वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०५ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००५
आमची राज्य सेवा—२००५
km ७/०५ पृ. ३

घोषणा

▪ साहित्य सादरता जुलै व ऑगस्ट: खालीलपैकी कोणतेही ३२-पानी माहितीपत्रक वापरले जावे: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करितो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखर आपली काळजी करतो का?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी). सप्टेंबर: तुमची काळजी वाहणारा सृष्टीकर्ता आहे का? हे पुस्तक सादर करावे. पर्यायी सादरता म्हणून जीवन—ते कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? हे पुस्तक किंवा कोणतेही १९२ पानी जुने पुस्तक सादर केले जाऊ शकते. घरमालकाने पुस्तक स्वीकारले नाही तर जागृत राहा! हे माहितीपत्रक द्यावे. ऑक्टेबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या प्रती द्याव्यात. घरमालकाने आस्था दाखवल्यास कृपया अपेक्षा माहितीपत्रक द्यावे.

▪ सप्टेंबरपासून, विभागीय पर्यवेक्षक “बायबलचे मार्गदर्शन का स्वीकारावे?” हे शीर्षक असलेले जाहीर भाषण देतील.

▪ आम्ही असे सुचवू इच्छितो की सामान्य पायनियर सेवेकरता केलेले अर्ज, विनंती केलेल्या तारखेच्या कमीतकमी ३० दिवसांआधी शाखा दफ्तराला सादर केले जावेत. अर्ज पाठवण्याआधी मंडळीच्या सचिवांनी, ते पूर्णपणे भरले आहेत की नाही याची खात्री करावी. जर अर्जदारांना बाप्तिस्म्याची नेमकी तारीख आठवत नसेल, तर त्यांनी अंदाज करून तारीख भरावी आणि या तारखेची नोंद करून ठेवावी. सचिवांनीही या तारखेची मंडळीचे प्रचारक अहवाल कार्ड (S-21) यावर नोंद करावी.

▪ विशेष सूचना: वार्षिक साहित्याच्या मागणीचा स्पेशल रिक्वेस्ट फॉर्म मंडळ्यांना पाठवला जात आहे. ज्या मंडळ्यांनी अद्यापही २००६ करता वार्षिकपुस्तक, कॅलेंडर व शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे या वार्षिक प्रकाशनांच्या साठ्याची विनंती केलेली नाही त्यांनी आपली मागणी लवकरात लवकर पाठवावी. ज्या मंडळ्या किंग्डम हॉल लिटरेचर इनव्हेंटरी अरेंजमेंट या व्यवस्थेखाली आहेत त्यांनी आपल्या मागण्या “कोऑर्डिनेटिंग” मंडळीच्या मार्फतच पाठवाव्यात. पण या कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या सचिवाने त्यांच्या लिटरेचर ग्रूपमध्ये असणाऱ्‍या प्रत्येक मंडळीकरता आवश्‍यक साठा मागवण्याची खात्री करावी.

▪ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला प्रशिक्षणापासून फायदा घ्या —कन्‍नड

आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? —नेपाळी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा