परि. ४)
क्र. १: रुपरेषा तयार करणे (be पृ. ३९-४२)
क्र. २: यशया १०:१-१४
क्र. ३: क्षमा करणे इतके महत्त्वपूर्ण का आहे?
क्र. ४: td-MR १८ख स्वर्गीय अथवा पृथ्वीवरील जीवनासाठी पुनरुत्थान
डिसें. १८ बायबल वाचन: यशया ११-१६ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: शास्त्रवचनांतून तर्क करणे (be पृ. १५५ परि. ५-पृ. १५६ परि. ५)
क्र. १: तरुणांनो—आपल्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी आईवडिलांची मदत स्वीकारा! (w०४-MR १०/१५ पृ. २० परि. १-पृ. २२ परि. ३)
क्र. २: यशया ११:१-१२
क्र. ३: td-MR १९क पूर्वजांची उपासना करणे व्यर्थ आहे
क्र. ४: खरे ख्रिस्ती हर्मगिदोनाच्या युद्धात भाग घेणार नाहीत
डिसें. २५ बायबल वाचन: यशया १७-२३ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: व्यावहारिक मूल्य स्पष्ट करणे (be पृ. १५७ परि. १-पृ. १५८ परि. १)
तोंडी उजळणी
[तळटीपा]
a हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
b हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
c हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
d हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
e हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.
f हा भाग केवळ बांधवांना नेमण्यात यावा.