आवश्यकतेनुसार बदलता येतील अशा परिणामकारक प्रस्तावनांचा वापर करून पाहा
लोकांबद्दल मनापासून कळकळ असल्यास आपण त्यांच्या खऱ्या गरजा ओळखून, देवाचे राज्य त्यांच्या समस्यांचे कशाप्रकारे कायमचे निरसन करेल हे त्यांना पटवून सांगण्यास प्रवृत्त होऊ. (फिलिप्पै. २:४) बरेच प्रचारक, आपल्या प्रकाशनांतील परादिसचे दृश्य असलेली चित्रे (या पृष्ठाच्या उजव्या बाजूला अशा चित्रांची यादी दिली आहे.) दाखवून घरमालकाला त्यांविषयी आपले मत व्यक्त करण्याचे निवेदन करतात; अशाप्रकारे संभाषणास सुरुवात करणे परिणामकारक असल्याचे त्यांना आढळले आहे, शिवाय आवश्यकतेनुसार यात थोडाफार बदलही केला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणत्याही प्रस्तावनेचा उपयोग करून तुम्हीही हे करून पाहू शकता.
◼ “मानवजात कधी सुखासमाधानाने अशाप्रकारच्या परिस्थितीत जीवनाचा आनंद उपभोगू शकेल असे तुम्हाला वाटते का?”
◼ “या चित्रात दाखवले आहे, त्याप्रकारच्या जगात आपल्या मुलांना राहायला मिळावे असे कोणत्या आईवडिलांना वाटणार नाही? पण तुम्हाला काय वाटते, अशी परिस्थिती या जगात कशी काय आणता येईल?”
◼ “देवाची इच्छा जशी स्वर्गात तशी या पृथ्वीवरही पूर्ण होईल तेव्हा पृथ्वीवर अशी परिस्थिती असेल. आजच्या जगातील परिस्थितीत व या चित्रात दाखवलेल्या परिस्थितीत कोणकोणते फरक तुम्हाला आढळतात?”
◼ “या चित्रात दाखवलेल्या परिस्थितीत राहायला तुम्हाला आवडेल का? [उत्तर ऐकून घ्या.] अशी परिस्थिती आपल्या जीवनकाळात या पृथ्वीवर येईल असे तुम्हाला वाटते का?”
त्या व्यक्तीचे उत्तर लक्षपूर्वक ऐकून घ्या. आणखी एखाद दोन प्रश्न विचारून त्याचे विचार जाणून घ्या. आपल्याला अशा परिस्थितीत राहण्याची इच्छा नाही, किंवा अशी परिस्थिती येणे शक्य नाही असे कोणी म्हटल्यास त्यांना आस्था नाही असा लगेच निष्कर्ष काढू नका. ते अशाप्रकारे का विचार करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा; पण त्यांना वाईट वाटेल अशाप्रकारचे प्रश्न विचारू नका. खरे पाहता, मानवजातीसमोर असलेल्या असाध्य भासणाऱ्या समस्यांबद्दल त्यांना मनापासून काळजी वाटत असल्याचे कदाचित तुम्हाला त्यांच्या उत्तरावरून दिसून येईल.—यहे. ९:४.
घरमालकाला कोणत्या गोष्टींविषयी आस्था आहे याची कल्पना आल्यावर तुम्ही त्यानुसार आपली सादरता जुळवून घेऊ शकता. त्यांच्या विशिष्ट गरजांशी राज्य संदेशाचा जो पैलू संबंधित आहे त्यावर जास्त भर द्या. त्यांना ज्याविषयी आस्था वाटते त्या विषयावरील एखाद दोन शास्त्रवचने त्यांना उघडून दाखवा. (उजवीकडे असलेल्या रकान्यात सुचवलेले मुद्दे पाहा.) देवाचे वचन काय म्हणते हे त्या व्यक्तीला स्वतः पाहू द्या. अधिक जाणून घेण्याची त्यांना इच्छा आहे असे आढळल्यास, प्रकाशन द्या आणि पुन्हा भेट घेण्यासाठी वेळ ठरवून घ्या. पहिल्या भेटीत केलेल्या चर्चेच्या आधारावर त्यांची आस्था वाढवत राहा.
[Box on page 6]
परादिसचे दृश्य असलेली चित्रे
निर्मिती पुस्तक: पृष्ठे २३७, २४३, २५१
शिक्षक पुस्तक: पृष्ठे २५१-४
ज्ञान पुस्तक: पृष्ठे ४-५, १८८-९
अपेक्षा माहितीपत्रक: पृष्ठे ११, १३
खरी शांती पुस्तक: पृष्ठ ९८
देवाची उपासना पुस्तक: पृष्ठे ९२-३
[Box on page 6]
लोकांना ज्यांविषयी काळजी वाटते असे विषय
अकार्यक्षम सरकार
गरिबी, अत्याचार
गुन्हेगारी, हिंसाचार
दुष्काळ, कुपोषण
निराशा
निवास, आर्थिक समस्या
नैतिकतेचा ऱ्हास
पशूपक्ष्यांशी क्रूरता
पृथ्वीची नासाडी
प्रकटीकरण ११:१८
भ्रष्टाचार, अन्याय
भेदभाव, असमानता
मृत्यू, शोक
प्रकटीकरण २१:३, ४
युद्धे, दहशतवाद
रोगराई, दुर्बलता