मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज एप्रि. १
“आपली मुले मौल्यवान आहेत यात काहीच शंका नाही. निर्माणकर्ताही त्यांना मौल्यवान समजतो, हे तुम्हाला माहीत होते का? [उत्तर ऐका आणि मग स्तोत्र १२७:३ वाचा.] पृष्ठ २२ वरील लेख काढा. या आणि यानंतरच्या लेखात, आपण आपल्या मुलांचे संरक्षण कसे करू शकतो, त्यांना प्रशिक्षण कसे देऊ शकतो, यांबद्दलच्या सूचना दिल्या आहेत.”
सावध राहा! एप्रि.-जून
“पुष्कळ लोक, अंगमेहनतीच्या कामाला तुच्छ लेखतात. पण आपण कष्टाचं काम केलं पाहिजे, असे शास्त्रवचने आपल्याला उत्तेजन देतात, हे तुम्हाला माहीत होतं का? [उत्तर ऐका आणि मग उपदेशक २:२४ वाचा. पृष्ठ २० वरील लेख काढा. अंगमेहनतीच्या कामाबद्दल खासकरून तरुणांनी कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे, हे या लेखात सांगितले आहे.”
टेहळणी बुरूज मे १
“आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा, आपल्याला त्या व्यक्तीला पुन्हा भेटावेसे वाटते, हे साहजिक आहे. हो ना? [उत्तर ऐका.] पुष्कळ लोकांना बायबलमधील पुनरुत्थानाच्या आशेतून सांत्वन मिळाले आहे. [योहान ५:२८, २९ वाचा.] हे पुनरुत्थान केव्हा होईल आणि याचा नेमका कोणाला फायदा होईल, याची या मासिकात चर्चा करण्यात आली आहे.”
सावध राहा! एप्रि.-जून
“आजच्या धकाधकीच्या जगात, पुष्कळ पालकांना आपल्या मुलांसाठी वेळ काढायला मुश्किल वाटत आहे. शास्त्रवचने आपल्या मुलांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पित्यावर सोपवते. [इफिसकर ६:४ वाचा आणि मग पृष्ठ १२ वरील लेख पाहा.] या लेखात, मुलांना प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत व्यावहारिक सूचना दिल्या आहेत.”