ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
जून २७, २००५ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, मे २ ते जून २७, २००५ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]
भाषणाचे गुण
१. उपमा आणि रूपके ही, शिकवण्याची शक्तिशाली साधने का आहेत? (उत्प. २२:१७; स्तो. १:३; याको. ३:६) [be पृ. २४० परि. २-४, चौकोन]
२. महत्त्वपूर्ण धडे शिकवणारी उदाहरणे आपल्याला कोठे मिळू शकतील, परंतु याबाबतीत आपण कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे? [be पृ. २४२ परि. १-२]
३. उदाहरणे प्रभावकारी ठरण्यासाठी ती उदाहरणे निवडताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? [be पृ. २४४ परि. १-२]
४. शिकवताना आपण, दृश्य साधनांचा उपयोग का केला पाहिजे आणि यहोवाने हे कसे केले आहे? [be पृ. २४७ परि. १-२, चौकोन]
५. क्षेत्र सेवेत आपण दृश्य गोष्टींचा उपयोग कसा करू शकतो? [be पृ. २४८ परि. १-पृ. २४९ परि. २]
नेमणूक क्र. १
६. मुलांच्या शिक्षणाविषयी देवाच्या वचनात कोणते मार्गदर्शन देण्यात आले आहे? [w-MR०३ ३/१५ पृ. १२ परि. २; पृ. १४ परि. ३]
७. यहोवाने तरुण दावीदामध्ये आस्था कशी घेतली आणि दावीदाने यहोवामध्ये आस्था कशी घेतली? [w-MR०३ ४/१५ पृ. २९ परि. ४; पृ. ३० परि. ३]
८. यहोवा हाबेलाच्या अर्पणावर संतुष्ट का होता, व यावरून आपल्याला कोणती खात्री मिळते? (उत्प. ४:४) [w-MR०३ ५/१ पृ. २८ परि. ४-पृ. २९ परि. १]
९. नीतिसूत्रे ३:११ [NW] नुसार “यहोवाची शिक्षा” काय आहे जिला आपण तुच्छ मानू नये? [w-MR०३ १०/१ पृ. २० परि. २-४]
१०. पहिले तीमथ्य ६:६-८ मध्ये वापरण्यात आलेल्या “समाधान” या शब्दाचा काय अर्थ होतो? [w-MR०३ ६/१ पृ. ९ परि. १-२; पृ. १० परि. १]
साप्ताहिक बायबल वाचन
११. योनाथान व दावीद यांच्यातील प्रेमळ नाते कशाचे प्रतीक होते? (२ शमु. १:२६) [w-MR८९ ६/१ पृ. २६ परि. १३]
१२. जेरुसलेममध्ये कराराचा कोश आणण्याचा दावीदाने केलेल्या पहिल्या प्रयत्नातून आपण काय शिकू शकतो? (२ शमु. ६:२-९)
१३. अनुवाद २४:१६ आणि यहेज्केल १८:२० म्हणते, की बापाच्या पापासाठी मुलाला मारू नये, मग दावीद आणि बथशेबाने पाप केल्यानंतर त्यांचा मुलगा का मेला? (२ शमु. १२:१४; २२:३१)
१४. सीबाने मफीबोशेथवर लावलेला आरोप खोटा होता हे आपल्याला कसे माहीत होते? (२ शमु. १६:१-४)
१५. सीबाच्या वागणुकीवर मफीबोशेथने दाखवलेली प्रतिक्रिया आपल्यासाठी एक उदाहरण कशी आहे? (२ शमु. १९:२४-३०)