मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज मार्च १
“आज पुष्कळ दांपत्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत उचित मार्गदर्शन कुठे मिळू शकते? [उत्तर ऐका. मग कलस्सैकर ३:१४ वाचून दाखवा. पृष्ठ १० वरील लेख काढा.] विवाहित दांपत्यांना यशस्वी होण्यास साहाय्य करणारी फायदेकारक माहिती या लेखांत आहे.”
सावध राहा! जाने.-मार्च
“मुलांचे संगोपन करण्यावरील माहिती पालकांना आवडते. हे मासिक, पालकांना अनेक लाभदायक मुद्दे सुचवण्यासाठी तयार करण्यात आले आहे.” पृष्ठ ७ वरील लेख काढून नीतिसूत्रे २२:६ वाचा.
टेहळणी बुरूज एप्रि. १
संपूर्ण जगभरातील लोक येशूच्या शिकवणुकींची प्रशंसा करतात. [पृष्ठ ३ वरील परिच्छेद १ मधील उद्गार वाचा.] पण, या शिकवणुकी, जसे की या वचनातील ही शिकवण आज व्यावहारिक आहे, तुम्हाला काय वाटतं? [मत्तय ५:२१, २२क वाचा. मग उत्तर ऐका.] येशूने काय शिकवले आणि त्याचा आपल्याला फायदा कसा होऊ शकतो, हे या मासिकात सांगितले आहे.”
सावध राहा! एप्रि.-जून
“प्राचीन काळी देवाने मुलांना आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा मान राखण्याची आज्ञा दिली. [निर्गम २०:१२ वाचा.] पण मातांचा आज आदर केला जातो, असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐका.] विविध देशांतील मातांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि त्या यांवर मात कशा करत आहेत, याचे परीक्षण या मासिकात करण्यात आले आहे.”