वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०५ पृ. ६
  • नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • खास संमेलन दिवसाची उजळणी
    आमची राज्य सेवा—२००५
  • तुमची दृष्टी “सरळ” आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • आपला डोळा निर्दोष ठेवा
    आमची राज्य सेवा—२००४
  • नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—२००४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km ८/०५ पृ. ६

नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम

आपला डोळा ही एक अद्‌भुत रचना आहे. (स्तो. १३९:१४) तरीपण, तो एका वेळी एकाच वस्तुवर केंद्रित राहू शकतो. हे, शब्दशः आणि लाक्षणिक अर्थानेही खरे आहे. आपली आध्यात्मिक दृष्टी स्पष्ट असण्याकरता, आपण देवाची इच्छा पूर्ण करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. सैतानाच्या जगाच्या विकर्षणांना आलेला ऊत पाहू जाता, २००६ सेवा वर्षाचा खास संमेलन दिवस कार्यक्रम, “आपला डोळा निर्दोष ठेवा!” या विषयावर अधिक चर्चा करेल, हे किती उचित आहे.—मत्त. ६:२२.

यहोवाचे आशीर्वाद मिळण्याकरता आपण काय करू शकतो? (नीति. १०:२२) या प्रश्‍नाची चर्चा, “निर्दोष डोळा ठेवल्यामुळे आशीर्वाद प्राप्त करा,” या भाषणात केली जाईल. यांतील मुलाखती, शास्त्रवचनातील तत्त्वांचे पालन केल्यामुळे आपल्याला कशाप्रकारे फायदा मिळू शकतो यावर भर देतील. पाहुण्या वक्‍त्‌यांचे पहिले भाषण, आपले जीवन क्लिष्ट करून आपली आध्यात्मिक वाढ खुंटवू शकणाऱ्‍या गोष्टींविषयीची ताकीद देईल. या भाषणाचा विषय असेल: “दुष्ट जगात आपला डोळा निर्दोष ठेवणे.” “चांगला वाटा” निवडून घेण्यात काय काय गोवलेले आहे, हेही आपण शिकणार आहोत.—लूक १०:४२.

पालक आणि इतर बंधूभगिनी, तरुण ख्रिश्‍चनांना आध्यात्मिक ध्येयांवर आपले लक्ष केंद्रित करण्याचे प्रोत्साहन कसे देऊ शकतात? “आपले बाण अचूक निशाण्यावर मारणारे पालक” आणि “आध्यात्मिक ध्येये गाठण्याचा प्रयत्न करणारे तरुण” या भाषणांत, वरील महत्त्वपूर्ण प्रश्‍नावर पालकांचे व तरुणांचे मनोगत सादर केले जातील. (स्तो. १२७:४) पाहुण्या वक्‍त्‌यांच्या शेवटल्या भाषणात, आपण यहोवाच्या संघटनेबरोबर व्यक्‍ती यानात्याने, कुटुंब यानात्याने आणि मंडळी यानात्याने प्रगती कशी करू शकतो त्याची चर्चा केली जाईल.

आपण सत्यात नवीनच असलो काय किंवा दशकांपासून यहोवाची सेवा करत असलो काय, आपण आपला “डोळा निर्दोष” ठेवणे महत्त्वाचे आहे. आणि खास संमेलन दिवस कार्यक्रम आपल्याला नेमके हेच करायला मदत करेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा