वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०५ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००५
  • उपशिर्षक
  • जून १३ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून २० ने सुरू होणारा सप्ताह
  • जून २७ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै ४ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००५
km ६/०५ पृ. २

सेवा सभा आराखडा

जून १३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ७ (५१)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून जून १ चा टेहळणी बुरूज अंक आणि एप्रिल-जूनचा सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचे देखील प्रात्यक्षिक दाखवता येऊ शकेल. एका प्रात्यक्षिकात एखाद्या अनौपचारिक प्रसंगी नियतकालिक कसे देता येईल हे दाखवा.

१५ मि: इतरांना बाप्तिस्मा न झालेले प्रचारक बनण्यास मदत करा. यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास सुसंघटित (इंग्रजी) या पुस्तकातील पृष्ठे ७९-८१ वरील माहितीच्या आधारावर वडिलाने श्रोत्यांशी चर्चा करावी. एखादा बायबल विद्यार्थी शास्त्रवचनांनुसार मंडळीसोबत प्रचार कार्य करण्याच्या योग्यतेचा आहे की नाही हे ठरवण्याकरता कोणती व्यवस्था आहे याची चर्चा करा. पुढच्या आठवडी आपण पाहू की जे बायबल विद्यार्थी, बाप्तिस्मा न झालेले प्रचारक बनतात त्यांना आपण घरोघरच्या सेवाकार्यात सहभाग घ्यायला सुरुवात करण्यास कसे प्रशिक्षित करू शकतो.

२० मि: “प्रचार कार्य धीर धरण्यास मदत करते.”a उपलब्ध वेळेनुसार, श्रोत्यांना लेखात उल्लेखलेल्या शास्त्रवचनांवर टिप्पणी करण्याचे निवेदन करा.

गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

जून २० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि: स्थानीय घोषणा. जुलै २००३ आमची राज्य सेवा यातील पृष्ठ ८ वरील मुख्य मुद्द्‌यांची उजळणी करा. प्रचारकांना परदेशी भाषेतील साहित्य कसे मिळवता येईल हे स्पष्ट करा. ही माहिती स्थानिक क्षेत्राकरता कशी समर्पक आहे याची चर्चा करा. परदेशी भाषेतील कोणत्याही प्रकाशनाची मागणी, फक्‍त एकच प्रकाशन मागवायचे असले तरीसुद्धा ती साहित्य सेवकाकडूनच केली जावी, जेणेकरून आवश्‍यक साहित्य मिळवण्यास विनाकारण उशीर होणार नाही.

१५ मि: मार्च, एप्रिल व मे महिन्यात आलेले क्षेत्र सेवेतील अनुभव सांगा किंवा प्रात्यक्षिकाच्या रूपात सादर करा. स्मारकविधीच्या महिन्यांत सेवेतील सहभाग वाढवण्याकरता कोणकोणते विशेष प्रयत्न केले आणि त्यांना कोणते आशीर्वाद अनुभवायला मिळाले याविषयी सांगण्यास एका-दोघांना आधीपासूनच सांगा. जागृत राहा! माहितीपत्रकाच्या वाटपानंतर पुनर्भेटी करताना आलेले अनुभव सांगण्याचे श्रोत्यांना निवेदन करा. उल्लेखनीय अनुभव प्रात्यक्षिकाच्या रूपात सादर करण्याची आधीपासूनच व्यवस्था करा. या विशेष मोहिमेला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांची प्रशंसा करा.

२० मि: “प्रगतिशील बायबल अभ्यास संचालित करणे—भाग १०.”b प्रचारक बायबल विद्यार्थ्यासोबत सराव करत असल्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा. विद्यार्थी एका सादरतेचा सराव करत आहे. अभ्यास संचालक जो घरमालकाची भूमिका करत आहे, तो क्षेत्रात सहसा ऐकायला मिळणारा आक्षेप घेतो. विद्यार्थ्याला चटकन उत्तर सुचत नाही, तेव्हा अभ्यास संचालक त्याला अशा प्रसंगी कसे बोलता येईल हे सांगतो, असे दाखवावे. शिवाय, घरोघरच्या सेवाकार्यात सहभागी होण्यास सुरू केले तेव्हा आपल्याला कशाप्रकारे प्रशिक्षण देण्यात आले याविषयी टिप्पणी करण्यास एका-दोघांना आधीपासूनच सांगून ठेवा.

गीत क्र. ८ (५३) आणि समाप्तीची प्रार्थना.

जून २७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १२ (११३)

१० मि: स्थानीय घोषणा. प्रचारकांना जून महिन्याकरता क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्या. जमाखर्च अहवाल वाचून दाखवा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून जुलै १ चा टेहळणी बुरूज अंक किंवा जुलै-सप्टेंबर सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचे देखील प्रात्यक्षिक दाखवता येऊ शकेल. प्रात्यक्षिकानंतर, घरमालकाची आस्था जागृत करण्याकरता सुरुवातीला काय म्हणण्यात आले हे पुन्हा सांगा.

१५ मि: स्थानिक गरजा.

२० मि: जुलै व ऑगस्ट महिन्यांत माहितीपत्रके सादर करणे. पुरवणीवर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. या पुरवणीचा कसा उपयोग केला जावा हे थोडक्यात सांगा. पृष्ठ ३ वरील चौकान व आमची राज्य सेवा याच्या जानेवारी २००५ अंकातील पृष्ठ ८ वरील मुख्य मुद्द्‌यांचा उल्लेख करा. पहिल्याच भेटीत माहितीपत्रके देण्याकरता स्थानिक क्षेत्रांत कोणत्या सादरता वापरण्याजोग्या आहेत याची चर्चा करा. दोन किंवा तीन सादरता प्रात्यक्षिकाच्या रूपात दाखवा. यातील कमीतकमी एका प्रात्यक्षिकाकरता एखाद्या लहान प्रचारकाला निवडा.

गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.

जुलै ४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २२ (१३०)

१० मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: कौटुंबिक आराखडा तयार केल्यामुळे तुम्हाला फायदा झाला आहे का? आमची राज्य सेवा याच्या मे २००५ अंकातील सूचनांची उजळणी करा आणि या सूचनांचा उपयोग करण्याकरता आपण कोणते खास प्रयत्न केले व त्यामुळे आपल्याला कोणते फायदे अनुभवायला मिळाले याविषयी टिप्पणी करण्यास श्रोत्यांना निवेदन करा.

२० मि: “सार्वजनिक ठिकाणी परिणामकारकरित्या साक्ष देणे.”c स्थानिक क्षेत्राकरता ही माहिती कशाप्रकारे समर्पक आहे ते सांगा. प्रचारकांना कृपया पुनर्भेट द्या (S-43) हा फॉर्म उचित प्रसंगी वापरण्याचे प्रोत्साहन द्या.—आमची राज्य सेवा, फेब्रुवारी २००५ अंकातील पृ. ६.

गीत क्र. २५ (२०४) व समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा