वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०५ पृ. ४
  • देव खरोखरी आपली काळजी करतो का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव खरोखरी आपली काळजी करतो का?
  • आमची राज्य सेवा—२००५
  • उपशिर्षक
  • एखाद्या दुःखद घटनेचा उल्लेख केल्यावर तुम्ही असे म्हणू शकता:
  • पुनर्भेटीत तुम्ही असे म्हणू शकता:
  • किशोरवयीन प्रचारक असे म्हणू शकतो:
  • पुनर्भेटीत तुम्ही असे म्हणू शकता:
  • लहान मुलांसोबत कार्य करताना, प्रौढ प्रचारकाने दोघांची ओळख करून द्यावी व असे म्हणावे:
  • पुनर्भेटीत प्रौढ प्रचारक असे म्हणू शकतो:
आमची राज्य सेवा—२००५
km ६/०५ पृ. ४

देव खरोखरी आपली काळजी करतो का?

हे माहितीपत्रक देताना वापरण्याजोग्या काही सादरता

एखाद्या दुःखद घटनेचा उल्लेख केल्यावर तुम्ही असे म्हणू शकता:

“देवाला जर आपली खरोखरच काळजी आहे तर मग तो मानवांवर दुःख का येऊ देतो असा प्रश्‍न कधी तुमच्या मनात आला आहे का? [उत्तर ऐकून घ्या.] या माहितीपत्रकात या प्रश्‍नाचे पटण्याजोगे उत्तर दिले आहे आणि लवकरच देव काय करणार आहे याबद्दलही यात सांगण्यात आले आहे. [पृष्ठ २७ वरील चित्रे दाखवा आणि परि. २२ मधून स्तोत्र १४५:१६ हे वचन वाचून दाखवा.] पण आजपर्यंत मानवाने जे दुःख भोगले आहे, त्याचे परिणाम देव कसे काय काढून टाकेल? याविषयी माझ्या पुढच्या भेटीत तुम्हाला माहिती द्यायला मला आवडेल.” माहितीपत्रक द्या आणि पुढच्या भेटीची वेळ ठरवून घ्या.

पुनर्भेटीत तुम्ही असे म्हणू शकता:

“मागच्या वेळी मी तुम्हाला हे वचन वाचून दाखवले होते. [स्तोत्र १४५:१६ वाचा किंवा उद्धृत करा.] मग मी हा प्रश्‍न विचारला होता, की मानवांनी आजपर्यंत भोगलेल्या दुःखाचे परिणाम देव कसे काय काढून टाकेल?” त्या व्यक्‍तीला माहितीपत्रकाची स्वतःची प्रत आणण्यास सांगा. मग पृष्ठे २७-८ उघडून परिच्छेद २३-५ यांवर चर्चा करा. बायबल अभ्यास करण्याविषयी विचारा किंवा पुढच्या भेटीत परिच्छेद २६-७ वर चर्चा करू असे सांगा.

किशोरवयीन प्रचारक असे म्हणू शकतो:

“माझ्या वयाच्या अनेक मुलामुलींना काळजी वाटते, की येत्या १०-१५ वर्षांत या जगाचे काय चित्र असेल? तुम्हाला काय वाटते, कशी परिस्थिती असेल? [उत्तर ऐकून घ्या.] आपण आज ज्या समस्या पाहात आहोत त्यांवरून असे सूचित होते की आपण आज शेवटल्या काळात जगत आहोत. [२ तीमथ्य ३:१-३ वाचा.] या माहितीपत्रकात पुढील प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत. [मुखपृष्ठावरील प्रश्‍न वाचा आणि माहितीपत्रक द्या.] पुढच्या वेळी मी येईन तेव्हा तुमच्याजवळ काही मिनिटे वेळ असल्यास आजारपण व म्हातारपण कसे संपुष्टात येईल याविषयी एक सांत्वनदायक विचार तुम्हाला सांगायला मला आवडेल.” पुढच्या भेटीची वेळ ठरवा.

पुनर्भेटीत तुम्ही असे म्हणू शकता:

“आपल्या मागच्या भेटीत मी तुम्हाला सांगितले होते, की आजारपण व म्हातारपण कसे संपुष्टात येईल याविषयी मी तुम्हाला सांगेन. तो सांत्वनदायक विचार येथे दिला आहे, पाहा.” त्या व्यक्‍तीला आपले माहितीपत्रक आणण्यास सांगा आणि मग २३-४ पृष्ठांवरील परिच्छेद ६-७ वाचून त्यांवर चर्चा करा. पुढच्या भेटीत परिच्छेद ८-९ यांवर चर्चा करू असे सांगा.

लहान मुलांसोबत कार्य करताना, प्रौढ प्रचारकाने दोघांची ओळख करून द्यावी व असे म्हणावे:

“तुमची हरकत नसल्यास, — तुम्हाला एक वचन वाचून दाखवू इच्छितो. [लहान मुलाने स्तोत्र ३७:२९ वाचावे व त्यावर लहानशी टिप्पणी करावी.] देव मानवजातीबद्दल व या पृथ्वीबद्दल असलेला त्याचा उद्देश कसा पूर्ण करेल याविषयी या माहितीपत्रकात सांगितले आहे. [पृष्ठे २४-७ वरील चित्रे दाखवा.] आम्ही पुढच्या वेळी येऊ तेव्हा, मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याविषयीच्या अद्‌भुत आशेविषयी मी तुम्हाला बायबलमधून दाखवेन.” माहितीपत्रक द्या व पुढच्या भेटीची वेळ ठरवा.

पुनर्भेटीत प्रौढ प्रचारक असे म्हणू शकतो:

“मागच्या वेळी आपण स्तोत्र ३७:२९ वाचून पाहिले होते आणि मी तुम्हाला मृतांना जिवंत केले जाण्याविषयी बायबलमधून दाखवेन असे सांगितले होते. पाहा येथे काय म्हटले आहे.” त्या व्यक्‍तीला माहितीपत्रकाची आपली प्रत आणण्यास सांगा आणि मग पृष्ठे २४-५ वरील परिच्छेद १२-१४ वर चर्चा करा. बायबल अभ्यास करण्याविषयी विचारा किंवा पुढच्या भेटीत परिच्छेद १५-१६ यांवर चर्चा करण्याविषयी सांगा व भेटीची वेळ ठरवून घ्या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा