वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०५ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००५
  • उपशिर्षक
  • ऑगस्ट ८ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट १५ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २२ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २९ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर ५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००५
km ८/०५ पृ. २

सेवा सभा आराखडा

सूचना: “देवाच्या आज्ञेत राहा” या प्रांतीय अधिवेशनाला हजर राहिल्यानंतर, प्रचारकांना क्षेत्र सेवेत उपयोगी वाटणाऱ्‍या अधिवेशनातील मुद्द्‌यांची उजळणी करण्याकरता सेवा सभेत, १५ ते २० मिनिटे (शक्यतो स्थानीय गरजा हा भाग) बाजूला राखावीत. सेवा सभेतील हा खास भाग आपल्याला, अधिवेशनात आपण जे काही शिकलो ते कसे लागू करत आहोत आणि यामुळे आपली सेवा आणखी प्रभावकारी कशी झाली आहे हे व्यक्‍त करण्याची संधी देईल.—आमची राज्य सेवा याच्या एप्रिल २००५ अंकातील पृष्ठ २ पाहा.

ऑगस्ट ८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २३ (२००)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. २००६ सेवा वर्षाच्या विभागीय व खास संमेलनाच्या तारखा माहीत असतील तर प्रचारकांना त्यांची आठवण करून द्या.

१० मि: “तुम्ही हस्तपत्रिकांचा उपयोग करता का?” भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. हस्तपत्रिकांचा उपयोग केल्यामुळे जे चांगले फायदे झाले त्यावर टिपणी करायला श्रोत्यांना आमंत्रण द्या. एक प्रचारक हस्तपत्रिकेचा उपयोग करून एका आस्थेवाईक व्यक्‍तीला सभेला येण्याचे आमंत्रण देतो, असे एक लहानसे प्रात्यक्षिक दाखवा.

२५ मि: “प्रचार करण्याची हीच वेळ आहे!”a आधीच एक किंवा दोन सामान्य पायनियरांना, पायनियरींग करण्याकरता त्यांना कोणते बदल करावे लागले आणि यामुळे त्यांना कोणते उत्तम परिणाम मिळाले यावर टिपणी करण्यास सांगा.

गीत क्र. २० (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट १५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ९ (३७)

१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून ऑगस्ट १ चा टेहळणी बुरूज अंक आणि जुलै-सप्टेंबरचा सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. एक वडील आणि एक आजारी प्रचारक टेलिफोनवरून साक्षकार्य करत असल्याचे दाखवा.

१५ मि: तुम्हाला आठवते का? टेहळणी बुरूज डिसेंबर १५, २००४ अंकाच्या पृष्ठ ३० वर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. प्रत्येक प्रश्‍नावर टिपणी करण्याचे श्रोत्यांना उत्तेजन द्या. साहित्याच्या व्यावहारिक मूल्यावर जोर द्या. टेहळणी बुरूज आणि सावध राहा! याचा प्रत्येक अंक काळजीपूर्वक वाचण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.

२० मि: “दारात उभे राहून व टेलिफोनवर बायबल अभ्यास सुरू करणे.”b एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. अपेक्षा माहितीपत्रकातील केवळ एका किंवा दोन परिच्छेदाचा उपयोग करून पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास कसा करायचा ते प्रात्यक्षिकात दाखवा. टेलिफोनवरून बायबल अभ्यास सुरू करण्याविषयीचे एक किंवा दोन प्रोत्साहनदायक अनुभव थोडक्यात सांगा.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट २२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २६ (२१२)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करा.

१५ मि: स्थानीय गरजा.

२० मि: “राज्य प्रचार—बहुमूल्य सुसंधी.”c चवथ्या परिच्छेदाची चर्चा करताना, वयामुळे किंवा आजारामुळे सेवेत जास्त भाग घेऊ न शकणाऱ्‍यांसाठी, १५-१५ मिनिटे सेवा करण्याची जी खास योजना केली त्याची उजळणी करा.—आमची राज्य सेवा याच्या ऑक्टोबर २००२ अंकातील पृ. ८, परि. ६ पाहा.

गीत क्र. २५ (२०४) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट २९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि: स्थानीय घोषणा. प्रचारकांना ऑगस्ट महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून सप्टेंबर १ चा टेहळणी बुरूज आणि जुलै-सप्टेंबरचा सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. एका प्रात्यक्षिकात, मॅग्झीन रूट असलेल्या व्यक्‍तीला पुनर्भेट देत असल्याचे दाखवा.

१५ मि: “शब्दांविना साक्ष.”d देवाच्या लोकांचे आचरण पाहून, यहोवाचे सेवक होण्याचे प्रोत्साहन कसे मिळाले यावर टिपणी द्यायला काही निवडक प्रचारकांना आमंत्रण द्या.

२० मि: पहिल्या भेटीत बायबलविषयी सांगा. भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. आमची राज्य सेवा, सप्टेंबर २००४ अंकातील पृष्ठ ४, परिच्छेद २ मधील, पहिल्या भेटीत घरमालकाचे लक्ष बायबलकडे आकर्षित करण्याविषयी असलेल्या सूचनांची उजळणी करा. सप्टेंबर महिन्याच्या साहित्य सादरतेसोबत एक किंवा दोन सुचवलेल्या सादरतांचा उपयोग कसा करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवा. महिन्याचे साहित्य देण्याकरता, आमची राज्य सेवा याच्या जानेवारी २००५ अंकाच्या पुरवणीत असलेल्या सुचनांची देखील चर्चा करता येईल आणि वेळ असल्यास प्रात्यक्षिक दाखवता येईल.

गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर ५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १६ (१४३)

१० मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: “प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे—भाग १२.”e एक किंवा दोन प्रचारकांना आधीच, बायबल अभ्यासांची सुरुवात करून ते संचालित करण्यात प्रगती करायला कोणत्या गोष्टीमुळे त्यांना मदत मिळाली यावर टिपणी करायला सांगा.

२० मि: वयोवृद्धांची काळजी घेण्याची व्यवस्था. टेहळणी बुरूज ऑगस्ट १५, १९९३, पृष्ठे २८-९ (इंग्रजी) वरील “सुनियोजन करणे फायदेकारक आहे,” या मथळ्याखालील माहितीच्या आधारावर वडिलांचे भाषण. आजारी व वयोवृद्ध बंधूभगिनींची काळजी घेण्याकरता मंडळीत करण्यात आलेल्या व्यवस्थांविषयी सांगा.

गीत क्र. १९ (१६४) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा