सेवा सभा आराखडा
सप्टेंबर १२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १८ (१६२)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून सप्टेंबर १ चा टेहळणी बुरूज अंक आणि जुलै-सप्टेंबरचा सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचे देखील प्रात्यक्षिक दाखवता येऊ शकेल. एक प्रात्यक्षिक वडिलांनी करावे व दुसरे एका तरुणाने. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर त्या विशिष्ट सादरतेतील काही उपयोगी मुद्द्यांकडे श्रोत्यांचे लक्ष वेधावे.
२० मि: “वेळेचा सदुपयोग करा.”a दररोज बायबल वाचण्याकरता आपण वेळ कसा काढतो याविषयी सांगण्याचे श्रोत्यांना निवेदन करा. कुटुंबांना व प्रत्येक सदस्याला आध्यात्मिक कार्यांसाठी वेळ काढण्याकरता मे २००५ आमची राज्य सेवा यातील पुरवणीचा उपयोग करण्याचे प्रोत्साहन द्या.
१५ मि: “प्रगतीशील बायबल अभ्यास चालवणे.”b या पुरवणीच्या भाग १ व २ वर श्रोत्यांसोबत चर्चा. ऑगस्ट २००४ आमची राज्य सेवा, पृष्ठ १ वरील लेखाचाही तुम्ही संदर्भ घेऊ शकता. बायबल अभ्यास घेण्याआधी प्रत्येक वेळी चांगली तयारी करणे का महत्त्वाचे आहे? चांगली तयारी म्हणजे नेमके काय? दिलेल्या सुचनांचे पालन केल्यामुळे तुम्हाला कोणता फायदा झाला आहे याबद्दल सांगण्यास श्रोत्यांना निवेदन करा. शेवटी, पुरवणीतील पहिल्या पृष्ठावरील अगदी वरती असलेल्या चौकोनातील मुद्द्यांवर टिप्पणी करावी.
गीत क्र. २६ (२१२) आणि समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर १९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ८ (५३)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील सदर अंकातील पहिल्या पृष्ठावर असलेल्या शाखा दफ्तराकडून आलेल्या पत्राची उजळणी करावी.
२० मि: मागच्या वर्षी आम्ही कितपत कार्य साध्य केले? सेवा पर्यवेक्षकांनी मागील सेवा वर्षाच्या कार्याची उजळणी करावी व सेवाकार्यात साध्य केलेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे. योग्य मुद्द्यांवर सर्वांची प्रशंसा करावी. येणाऱ्या वर्षभर लक्ष देण्याजोग्या एक किंवा दोन गोष्टींचा उल्लेख करावा. पायनियरांच्या कार्यावर टिप्पणी करावी व त्यांच्या उत्तम कार्याबद्दल त्यांची प्रशंसा करावी. अक्रियाशील व्यक्तींना मदत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे कोणते चांगले परिणाम घडून आले याविषयी सांगावे.
१५ मि: “एकमेकांची उन्नती करा.”c इतरांनी व्यक्त केलेल्या प्रेमळ काळजीमुळे आपल्याला कसा फायदा झाला याविषयी सांगण्यास श्रोत्यांना निवेदन करा.
गीत क्र. ११ (८५) आणि समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर २६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २३ (२००)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करा. प्रचारकांना सप्टेंबर महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी.
१५ मि: स्थानीय गरजा.
२० मि: नियतकालिकांच्या साहाय्याने सुवार्तेची घोषणा करणे. ऑक्टोबर महिन्यात आपण टेहळणी बुरूज व सावध राहा! ही नियतकालिके सादर करणार आहोत. भाषणाच्या प्रस्तावनेत आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००५ अंकातील पृष्ठ ८ वर परिच्छेद ३-६ यांतून खालील सूचनांवर चर्चा करावी: (१) मासिके जोडीने सादर करा. (२) आठवड्यातून एक दिवस मासिके सादर करण्याकरता खास राखून ठेवा. (३) महिन्यातून किती मासिके आपण देणार याचे व्यक्तिगत ध्येय ठेवा. (४) मासिके सादर करण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या. (५) जुन्या अंकाचाही चांगला उपयोग करा. वरील सूचना स्थानिक क्षेत्रात कशाप्रकारे उपयोगात आणता येतील हे स्पष्ट करावे. यानंतर पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून ऑक्टोबर १ चा टेहळणी बुरूज अंक आणि ऑक्टोबर-डिसेंबरचा सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचे देखील प्रात्यक्षिक दाखवता येऊ शकेल. शिवाय, मासिकातल्या मुख्य लेखांव्यतिरिक्त जे इतर लेख प्रकाशित केले जातात, त्यांकडे लक्ष वेधून, स्थानिक क्षेत्रात त्यांपैकी कोणते लेख लोकांना आवडतील हे सांगा आणि अशाच एखाद्या लेखावर आधारित असलेली सादरता प्रात्यक्षिकात दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर त्या विशिष्ट सादरतेतील काही उपयोगी मुद्द्यांवर चर्चा करा.
गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर ३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १ (१३)
५ मि: स्थानीय घोषणा.
२० मि: “‘मनापासून आज्ञाधारक’ बनण्यास इतरांना मदत करा.”d वेळ असल्यास, श्रोत्यांना उल्लेखित शास्त्रवचनांवर टिप्पणी देण्यास निवेदन करा.
२० मि: यहोवाचे मन आनंदित करणे. (नीति. २७:११) अनेक वर्षांपासून विश्वासूपणे यहोवाची सेवा करत असलेल्या दोन किंवा तीन प्रचारकांची मुलाखत घ्या. आपल्याला ज्यांमुळे यहोवाला आज्ञाधारक राहण्यास मदत मिळाली अशा एक किंवा दोन गोष्टींविषयी सांगण्यास त्यांना निवेदन करा. यांत सखोल व्यक्तिगत बायबल अभ्यास, सभांना नियमित उपस्थित राहणे, इतर एकनिष्ठ जनांसोबत सहवास, क्षेत्र सेवाकार्यात मनापासून सहभाग घेणे, मनःपूर्वक प्रार्थना व निकृष्ट दर्जाचे मनोरंजन टाळणे यांसारख्या गोष्टींचा उल्लेख करता येईल. आज्ञाधारक राहण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना कोणत्या परीक्षांना तोंड द्यावे लागले आणि या परीक्षांना यशस्वीरित्या तोंड देण्यास कशामुळे मदत मिळाली? आज्ञाधारक राहिल्यामुळे त्यांना कोणते आशीर्वाद लाभले आहेत?
गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.