वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०५ पृ. ७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००५
आमची राज्य सेवा—२००५
km ४/०५ पृ. ७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

एप्रिल २५, २००५ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, मार्च ७ ते एप्रिल २५, २००५ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्‍नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]

भाषणाचे गुण

१. भाषण तयार करताना नेमलेल्या माहितीचा आपण चांगला उपयोग कसा करतो आणि हे महत्त्वपूर्ण का आहे? [be पृ. २३४ परि. १-३, चौकोन]

२. एखाद्या भाषणासाठी आपण, नेमलेल्या साहित्यातील किती माहिती घेतली पाहिजे? [be पृ. २३४ परि. ४-पृ. २३५ परि. १]

३. क्षेत्र सेवेत लोकांना संभाषणात सामील करण्याचे उत्तेजन देण्याकरता आपण प्रश्‍नांचा उपयोग कसा करू शकतो? (प्रेषितांची कृत्ये ८:३०) [be पृ. २३६ परि. २-५]

४. बायबल विद्यार्थ्यांना आपल्या ‘तर्कशक्‍तीचा’ उपयोग करण्यास मदत करण्याकरता आपण प्रश्‍नांचा उपयोग कसा करू शकतो? (रोम १२:१, NW) [be पृ. २३८ परि. १]

५. रोमकर ८:३१, ३२ आणि यशया १४:२७ मध्ये विचारलेल्या प्रश्‍नांचा काय परिणाम होतो? [be पृ. २३९ परि. १-२]

नेमणूक क्र. १

६. आपल्या शिष्य बनवण्याच्या कार्यात आपण ‘ख्रिस्ताचा पाया’ कसा घालतो? (१ करिंथ. ३:११) [be पृ. २७८ परि. १-२]

७. यहोवाने १९१४ मध्ये आपल्या पुत्राला पूर्ण राज्याधिकार दिला असल्यामुळे, “तुझे राज्य येवो” अशी प्रार्थना करण्यामागे आपला काय हेतू असतो? (तिरपे वळण आमचे, मत्त. ६:९, १०) [be पृ. २७९ परि. ४]

८. सर्व ख्रिश्‍चनांनी, लिहिता-वाचता येण्याची आवड का बाळगली पाहिजे आणि याबाबतीत येशूने कोणते उदाहरण मांडले? [w-MR०३ ३/१५ पृ. १० परि. ५; पृ. १२ परि. २]

९. योशीया आणि येशू या दोघांच्या उदाहरणामुळे तरुणांना आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी मदत कशी मिळू शकेल? [w-MR०३ ४/१ पृ. ८ परि. ३-४; पृ. १० परि. ३]

१०. आपण देवावर भरवसा का ठेवू शकतो? (नीति. ३:५, ६) [w-MR०३ ११/१ पृ. ४ परि. ६-७]

साप्ताहिक बायबल वाचन

११. इस्राएलवर कोणी राजा नसतानाही, ‘तू राजाला बल दे,’ अशी हन्‍नाने प्रार्थना का केली? (१ शमु. २:१०)

१२. इस्राएलमध्ये कराराचा कोश असतानाही ते पराजीत झाले या वस्तुस्थितीवरून आपण काय शिकू शकतो? (१ शमु. ४:३, ४, १०)

१३. १ इतिहास २:१३-१५ मध्ये, दावीद इशायाचा सातवा पुत्र होता असे म्हटले आहे तर १ शमुवेल १६:१०, ११ मध्ये तो आठवा पुत्र होता असे म्हटले आहे, असे का?

१४. कोणता “दुरात्मा” शौलास बाधा करू लागला? (१ शमु. १६:१४)

१५. एनदोर येथे एका चेटकीणीद्वारे ‘शमुवेलाने’ केलेले भाकीत खरे ठरले का? (१ शमु. २८:१६-१९)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा