वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०५ पृ. १
  • यहोवाचा दिवस जवळ आला आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा दिवस जवळ आला आहे
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • पवित्र शास्त्र इतिहासातील प्रबळ जागतिक सत्ता विनाशाकडे कूच करीत आहेत!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • देवाचं राज्य सुरू झालंय!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • “जागृत राहा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • बायबलमधल्या भविष्यवाण्यांमधून शिकत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km ५/०५ पृ. १

यहोवाचा दिवस जवळ आला आहे

१ यहोवाचा दिवस लवकरात लवकर यावा अशी ख्रिश्‍चनांना उत्कंठा लागली आहे. कारण या दिवसाद्वारेच यहोवा सध्याच्या व्यवस्थीकरणाचा नाश करून धार्मिकतेचे नवीन जग आणणार आहे. (२ पेत्र ३:१२, १३) पण हा दिवस केव्हा येईल हे आपल्याला नक्की माहीत नसल्यामुळे आपण सतत जागृत राहिले पाहिजे आणि इतरांनाही असे करण्यास मदत केली पाहिजे. (यहे. ३३:७-९; मत्त. २४:४२-४४) देवाच्या भविष्यसूचक वचनावर मनन केल्याने आपण, “परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे,” हा आपला दृढविश्‍वास आणखी भक्कम करू शकू.—सफन्या १:१४.

२ जागतिक सत्तांची वाटचाल: प्रकटीकरण १७:९-११ मध्ये लिहिल्यानुसार, प्रेषित योहान ‘सात राजांचा’ उल्लेख करतो. हे सात राजे, एकामागोमाग आलेल्या सात जागतिक साम्राज्यांना चित्रित करतात. योहान एका ‘आठव्या राजाविषयी’ देखील सांगतो की जो आता संयुक्‍त राष्ट्राला चित्रित करतो. यानंतर आणखी कोणत्या जागतिक साम्राज्यांची आपण अपेक्षा करू शकतो का? नाही. भविष्यवाणीत म्हटले आहे, की हा आठवा राजा “नाशाप्रत” जातो. आणि यानंतर पृथ्वीवरील कोणत्याही राजांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. काळाच्या ओघात आपण कोठे आहोत, हे या भविष्यवाणीवरून तुम्हाला समजते का?

३ दानीएल २:३१-४५ आपल्याला, यहोवाच्या दिवसाच्या येण्याचा अर्थ समजण्यास मदत करू शकते. या भविष्यवाणीत, नबुखदनेस्सरने पाहिलेला मोठा पुतळा, एकामागोमाग येणाऱ्‍या जागतिक सत्तांना चित्रित करतो. यांतील प्रत्येक साम्राज्य येऊन गेले आहे. मग इतिहासाच्या कोणत्या टप्प्यावर आपण येऊन पोहंचलो आहोत? आज आपण पुतळ्याची पावले चित्रित करणाऱ्‍या समयात आहोत. पुढे काय होईल, याचे भविष्यवाणीत अगदी स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे. मानवी शासनाचा पूर्णपणे नाश केला जाईल व त्याची जागा असे एक राज्य घेईल की ज्याचा “कधी भंग होणार नाही.” यहोवाचा दिवस किती जवळ आला आहे हे यावरून कसे दिसते, ते तुम्हाला समजले का?

४ आणखी पुरावा: यहोवाचा दिवस जवळ आला आहे याचा आणखी पुरावा आज आपण स्वतः प्रत्यक्ष पाहत आहोत. ‘शेवटल्या काळातील’ लोकांची मनोवृत्ती कशी होईल याविषयी प्रेषित पौलाने जे भाकीत केले होते ते आज पूर्ण होताना आपण पाहत आहोत. (२ तीम. ३:१-५) आणि अंत येण्याआधी ज्या सुवार्तेची साक्ष संपूर्ण जगभरात दिली पाहिजे त्या साक्षकार्यात आज आपण भाग घेत आहोत. (मत्त. २४:१४) “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे,” या देवदूताने केलेल्या घोषणेबद्दल तातडीची जाणीव आपल्या सार्वजनिक सेवेतून दिसून येवो.—प्रकटीकरण १४:६, ७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा