जपून ठेवा
माहितीपत्रक देताना वापरण्याजोग्या काही सादरता
माहितीपत्रके सादर करण्याकरता उपयोगी पडतील अशा निवडक सादरता या पुरवणीत सुचवत आहोत. स्थानिक परिस्थितीनुसार तुम्ही त्यांत फेरबदल करू शकता. यांसोबत इतर सादरतांचाही तुम्ही उपयोग करू शकता. ज्या माहितीपत्रकांकरता या पुरवणीत सादरता सुचवण्यात आलेल्या नाहीत, त्यांकरता तुम्ही स्वतः यातील सूचनांचा उपयोग करून सादरता तयार करू शकता.—आमची राज्य सेवा जानेवारी २००५ पृ. ८ पाहा.
या पृष्ठावर सुचवलेल्या प्रत्येक सादरतेत (१) संभाषण सुरू करण्याकरता एक विचार प्रवर्तक प्रश्न, (२) माहितीपत्रकात चर्चेकरता मुद्दे कोठे सापडतील याचा संदर्भ आणि (३) चर्चेदरम्यान वाचण्याजोगे एक योग्य शास्त्रवचन तुम्हाला आढळेल. यांचा आधार घेऊन, घरमालकाच्या प्रतिक्रियेनुसार, तुम्ही बाकीची माहिती स्वतःच्या शब्दांत सादर करू शकता.
सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक
“बायबलमध्ये आपल्या काळात उपयोगी ठरू शकेल अशी माहिती आहे असे तुम्हाला वाटते का?”—पृ. २२, चित्राखालील मथळा; पृ. २३, चौकोनातील परि. ३; नीति. २५:११.
समाधानी जीवन —कसे मिळवता येईल?
“सबंध जगातील लोक आपले जीवन अधिक सुखी कसे होईल या प्रयत्नात आहेत. जीवनात खऱ्या अर्थाने समाधानी होणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का?”—पृ. २९, परि. ६; २ पेत्र ३:१३.
भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!
“अनेकांना वाटते की आपण स्वर्गात जाऊ तेव्हा आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. पण याच पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याविषयी तुम्ही काय म्हणाल?”—मुखपृष्ठावरील चित्र; प्रकटी. २१:४.
तुम्ही त्रैक्य मानावे का?
“देव मुळात कसा आहे याबाबतीत अनेकांची वेगवेगळी मते आहेत. आपण काय मानतो यामुळे काही फरक पडतो असे तुम्हाला वाटते का?”—पृ. ३, परि. ३, ७-८; योहा. १७:३.
सर्वकाळ टिकणारे ईश्वरी नाव
“बहुतेक लोकांना ‘आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो’ ही प्रार्थना माहीत आहे. (मत्त. ६:९) पण हे नाव माहीत असण्यावर आपले तारण अवलंबून आहे हे तुम्हाला माहीत होते का?”—पृ. २८, परि. १; रोम. १०:१३.
नंदनवन आणविणारे सरकार
“आपण आज ज्या अनेक समस्यांना तोंड देतो त्या लवकरात लवकर सुटाव्यात असे बऱ्याच जणांना वाटते. पण तुम्हाला काय वाटते, या कठीण समस्या सोडवण्यात यशस्वी होईल असे सरकार कधी येऊ शकेल का?”—पृ. ३, परि. १; मत्त. ६:९, १०.
मृत्यूच्या वेळी काय होते?
“आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा साहजिकच आपण विचार करतो की आता ती व्यक्ती कोठे असेल आणि पुन्हा कधी आपण तिला पाहू शकू का? हे प्रश्न तुमच्या मनात कधी आले का?”—मागच्या पृष्ठावरील प्रश्न; ईयो. १४:१४, १५.
तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा
“आज आम्ही हे माहितीपत्रक लोकांना देत आहोत. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे शोकाकूल असलेल्या लाखो लोकांना या माहितीपत्रकाने सांत्वन व दिलासा दिला आहे. मृतांकरता काही आशा असावी, यावर कधी तुम्ही विचार केला आहे का?”—पृ. २७, परि. ३; योहा. ५:२८, २९.
“प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे खिन्न असलेल्या एखाद्या व्यक्तीला सांत्वन कसे देता येईल असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का?”—पृ. २०, परि. १; नीति. १७:१७.